×

सीबीआयच्या आरोप पत्रात कुलदीप सिंह सेंगरचे नाव

Published On :    12 Jul 2018
साझा करें:

उन्नाव बलात्कार प्रकरण, आणखी सहाजण आरोपी



उत्तरप्रदेश:  उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने बुधवारी दाखल केलेल्या दुसर्‍या आरोपपत्रात भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरच्या नावाचा समावेश केला आहे.  


कुलदीप सिंह सेंगरने घरात घुसून पीडित तरुणीवर बलात्कार केला त्यावेळी त्याची महिला साथीदार शशी सिंह दरवाजाबाहेर पहारा देत होती असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. ४ जून २०१७ रोजी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान बलात्काराची ही घटना घडली. 


मागच्या आठवडयात सीबीआयने पहिले आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये सेंगरचा भाऊ जय दीप सिंह याच्यासह पाच आरोपींच्या नावाचा समावेश होता.


मागच्यावर्षी नोकरीच्या निमित्ताने १७ वर्षीय पीडित तरुणी कुलदीप सिंह सेंगरला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने बलात्कार केला असा आरोप तरुणीने केला आहे. 


पीडित तरुणीने न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला तसेच तिच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर योगी सरकारला जाग आली व तातडीने पावले उचलली गेली.


उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर चहूबाजूंनी जोरदार टीका झाली. सरकार आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे आरोप झाल्यानंतर निष्पक्ष तपासासाठी राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. 


उत्तर प्रदेशातील बांगरमऊ येथून आमदार असलेल्या कुलदीप सिंह सेंगरवर पीडित तरुणीने सुरुवातीपासून बलात्काराचा आरोप केला आहे.या प्रकरणी २० जूनला एफआयआर आणि त्यानंतर दाखल झालेल्या आरोपपत्रात स्थानिक पोलिसांनी कुलदीप सिंह सेंगर आणि अन्य आरोपींच्या नावाचा समावेश केला नाही. 


स्थानिक पोलिसांनी पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीला विलंब केला तसेच तिचे कपडे फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले नाहीत. आरोपींशी हातमिळवणी करुन जाणीवपूर्व सर्व गोष्टींना विलंब लावण्यात आला असे सीबीआय अधिकार्‍याने सांगितले. सेंगर, शशी सिंह आणि अन्य आरोपींना सीबीआयने १३ आणि १४ एप्रिलला अटक केली.
संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’
दप्तराचे ओझे कमी होईना
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ ५० कोटी लोकांना मिळणार?
पुणे कराराचा धिक्कार व इतर मागण्यांसाठी
देशाचे आर्थिक मॉडेल बदलण्याची गरज, डॉॅ. एस.एस. मंठा यांचे
राफेल खरेदी प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी करा
आयुष्यमान भारत योजना खाजगी विमा कंपन्यांच्या फायद्यासा
मोदींसाठी देश नाही, सत्ता महत्त्वाची-जितेंद्र आव्हाड बर
मोदींसाठी देश नाही, सत्ता महत्त्वाची-जितेंद्र आव्हाड बर
नोकरी गेल्यावर एचआर अधिकारी बनला चोरांचा सरदार!
जात कळण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हाताला बा
अच्छे दिन’च्या घोषणेत फसली जनता-आ.गोपालदास अग्रवाल
शेअर बाजारात भूकंप कर्ज खाती बुडीत खात्यात जाण्याची शक्
तिहेरी तलाक अध्यादेशाला लवकरच आव्हान देणार
बामसेफ आणि वामन मेश्राम यांच्याविरोधात आरएसएसचे राष्ट्
कुपोषित बालकांच्या आरोग्यासाठी समृद्धम फाउंडेशनचा पुढ
२६ सप्टेंबरला राष्ट्रव्यापी धरणे प्रदर्शन
‘कमल का फूल, बडी भूल’
एक हजाराच्या नोटांच्या तुलनेत दोन हजारांच्या नोटा भरमस
धोकादायक संघटनांमध्ये भाकप (माओवादी) चौथी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper