×

महाराष्ट्रात पाच वर्षात खड्ड्यांचे २ हजार बळी

Published On :    11 Oct 2018
साझा करें:

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत खड्ड्यांमुळे २ हजार १३६ नागरिकांचा बळी गेला असून, देशात हा आकडा १५ हजारांच्या घरात आहे.



पुणे : रस्ते अपघातांमध्ये हजारो नागरिकांचे बळी जात असतानाच राज्यातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांनी तब्बल २ हजार १३६ नागरिकांचे बळी घेतल्याची धक्कादायक माहिती सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान उघड झाली आहे. 


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने या घटनांची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रासह आठ राज्यांचे नुकतेच कान टोचले आहेत. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत खड्ड्यांमुळे २ हजार १३६ नागरिकांचा बळी गेला असून, देशात हा आकडा १५ हजारांच्या घरात आहे. 


नगरविकास विभागाने पुणे महापालिकेला गेल्या आठवड्यात पत्र पाठविले असून त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल पाठविला आहे. निवृत्त न्यायमूर्ती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीची गेल्या महिन्यांत बैठक झाली. रस्त्यावरील खड्डे, रस्त्यांची देखभाल, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणारे अपघात आदीबाबत समितीने राज्यांकडून माहिती मागविली आहे. 


राज्य सरकारने ही सर्व माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांकडून संकलित करण्यास सुरुवात केली आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांच्या होणार्‍या मृत्यूंबाबत मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. 


सर्वोच्च न्यायालयाने २० ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान खड्ड्यांमुळे होणार्‍या मृत्यू तसेच गंभीर अपघातांबाबत तीव्र काळजी व्यक्त केली होती. या अपघातांमध्ये मृत्यू पावणारे तसेच गंभीर जखमी होणार्‍या नागरिकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तसेच या अपघातांशी निगडित असलेले सरकारी विभाग, इंजिनीअर यांना खड्ड्यांसाठी जबाबदार का धरू नये, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. 


या पार्श्‍वभूमीवर समिती नेमण्यात आली असून, या समितीला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जखमी तसेच मृतांच्या नातेवाइकांना किती रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, याबाबतही समितीला शिफारस करण्याची सूचना करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १२ एप्रिल रोजी या प्रकरणी दिलेल्या निकालाचा या समितीने विचार करावा, अशीही सूचना सर्वोच्च न्यायालयाने या समितीला केली आहे. 


देशात खड्ड्यांमुळे बळी जाणार्‍या नागरिकांची सर्वाधिक संख्या ही उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेश येथे ४ हजार ४१५ नागरिकांचा बळी गेला असून त्या खालोखाल महाराष्ट्रात खड्ड्यांमुळे बळी गेले आहेत. राज्यातही खड्ड्यांवरून चांगलेच राजकारण तापले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ’सेल्फी विथ पॉट होल’ हे कॅम्पेन सोशल मीडियावर राबवून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. 


वर्ष मृतांची संख्या-

२०१३ : २ हजार ६०७ 

२०१४ : ३ हजार ३९ 

२०१५ : ३ हजार ४१६ 

२०१६ : २ हजार ३२४ 

२०१७ : ३ हजार ५९७ 

एकूण : १४ हजार ९३६ 


खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू-

राज्य मृतांची संख्या 

उत्तर प्रदेश : ४ हजार ४१५ 

महाराष्ट्र : २ हजार १३६ 

मध्य प्रदेश : १ हजार ३८५ 

गुजरात : ८२५ 

पश्‍चिम बंगाल : ७९३ 

बिहार : ७७५ 

तमीळनाडू : ६५४ 

आंध्र प्रदेश : ६०५ 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सरकारने ‘चमकोगिरी’वर खर्च केले ५ हजार २०० कोटी
...तर शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतात, शिवसेनेने उप
१९८४ च्या शिखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचा हात
धनगरांचा मुख्यमंत्र्यांविरोधात उद्रेक होणार, निदर्शने
योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगीतली तर आमचे काम सोप
घाना विद्यापीठाने वर्णद्वेषी मोहनदास गांधींना जागा दाख
‘जिजाबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी’
राफेल प्रकरणाचा निकाल चुकीचा, याचिकाकर्ते प्रशांत भूषण
श्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दा
फुकट्या भाजप खासदाराविरूध्द अटक वॉरंट, तिकीटाशिवाय रेल
ईडीसमोर मल्ल्याच्या वकीलाची बोलती बंद
हा पराभव प्रधानमंत्र्यांचाच, उध्दव ठाकरेंनी डिवचले
नोटाबंदीची कल्पना त्यांच्या अर्थमंत्र्यांनाही नव्हती
‘हिंदू राष्ट्र’ तेव्हाच व्हायला हवे होते, मेघालय हायकोर
अर्थतज्ज्ञ नाहीत गव्हर्नर शक्तिकांत दास, एमएचा विषय होत
देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, निवडणूक प्
केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले
महार बटालियनची शौर्यगाथा जागवणार
चौथे अनु.जाती-आदिवासी भटके ओबीसी साहित्य संमेलन, पिंपळगा
भाजपला चिंतेने ग्रासले, २०१९ ला काय होणार?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper