×

पोलिसांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली चिमूरच्या भाजप आमदाराला राजस्थानमध्ये अटक

Published On :    21 Feb 2021
साझा करें:

महाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्ति कुमार यांना सीकर पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. शांतीभंग केल्या प्रकरणी त्यांच्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे.



सीकर:  महाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्ति कुमार यांना सीकर पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. शांतीभंग केल्या प्रकरणी त्यांच्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण करणे व शांती भंग करण्याच्या आरोपाखाली पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आमदार कुटुंबासोबत सालासर हनुमान दर्शन करण्यासाठी जात होते.


सीकरमध्ये कल्याण कॉलेजसमोर नो एन्ट्रीमध्ये बस घुसवली म्हणून त्यांना रोखण्यात आलं होतं. त्यामुळे तेथील वाहतूक कर्मर्‍यांनी त्यांच्या विरोधात चलान कापलं होतं. बस रोखली आणि कागदपत्रं मागितली म्हणून बसमध्ये बसलेले आमदार यावर भडकले. चलन कापल्यानंतर वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण करणे व त्यांचा युनिफॉर्म  फाडण्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे. तर ड्यूटीवर तैनात वाहतूक महिला कर्मचार्‍यांना वाईट वागणूक व त्यांना अभद्र शब्दांचा वापर केल्याचंही सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे पोलीस कर्मचार्‍यांनाहीच मारहाण केल्याचा आरोप कीर्ति कुमार यांच्या वडिलांनी केला आहे.


या प्रकरणात महाराष्ट्रातील निवासी नितेश भगडिया, त्याचे पूत्र आणि भाजप आमदार कीर्ति कुमार, श्रीकांत, अंकित आणि यवतमाळमध्ये राहणारे सुशील कोठारी यांचा समावेश आहे. दरम्यान कीर्ति कुमार यांच्या वडिलांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, वन नेच्या मार्गावर कोठेही बोर्ड नव्हता. त्यामुळे येथे नो एन्ट्री असल्याचं लक्षात आलं नाही. तर त्यानंतर पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी अरेरावीची भाषा करू लागले व त्यापैकी एका महिला पोलिसांने माझी कॉलर पकडली. यानंतर बाचाबाची झाली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीचा फटका पालेभाज्यांवर
आता संसदेला घेरणार, ४० लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणणार
आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारताना चीनच भारताचा सर्वांत मो
शेतीशी काडीमात्र संंबंध नसलेले आरएसएसचे ब्राम्हण कृषी
सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीच्या फंडात तब्बल पाच पटीन
पतंजलीच्या ‘कोरोनील’ विक्रीस परवानगी नाही
रस्त्यावरील अपघातांनी भारतात ७५ टक्के गरीब परिवार आणखी
सिलिंडरच्या भाववाढीने गरीबांचे जगणे बनले कठीण, स्वयंपा
राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा
मराठा आरक्षणाची राज्याची भूमिका केंद्राला कळवणार
नालासोपार्‍यातील एका ग्राहकाला दोन महिन्याचे वीजबिल ८०
पतंजली पुन्हा वादाच्या भोवर्‍यात
सरकारने न ऐकल्यास ७ मार्चला साष्टपिंपळगावात लाखो मराठ्
भारतात केंद्रातील भाजपा सरकारने ‘लोकशाही’ संपवली
दिशा रविला तातडीने सोडावे, पर्यावरण कार्यकर्त्यांचा छळ
चौफेर टीकेनंतर ‘राष्ट्रीय गो-विज्ञान परीक्षा’ स्थगित
नागरिकांना कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार
महाविकास आघाडी सरकारला संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचे वा
आंदोलन तीव्र करण्याची शेतकर्‍यांची रणनीती
इंधन दरवाढीचा मुद्दा धर्मसंकट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper