×

केंद्रातील आरएसएसच्या भाजपा सरकारने प्रत्येक समाजात निर्माण केली द्वेषाची खाई

Published On :    25 Feb 2021
साझा करें:

राष्ट्रवादाच्या नावाखाली उन्माद, अल्पसंख्यांक टार्गेट, न्यूयार्कमधील ह्यूमन राईटस वॉचकडून गंभीर टीप्पणी



न्यूयॉर्कः केंद्रातील आरएसएसच्या भाजपा सरकारने प्रत्येक समाजात द्वेषाची खाई निर्माण करून विशेषत: अल्पसंख्याकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. सत्तारूढ भारतीय जनता पक्ष पूर्वग्रहदूषित असून पोलिस आणि कोर्टासारख्या स्वतंत्र संस्थांमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादाच्या नावाखाली उन्माद निर्माण करून धार्मिक अल्पसंख्याकांमधील खास करून मुस्लीमांना धमकावणे व त्यांना त्रास देणे हे नित्याचेच झाले आहे अशी गंभीर टीप्पणी न्यूयार्कमधील ह्यूमन राईटस वॉचकडून करण्यात आली आहे. या टीप्पणीमुळे केंद्रातील भाजपा सरकारची पोलखोल झाली आहे.


गेल्यावर्षी झालेल्या दिल्ली हिंसाचारात ५३ लोक ठार झाले. मृतांमध्ये ४० मुस्लिमांचा समावेश आहे. हल्ल्यांमध्ये भाजप नेते आणि पोलिस अधिकायांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. याची  निःपक्षपाती चौकशी करण्याऐवजी सरकारी यंत्रणेने कार्यकर्त्यांना लक्ष्य केले आहे. तर शेतकरी आंदोलनातील शीख शेतकर्‍यांची बदनामी करण्यात आली आहे. त्यांना फुटीरतावादी संबोधित करून त्यांच्या संबंधांची चौकशी सुरू केली आहे.


ह्युमन राइट्स वॉचच्या दक्षिण आशियाच्या संचालक मीनाक्षी गांगुली म्हणाल्या, अल्पसंख्यांकाचा भेदभाव करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही त्यांना समानता नाकारण्यात आली आहे. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांना हल्ल्यांंपासून संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरले आहे, परंतु कट्टरपंथी लोकांचे मात्र राजकीय संरक्षण करण्यात येत आहे.


सरकारच्या भेदभाववादी नागरिकत्व कायद्याबद्दल आणि प्रस्तावित धोरणांविरूद्ध सर्व धर्मियांच्या भारतीयांनी कित्येक महिने शांततेत निषेध केला. फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत हल्ले झाले. भाजपा नेत्यांनी आणि समर्थकांनी राष्ट्रीय हितसंबंधांविरूद्ध कट रचल्याचा आरोप करून निदर्शक आणि विशेषत: मुस्लिमांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.


नोव्हेंबर २०२० मध्ये लाखो शेतकर्‍यांनी सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात निदर्शने सुरू केल्यावर भाजपचे वरिष्ठ नेते, सोशल मीडियावरील त्यांचे समर्थक आणि सरकारभिमुख मीडियाने आणखी एक धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे शीखांची बदनामी केली.  १९८०  आणि ९० च्या दशकात पंजाबच्या शीख फुटीरवादी बंडखोरीचा हवाला देत त्यांनी शिखांवर खलिस्तानीवादी असल्याचा आरोप केला. ८ फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेत शांततापूर्ण निदर्शनांमध्ये भाग घेणार्‍यांना परजीवी असे संबोधले आणि आंतरराष्ट्रीय टीकेला परकीय विध्वंसक विचारधारा म्हटले. अनेक ठिकाणी इंटरनेट बंद केले, ट्विटर आणि वृत्तसंस्थेसह सुमारे १२ हजार ट्विटर खाते बंद करण्याचा आदेश देण्यात आला. त्यापैकी काही नंतर ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आले. काहींवर देशद्रोहाचा ठपका ठेवला.


अल्पसंख्यांकांचा विशेषतः छळ केला आणि त्यांच्यावर कारवाई केली. अल्पसंख्याक समुदाय, विशेषत: मुस्लिमांना लव्ह जिहादच्या नावाखाली टार्गेट करण्यात आले. २०१४ मध्ये मोदींनी सत्ता स्वीकारल्यानंतर धार्मिक अल्पसंख्यांकांविरूद्ध भेदभाव सुरू केला आणि अतिरेकी तथाकथित हिंदू राष्ट्रवादाची मुळे मजबूत केली. डिसेंबर २०१९ मध्ये मुस्लिमांचा धर्मभेद करणारा नागरिकत्व कायदा करून सरकारने पहिल्यांदाच धर्म हा नागरिकत्वाचा आधार बनविला. ऑगस्ट २०१९ मध्ये सरकारने जम्मू-काश्मीर या एकमेव मुस्लिम-बहुसंख्य राज्य असलेल्या संवैधानिक स्वायत्ततेला रद्दबातल केले आणि जनतेच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल अनेक निर्बंध लादले. गोवंश हत्येच्या नावाखाली मुस्लीमांचे खुलेआम मॉबलिंचिंग करण्यात आले.


मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या भाजपा शासित राज्यांनीही लव्ह जिहादविरोधी कायदा केला आहे. हरियाणा, कर्नाटकसह अन्य भाजपा शासित राज्ये यावर विचार करीत आहेत. ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड - अशा अनेक राज्यांमध्ये धर्म परिवर्तन विरोधी कायदे आधीपासूनच अल्पसंख्यांक समुदाय, विशेषत: अनु.जाती व आदिवासींसह ख्रिश्चनांविरूद्ध वापरण्यात आले आहेत. 


एनआरसी, सीएए कायद्यामुळे कोट्यवधी भारतीय मुस्लिमांचे नागरी हक हिसकावून घेण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. न्याय व्यवस्था ही भाजपाच्या तालावर नाचत असून धार्मिक आणि अन्य अल्पसंख्याकांना आणि सरकारच्या विरोधकांना लक्ष्य करते आणि सरकारच्या समर्थकांना संरक्षण कवच प्रदान करते. न्याय व्यवस्थाही पूर्वग्रहदूषित वागत असल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर तबलीगी जमातींनी कोरोना पसरवला अशा प्रकारची आवई उठवत त्यांना तालीबानी दहशतवादी म्हणण्यापर्यंत मजल गेली, त्यात मीडियादेखील सहभागी होता असे ह्यूमन राईटस वॉचने म्हटले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चार बँकांच्या खासगीकरणाची लगबग
अनिल देशमुख यांच्या सचिवाची कसून चौकशी
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष
शेतकर्‍यांच्या जीवावर ‘नाफेड’कमावते नफा
राफेल डीलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० लाख य
उद्योगपती, एमडी ते सामाजिक क्रांतीचे जनक
क्रांतीसूर्य जोतिबा
आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा ज्य
परिवर्तन पेरणारे महात्मा
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीरा
पर्यायी साहित्याचे प्रणेते
महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक
महिलांचे मार्गदाते
आज सर्वात जास्त शंका निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर
महात्मा फुलेंच्या साहित्याचे नवे खंड आता हिंदी, इंग्रजी
परमबीर सिंह यांच्या प्राथमिक चौकशीचे गृहविभागाचे आदेश
अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना सीबीआयचे समन्स
अकोला मनपा आयुक्त अरोरा यांची अरेरावी
पंजाबमध्ये गहू खरेदीबाबत गोंधळ: डीबीटीच्या निषेधार्थ अ
हवा प्रदूषणाने राज्यातील १ लाख ८० हजार जणांचा मृत्यू
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper