×

भारतात २ कोटी ३० लाख मुले ‘कामगार’

Published On :    12 Jul 2018
साझा करें:

क्रायच्या अहवालातून उघड



नवी दिल्ली:  चाइल्ड राइटस अँड यू (क्राय) या संस्थेन भारतातील कामगाराबाबत एक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार देशात १५ ते १८ वयोगटातील सुमारे २ कोटी ३० लाख मुले ‘कामगार’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 



यापैकी १ कोटी ९० लाख मुलांनी शाळा सोडली आहे.  मुलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, नियोजनकार आणि राजकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे.


बालकामगार प्रतिबंधक कायद्यांतर्गंत देशातील २ कोटी ३० लाख मुले काम करीत आहेत. या कायद्यानुसार १५ ते १८ वर्षे आरोग्याला नुकसानदायक नसलेल्या व्यवसायात काम करू शकतात. देशातील १५ ते १८ वयोगटातील १ कोटी ९० लाख मुलांनी शाळा आणि कामाचे नियोजन होत नसल्यामुळे शाळेला कायमची सोडचिट्ठी दिली आहे. 


शालाबाह्य मुलांची समस्या सोडविण्यासाठी सरकारने मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्यासाठी बालहक्क कायद्यात दुरुस्ती करावी, अशी सूचना अहवालात केली आहे. बारावीपर्यंतचे शिक्ष़ण मुलांना मोफत देण्याची योजना हा पुरेसा पर्याय नाही.


‘क्राय’चा हा अहवाल प्रसिद्ध करताना १५ ते १८ वयोगटातील मुलांना समाजाच्या मदतीची गरज आहे, असे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा स्तुती काक्केर यांनी सांगितले. जर मुलांना त्रास सहन करावा लागला तर संपूर्ण समाजाला यातना होतील. 



अशी भूमिका स्वीकारली तर मुलांविरोधातील हिंसाचार कमी होईल, असे त्या म्हणाल्या.  मुलांच्या या वयोगटावर लक्ष ठेवून त्यांचे शिक्षण चालू राहील याकडे शाळांनी लक्ष दिले पाहिजे. या मुलांना शिक्षणासाठी प्रेरीत करण्याची गरज आहे, असे बिल आणि मेलिंडा गेटस फाऊंडेशनच्या भारतातील प्रभारी प्रिया नंदा यांनी सांगितले



देशातील बालविवाह आणि बालमातांचा प्रश्‍न या अहवालातून दिसून आला आहे. सध्या देशात १५ ते १९ वयोगटातील ९० लाख २० हजार मुलांचे लग्न झाले आहे, तर याच वयोगटातील २० लाख ४० हजार मुली माता बनल्याची धक्कादायक माहिती अहवालात प्रसिद्ध केली आहे. 


या कामगारात अपहरणाची शिकार झालेल्या मुलांचे प्रमाण ६० टक्के आहेत. बलात्कारपीडितांपैकी २५ टक्के मुली १५ ते १८ वयोगटातील आहेत. दारिद्रय आणि बेरोजगारी या समस्या मुलांविरोधातील गुह्यांची मूळ कारणे असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.


‘क्राय’च्या या अहवालात भारताचा जणगणना अहवाल २०११, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो २०१५-१६ आणि नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ४ (२०१६) यांचा संदर्भ घेण्यात आला आहे.



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ईव्हिएम विरोधी चळवळ आता धरत आहे लोकचळवळीचे रूप
शिवरायांबद्दल ‘भलता’ शब्द विरोधकांनी भाजपला घेरले
२५ वर्षानंतरही आदिवासी विद्यार्थिनींना मिळतो फक्त १ रु
तेढ पसरविण्यामध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर, तर गुजरात दुसर
‘नीट’ परीक्षेत शून्य गुण, तरीही मेडिकलला प्रवेश!
इंटरनेट स्पीडमध्ये भारत पाकिस्तान, श्रीलंकेच्याही मागे
मेहुल चोकसी अमेरिकेतून पसार, इंटरपोलची माहिती
महिला आरक्षणाला कॉंग्रेसचा भाजपला पाठिंबा
‘मनू हा जगातला पहिला कायदेपंडित’
आदिवासी हलबांच्या संघर्ष यात्रेने दाखविले उग्र रूप
झुंडशाहीला रोखण्यासाठी संसदेने कायदा बनवावा
वर्षभरात १३ हजार बालकांचा मृत्यू
धर्म आणि जात परिवर्तन करणार्‍यांना आरक्षण देऊ नये
‘पुढील २० वर्षे भाजपाचीच सत्ता’
डिझेल चोरीच्या संशयातून तिघांना नग्न करून मारहाण
स्विस बँकांमध्ये ३०० कोटी बेवारस
भाजपाचे नवे ‘ब्रँड ऍम्बेसिडर’ विजय माल्ल्या
राज्यात दूध आंदोलनाने घेतला भडका
विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यास विरोध
मंदिरांवर चर्चा करुन रोजगार निर्मिती होणार नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper