×

शेतीशी काडीमात्र संंबंध नसलेले आरएसएसचे ब्राम्हण कृषी कायद्यांच्या समर्थनात मैदानात

Published On :    24 Feb 2021
साझा करें:

शेतकरी व तरूणांना शिकवण्याच्या नावाखाली फसवणूक करणार, कृषी कायद्यांमागे आरएसएसचा छुपा अजेंडा असल्याचे त्यांच्या कृतीतूनच आले समोर



नवी दिल्ली : आमची सांस्कृतिक संघटना आहे अशाप्रकारची कितीही आरएसएसचे ब्राम्हण ओरडून सांगत असले तरी केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयामागे आरएसएसचा छुपा हात असल्याचे दिसून येते. आता कृषी कायद्यांवरून कोंडीत सापडलेल्या केंद्र सरकारला वाचवण्यासाठी शेतीशी काडीमात्र संबंध नसलेले आरएसएसचे ब्राम्हण कृषी कायद्यांच्या समर्थनात मैदानात उतरणार आहेत. शेतकरी व तरूणांना शिकवण्याच्या नावाखाली शेतकर्‍यांना फसवण्याचाच त्यांनी विडा उचलल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरएसएसच्या ब्राम्हणांवर विश्‍वास ठेवणे म्हणजे शेतकर्‍यांचा आत्मघात ठरण्याची दाट शक्यता आहे अशा प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होताना दिसत आहेत.


कृषी कायद्यांच्या समर्थनासाठी आरएसएस थेट रस्त्यावर उतरणार असून नव्या तंत्रज्ञानाचा आधारही घेणार आहे. आरएसएस आता तरुणाईलाच कृषी कायदे समजावून सांगणार आहे.  नव्या कृषी कायद्यांवरून देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्लीची कोंडी केली आहे. पंजाब, हरियाणातील शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून आहेत. कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा आक्रमक पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. त्यातच देशभरातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आपला छुपा अजेंडा शेतकर्‍यांवर लादता येणार नसल्याच्या भीतीने आरएसएसच्या तंबूत घबराट पसरली आहे. त्यासाठी केंद्र सरकारला मदत करण्याच्या नावाखाली आरएसएसचे ब्राम्हण कृषी कायद्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरणार आहेत. कृषी कायद्यांचे महत्व पटवून देण्याचा बहाणा करत आरएसएसचे ब्राम्हण शेतकरी व तरूणांना फसवण्याच्या तयारीत आहेत. कितीही विरोध झाला तरी आपला अजेंडा कायम रेटण्यासाठी आरएसएसचे ब्राम्हण पुढे सरसावतात. त्याचीच री ओढण्यात येणार आहे.


आरएसएसने सरकार आणि भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच यांनी परस्पर चर्चा करून कायद्यांतील त्रुटींवर मार्ग काढावा, अशी भूमिका घेतली होती. सरकार आणि शेतकरी आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने अजूनही नेमके काय होईल याचा अंदाज येत नाही. शेतकर्‍यांचा आंदोलनाचा दबाव कायम असल्याने सरकारला घाम फुटला आहे. यासाठी आरएसएसचे ब्राम्हण किंवा ज्या बहुजनांच्या मेंदूवर आरएसएसच्या ब्राम्हणांचा कब्जा आहे अशा तरूणांना हाताशी धरून शेतकर्‍यांना फसवण्याचा प्लॅन आखण्यात आला आहे. यासाठी पथनाट्य, रॅप सॉंग आदींचा आधार घेतला जाणार आहे. सोशल मीडियावरूनही तरुणाईला मार्गदर्शन केले जाणार आहे. भारतीय किसान संघाची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. यात आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले जाईल. तसेच देशभरातील ५० हजारहून अधिक खेड्यांत जाऊन प्रचार करण्याबाबत चर्चा करण्यात येईल.


जर का हे कृषी कायदे शेतकर्‍यांच्या हिताचे असते तर ते रस्त्यावर ठाण मांडून बसले असते का? असा सवाल निर्माण होतो. शेतकरी म्हणतात कृषी कायदे आमच्या हिताचे नाहीत आणि आरएसएसच्या ब्राम्हणांचे भाजपा सरकार म्हणजे फायद्याचे आहेत, यावरून काय समजायचे? यामध्ये गौडबंगाल आहे, त्यामुळे आरएसएसपासून शेतकर्‍यांनी सावध असायला हवे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चार बँकांच्या खासगीकरणाची लगबग
अनिल देशमुख यांच्या सचिवाची कसून चौकशी
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष
शेतकर्‍यांच्या जीवावर ‘नाफेड’कमावते नफा
राफेल डीलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० लाख य
उद्योगपती, एमडी ते सामाजिक क्रांतीचे जनक
क्रांतीसूर्य जोतिबा
आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा ज्य
परिवर्तन पेरणारे महात्मा
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीरा
पर्यायी साहित्याचे प्रणेते
महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक
महिलांचे मार्गदाते
आज सर्वात जास्त शंका निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर
महात्मा फुलेंच्या साहित्याचे नवे खंड आता हिंदी, इंग्रजी
परमबीर सिंह यांच्या प्राथमिक चौकशीचे गृहविभागाचे आदेश
अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना सीबीआयचे समन्स
अकोला मनपा आयुक्त अरोरा यांची अरेरावी
पंजाबमध्ये गहू खरेदीबाबत गोंधळ: डीबीटीच्या निषेधार्थ अ
हवा प्रदूषणाने राज्यातील १ लाख ८० हजार जणांचा मृत्यू
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper