×

इंधन दरवाढीवरून कॉंग्रेस-भाजपाची मॅच फिक्सिंग..!

Published On :    12 Sep 2018
साझा करें:

‘तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो’ अशी रणनीती



पुणे : दिवसेंदिवस वाढणार्‍या पेट्रोल-डिझेलच्या इंधन दरवाढीवरून कॉंग्रेस-भाजपाची मॅच फिक्सिंग आहे. ‘तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो’ अशी या दोन्ही पक्षांची रणनीती असल्याचे दिसून येत आहे. 


इंधन दरवाढीवरून कॉंग्रेसने भारत बंद पुकारला. गेली कित्येक दिवस इंधन दरवाढ होत आहे. मग आताच का जाग आली कॉंग्रेसला याचाही विचार करावा लागेल. सार्‍या देशभरात बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून ईव्हीएमविरोधात रान पेटविण्यात आले आहे. त्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय परिवर्तन यात्रा काढण्यात येत आहेत. या यात्रा पूरकही काढण्यात येत आहेत. त्यामुळे जागृतीचा अखंड यज्ञ केला जात आहे. 


परिणामी लोक ईव्हीएमविरोधात आवाज उठवू लागले आहेत. ईव्हीएमविरोधात होणारी जागृती ब्राम्हणधार्जिण्या कॉंग्रेस व भाजपासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या मुद्यावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुद्दामहून कॉंगे्रसने इंधन दरवाढीविरोधात भारत बंदची घोषणा केली आणि आंदोलन केले. याचा अर्थ आम्ही इंधन दरवाढ करतो तुम्ही आंदोलन करा अशी भाजपाचीच कॉंग्रेसला फूस होती. म्हणजेच तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो. त्यामुळे कॉंग्रेस-भाजपाची ही मॅच फिक्सिंग आहे. 


९ ऑगस्ट २०१८ ला दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर ११ ब्राम्हणांनी देशाचे सर्वोच्च असलेले संविधान जाळले, त्याविरोधात कॉंग्रेसला वाटले नाही की भारत बंद करावा म्हणून. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य लोक मेटाकुटीला आहेत बरोबर आहे. परंतु संविधानच जाग्यावर राहणार नसेल तर इंधन दरवाढीविरोधात करण्यात आलेले कॉंग्रेसचे आंदोलन फुसका बारच म्हणावा लागेल. एवढे जुलमी कर लादूनही गेली चार वर्षे कॉंग्रेसने झोपेचे सोंग घेतले होते. एकवेळ झोपलेल्याला जागे करू शकतो परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करू शकत नाही. तशीच गत कॉंग्रेसची झाली आहे. 


दरम्यान ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ हा नारा बामसेफने दिला आहे. त्यामुळे देशात जाणीव जागृती सुरू आहे. त्याला देशातील तमाम नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधातील मुद्यावरील लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी कॉंग्रेस व भाजपाने मॅच फिक्सिंग करत भारत बंद करण्याचा निर्णय घेतला. 


कारण ईव्हीएविरोधातील जागृती या दोन्ही पक्षांना घातक आहे. त्यामुळे नागरिकांनीच विरोध केला तर मतांची फिक्सिंग करता येऊ शकत नाही. परिणामी ही चाल खेळण्यात आली. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सांगितले होते की, कॉंग्रेसने ईव्हीएमविरोधात आवाज उठवला व देशभरात आंदोलन पुकारले तर त्यांना आम्ही या मुद्यावर सशर्त पाठिंबा देऊ, परंतु या मुद्यावर कॉंग्रेसने विचारच केला नाही. 


याचा अर्थ ईव्हीएम हटला पाहिजे असे कॉंग्रेसला वाटत नाही. त्यामुळेच त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून भारत बंदची करण्यात आलेली मॅच फिक्सिंग लक्षात घेता कॉंग्रेस-भाजपा नागरिकांना उल्लू बनवित आहेत, त्यांच्याकडून बनवाबनवीच सुरू असल्याचे दिसून येते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
नोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब
संशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे
सकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श
लाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी
मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्
मोहन भागवत हाजिर हो! स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या
राफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल
देशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब
दिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ
१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच
जेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच
मोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्
राफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र
भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच
राफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍
स्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण
राष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा! शरद पवार यां
कर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे
गडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper