×

अस्तित्वात नसलेली संस्था उत्कृष्ट?

Published On :    11 Jul 2018
साझा करें:

जिओ इन्स्टिट्यूटवरून सर्व स्तरांतून टीका



नवी दिल्ली: रिलायन्स फाऊंडेशनच्या अद्याप अस्तित्वातही न आलेल्या जिओ इन्स्टिट्युटचा देशातील सहा उत्कृष्ट संस्थांंमध्ये केंद्र सरकारने समावेश केल्याबद्दल कॉंग्रेस व शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांनी खरमरीत टीका केली आहे. 



रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी व त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्यावर केंद्राची मेहेरनजर असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला. कॉंग्रेसने म्हटले की, अस्तित्वात नसलेली जिओ इन्स्टिट्युट ही उत्कृष्ट संस्था आहे हे कोणत्या निकषांच्या आधारे ठरविले हे स्पष्ट झाले पाहिजे.



जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्राध्यापक आयेशा किडवाई म्हणाल्या की, जिओ इन्स्टिट्युटला अद्याप स्वत:चे विद्यासंकुल, वेबसाइटी नाही. 



आयआयटी, अशोक युनिव्हर्सिटी, जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी यासारख्या सरकारी वा खासगी शिक्षणसंस्थांनी सर्वोत्तम विद्यार्थी घडविले तसे काहीही काम जिओ इन्स्टिट्युटकडून झालेले नाही. ही संस्था जन्माला येण्याआधीच ती जागतिक दर्जाची असल्याचा डांगोरा सरकारकडून पिटला जात आहे.



जिओ इन्स्टिट्युटला उत्कृष्ट संस्थेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना देशभरातील अनेक जणांनी धारेवर धरले. 



बंगळुरूमधील आयआयएससीतील प्राध्यापकाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आयआयटी एम, आयआयटी केजीपी व अन्य महत्त्वाच्या संस्थांपेक्षा जिओ इन्स्टिट्युट कशी उत्कृष्ट आहे हे आम्हा सामान्य माणसांना कळलेले नाही. सरकारने याबाबत तोंड उघडायला हवे.



यूजीसीने केले निर्णयाचे समर्थन

देशातील सहा उत्कृष्ट संस्थांची निवड करणार्‍या विद्यापीठ अनुदान आयोगाने मात्र आपल्या निर्णयाचे समर्थनच केले आहे. नवीन किंवा प्रस्तावित संस्थांकरिता ग्रीनफिल्ड श्रेणीच्या अंतर्गत जे नियम ठरविण्यात आले, त्यानुसारच जिओ इन्स्टिट्यूटची निवड झाली आहे. 



उत्कृष्ट संस्थांना अभिमत विद्यापीठांचा दर्जा देण्यासंदर्भातील विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१७ साली तयार केलेल्या नियमानुसार, १० सरकारी व १० खासगी अशा वीस संस्थांची निवड करण्यात येईल. या संस्थांना पूर्ण शैक्षणिक व प्रशासकीय स्वायत्तता बहाल करण्यात येणार आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भारतात ६ वर्षात तोंडाच्या कर्करोगात ११४ टक्के वाढ
मोहन भागवतांना सत्र न्यायालयाची नोटीस, काठ्या सोबत घेतल
कितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता, रामदास आठवलें
सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही
नोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब
संशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे
सकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श
लाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी
मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्
मोहन भागवत हाजिर हो! स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या
राफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल
देशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब
दिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ
१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच
जेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच
मोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्
राफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र
भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच
राफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper