×

आर्य भारताचे मूलनिवासी नाहीत, ते स्थलांतरित

Published On :    26 Feb 2021
साझा करें:

डीएनए संशोधनाचा दाखला देत Early Indians: The Story of Our ­ncestors and Where We Came From या पुस्तकाचे लेखक टोनी जोसेफ यांचा दावा



नवी दिल्ली:  Early Indians: The Story of Our ­ncestors and Where We Came From या पुस्तकाचे लेखक टोनी जोसेफ यांनी डीएनएन संशोधनाचा दाखला देत आर्य भारताचे मूलनिवासी नाहीत, ते स्थलांतरित असल्याचे म्हटले आहे. Juggernaut या संस्थेने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.


आर्य हे मुळात भटके होते. घोडेस्वारी करणारे होते. अडॉल्फ हिटलरचे आर्यांच्या वांशिकतेबद्दल  मतही सर्वांना परिचित आहे. आर्यांचे आपण वंशज आहोत, असे हिटलर सांगायचा. या दोन प्रदीर्घ काळ चाललेल्या वादावर आता लोकसंख्या आनुवांशिकीशास्त्रामुळे पडदा पडू शकतो. प्राचीन DNA वापरून कोणता समुदाय केव्हा आणि कुठे स्थलांतरित झाला हे पडताळून पाहणे लोकसंख्या आनुवांशिकीमुळे शक्य होऊ शकते. प्राचीन DNA चा अभ्यास करून पुनर्लेखन करण्याचा प्रयोग गेल्या काही वर्षांपासून जगभर सुरू आहे. भारतात तर या अभ्यासातून जे निष्कर्ष समोर येत आहेत, ते खूपच लक्षवेधी आहेत.


युरेशियाच्या गवताळ प्रदेशातून आले आर्य

हार्वर्ड विद्यापीठातील आनुवांशिकीतज्ज्ञ डेव्हिड राईश यांनी यासंदर्भात केलेले संशोधन मार्च २०१८ मध्ये प्रसिद्ध झाले. राईश यांना या संशोधनामध्ये जगभरातील ९२ अभ्यासकांनी सहाय्य केले होते. यांपैकी अनेक जण हे इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र तसेच आनुवांशिकीशास्त्रामधील नावाजलेले आहेत. The Genomic Formation of South and Central ­Asia असे डेव्हिड राईश यांच्या शोधनिबंधाचे नाव आहे. त्यातील अनेक निष्कर्ष हे अतिशय महत्त्वाचे असे आहेत.


राईश यांच्या संशोधनानुसार गेल्या १० हजार वर्षांत भारतामध्ये दोन प्रमुख मोठी स्थलांतरे झाली, असे दिसून येते. यातील एक स्थलांतर हे इराणच्या नैऋत्येकडील झागरोस भागातून झाले होते. इथून आलेले स्थलांतरित हे शेती करणारे, पशुपालक होते. हे स्थलांतर इसवी सन पूर्व ७ हजार ते ३ हजार या कालखंडात झाले. या उपखंडात आधीपासून असलेले स्थानिक हे आफ्रिकेतील लोकांचे वंशज होते. त्यांना Out of Africa म्हटले जाते. हे लोक ६५ हजार वर्षांपूर्वी भारतात आले.


दुसरे सर्वांत मोठं स्थलांतर हे इसवी सन पूर्व २ हजारच्या सुमारास झाले. सध्या कझाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणार्‍या युरेशियाच्या गवताळ प्रदेशातून आर्यांचे भारतात आक्रमण झाले. संस्कृत भाषाही आर्यांसोबतच भारतात आली. घोड्यांचा वापर आर्यांनीच भारतात सुरू केला. वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग समजला जाणारा यज्ञही आर्यांसोबतच भारतात आला. आनुवांशिकीशास्त्राच्या अभ्यासातून भारतामध्ये जी अन्य स्थलांतरे झाली, त्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. ऑस्ट्रो-आशियाई समुदायतील भाषा बोलणारे लोक आग्नेय आशियातून भारतात आले.


अनेक कट्टर उजव्या विचारवंतांना हे निष्कर्ष फारसे पटणारे नाहीत. हे लोक शाळांमधील अभ्यासक्रम बदलण्याच्या, आर्य हे भारतात बाहेरून आले होते हा सिद्धांत खोडून काढण्याच्या मागे लागले आहेत. प्रचंड लोकप्रिय असलेली उजव्या विचारधारेची इतिहासविषयक काही ट्विटर हँडल आहेत. आर्य बाहेरून भारतात आले होते या सिद्धांताला दुजोरा देणार्‍या अनेक नामवंत इतिहासकारांचा या हँडलवरून समाचार घेतला जातो. आर्य हे मूल भारतीय निवासी नव्हते आणि त्यांच्या भारतात येण्याच्या खूप आधीपासून येथे हडप्पा संस्कृती नांदत होती, परंतु हे बाहेरून आक्रमण करणार्‍या आर्याना ते मान्य नाही.


दरम्यान हरियाणामधील भाजप शासित सरकारने ‘हडप्पन संस्कृती’चे नाव बदलून ‘सरस्वती संस्कृती’ असे करण्याची मागणी केली होती. सरस्वती ही वेदांमध्ये नमूद केलेली नदी आहे. प्राचीन DNA  संबंधीच्या नवीन संशोधनामुळे या सर्व चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. मात्र हे संशोधन करणार्‍या प्राध्यापक राईश यांच्यावर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. हे सर्व खोटं आहे...धादांत खोटं आणि (हार्वर्ड यांच्या ‘थर्ड राईश आणि कंपनी’चे) अंकगणित आहे. स्वामींनी कितीही टीका केली, तरी या नवीन संशोधनाचा निष्कर्ष मूलनिवासी भारतीयांसाठी आशादायी  आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चार बँकांच्या खासगीकरणाची लगबग
अनिल देशमुख यांच्या सचिवाची कसून चौकशी
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष
शेतकर्‍यांच्या जीवावर ‘नाफेड’कमावते नफा
राफेल डीलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० लाख य
लॉकडाऊनच्या भीतीने कांद्याचे दर कोसळले
ज्या राज्यात निवडणुका आहेत तेथे नाही फक्त महाराष्ट्रात
शेतकरी आंदोलनाला कव्हरेज देणार्‍या व डॉ.आंबेडकर जयंतील
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले असताना
झिरो बॅलन्स खात्यातून पाच वर्षात सर्व्हिस चार्जच्या ना
उद्योगपती, एमडी ते सामाजिक क्रांतीचे जनक
क्रांतीसूर्य जोतिबा
आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा ज्य
परिवर्तन पेरणारे महात्मा
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीरा
पर्यायी साहित्याचे प्रणेते
महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक
महिलांचे मार्गदाते
आज सर्वात जास्त शंका निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर
महात्मा फुलेंच्या साहित्याचे नवे खंड आता हिंदी, इंग्रजी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper