×

४५ वर्षांच्या चळवळीनंतरही देवदासींना सरकारने सोडले वार्‍यावर

Published On :    11 Oct 2018
साझा करें:

स्वातंत्र्यपूर्व काळापासून मनावरील अंधश्रद्धेच्या दबावाखालील सामाजरचनेत वावरणार्‍या देवदासी व जोगता हे घटक आजही उपेक्षित आहेत.



कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून मनावरील अंधश्रद्धेच्या दबावाखालील सामाजरचनेत वावरणार्‍या देवदासी व जोगता हे घटक आजही उपेक्षित आहेत. अशा घटकांना या अनिष्ट रूढी-परंपरेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगू देण्यासाठी ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या चळवळीद्वारे देवाला मुलगी किंवा मुलगा सोडण्याची प्रथा बंद झाली आहे; मात्र त्यांच्या पुनर्वसनाच्यादृष्टीने शासनाने त्यांना अजून वार्‍यावरच सोडले आहे. 


नवसापोटी यल्लम्माला वाहिलेली ‘मुलगी’ म्हणजे ‘देवदासी’ किंवा ‘जोगतीण’ आणि वाहिलेला मुलगा म्हणजे ‘जोगता’ सौंदत्ती (कर्नाटक) येथील रेणुका देवी (यल्लम्मा) मंदिराच्या आवारात ही परंपरा रूढ झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातील अंधश्रद्धेची माणसांवर असलेली पकड, यातूनच या घटकांचा उदय झाल्याचे चळवळीचे कार्यकर्ते विठ्ठल बन्ने व बापू म्हेत्री सांगतात. 


देवदासी किंवा जोगता या परंपरेला बहुतांशी अशिक्षित समाज बळी पडला आहे. कोल्हापूरसह जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, राधानगरी, भुदरगड तालुके आणि सांगली, बेळगाव जिल्ह्यात देवदासी, जोगत्यांची संख्या दहा हजारांवर आहे. राज्यातील विविध भागात लाखावर ही संख्या पोचते. या घटकांना अंधश्रद्धेच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी देवदासी मुक्तीच्या चळवळीचा श्रीगणेशा झाला.


१९७५ मध्ये गडहिंग्लजमध्ये त्यांची पहिली परिषद झाली तेव्हापासून या उपेक्षित घटकांच्या प्रश्‍नांचा जागर मांडला जात आहे. श्रीपतराव शिंदे, मेघा पानसरे, श्री. म्हेत्री, प्रा. बन्ने, अशोक भंडारी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने जोर धरला आहे.


या चळवळीची दखल घेऊनच देवदासींच्या प्रश्‍नांसाठी शासनाने अभ्यासगट नेमला. समितीचा अहवाल घेतला. परंतु, देवदासी प्रथा निर्मूलन कायदा मंजूर करण्यापलीकडे त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी मात्र झटकली आहे. या घटकांना शासनाकडून पेन्शन मिळते. परंतु, वर्षानुवर्षे त्यापोटी त्यांना महिन्याला चारशे-पाचशेच मिळतात. दिवसेंदिवस वाढणार्‍या महागाईत हे शे-पाचशे कुठे पुरायचे, हा प्रश्‍न त्यांना सतावत असतो.


देवदासी प्रथा बंदी कायद्यामुळे मुलगी किंवा मुलगा देवीला सोडण्याची पिढ्यान्पिढ्या सुरू असलेली ही पद्धत आता बंद झाल्याने या घटकांची संख्या घटली आहे. परंतु, अस्तित्वातील देवदासी, जोगता, वाघ्या-मुरळी यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न वार्‍यावरच आहे. देवदासींच्या घरकुलांचा प्रश्‍न अधांतरी आहे. अनेक देवदासींची घरे कोसळली आहेत. तशाच अवस्थेत त्या राहत आहेत. 


परंतु, शासनाच्या योजनेतून अजून त्यांना घरकुल मंजूर नाही. दुरुस्तीचीही तरतूद केलेली नाही. रेशनवरही तोकडे धान्य मिळते. आठ दिवसही पुरत नाही इतक्या धान्यात महिना कसा काढायचा? असा प्रश्‍न हसूरचंपूची देवदासी कांबळे हिने केला. 


देवदासींना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनातर्फे शेंद्री माळावर देवदासी पुनर्वसन केंद्र सुरू केले. लोकरपासून विविध वस्तू बनविण्याचे हे केंद्र होते. शेकडो देवदासींना रोजगार मिळाला. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे हे केंद्रही बंद पडून पंधरा वर्षे उलटली. विविध वस्तू बनविण्याचे पुनर्वसन केंद्र पुन्हा सुरू करून कुशल देवदासी महिलांना रोजगार देण्याची मागणीही आजअखेर शासनाकडून बेदखल आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोदी सरकारने फसवले, ‘स्वच्छ भारत’ कर बंद केल्यानंतरही ह
‘होय मी लाभार्थी’वर सरकारची १३ कोटींची उधळण, मराठीतल्या
कंत्राटी महाभरती बेरोजगारांची थट्टाच
आरक्षणासाठी मातंग समाजातर्फे मंत्रालयावर मोर्चा, सरका
शीख दंगलप्रकरणी कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठे
राज्याकडून धनगर आरक्षणाची केंद्राकडे शिफारसच नाही
राज्य निवडणूक आयोगाचे सचिवही कंत्राटी निवृत्त, आयएएस अध
राम मंदिरासाठी अध्यादेश आणल्यास न्यायालयात जाऊ
जिकडे सत्ता तिकडे कोणीही पाणी भरण्यास तयार
नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत घसरण, रघुराम राजन या
बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनाची संघ परिवाराला भरली धडक
‘रामाच्या दासा’चे फिरले डोके, आठवलेंची चापलूसगिरी सुरू
महाराष्ट्रात अंगणवाडी घोटाळा; विद्यार्थी ६१ लाख, बोगस ८
‘मनुस्मृती’ जाळणे समानतेसाठी महत्त्वाचे, माजी उपमुख्य
ब्राम्हणवाद्यांकडून लव्ह जिहादला फोडणी, अलवरमध्ये हिंस
ब्राम्हणवाद्यांचे लाड पुरवण्यासाठी कुंभमेळ्याला ८०० व
राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयालाही मोदी सरकारने गंडव
गोवारींचे अन्नत्याग आंदोलन सुरू, आरक्षण देण्याची मागणी
मध्यप्रदेशमध्ये ३९ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, असोसि
मोदी सरकारला अखेरची घरघर, धनंजय मुंडे यांची टीका
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper