×

मोहन भागवत यांना मकोका लावण्याची मागणी

Published On :    12 Oct 2018
साझा करें:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याचा गंभीर आरोप करत भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.



मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याचा गंभीर आरोप करत भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या वेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरोधात मकोका लावून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.


प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरक्षणाच्या नावावर जिल्ह्याजिल्ह्यांत दंगली घडवल्या जात आहेत. दोन दिवस कर्फ्यू असताना संघाने रस्त्यावर बंदुका नाचवल्या. संघाकडे ही हत्यारे आली कुठून याचा शोध घ्यावा लागेल. नागपूर पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. 


मात्र पोलीस त्याचा शोध घेतील असे वाटत नाही. सर्वसामान्य माणसांकडे साधे हत्यार सापडले, तरी त्याच्यावर कारवाई होते. मग कायद्यानुसार मोहन भागवत यांच्यावर मकोका लावण्याचे धाडस पोलीस दाखवणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


पोलिसांनाही त्यांनी आवाहन केले. सर्व संघटनांकडे असणारी हत्यारे पोलिसांनी ताब्यात घ्यायला हवीत. आज धरणे आंदोलनावर थांबत आहोत. मात्र प्रशासनाने ही हत्यारे काढून घेतली नाहीत, तर राज्यातील सर्व रस्ते बंद करू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.


केंद्र सरकार सध्या ऑक्सिजनवर आहे. काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार व्हेंटिलेटरवर जाणाार आहे, असे भाकीतही आंबेडकर यांनी यावेळी केले. हिटलर होण्यासाठी हिटलरने आधी तेथील पोलीस खाते मारून टाकले होते. सत्ता जाण्याची वेळ आल्यावर याच संघटना तुमच्यावर बंदुका ताणल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशराही त्यांनी यावेळी दिला.


मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे किंवा संघाचे हे माहीत नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री या पदावर असून संविधानिक पदावर बसलेले आहात. त्यामुळे संविधानिक पदाचा अपमान होऊ द्यायचा नसेल, तर ज्याच्या-ज्याच्याकडे एके४७ आहे, अशा सर्व संघटनांकडील हत्यारे जप्त केली पाहिजेत. नाहीतर खुर्ची गेल्यावर कायदा तुम्हाला सोडणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला.


मलाही एके ४७ पाहिजे, यासाठी मी अर्ज करणार आहे. पोलीस खात्याकडे चालवण्याचे शिक्षण मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका संघटनेकडे सर्व हत्यारे, तर दुसर्‍या संघटनेकडे काहीच हत्यारे नाहीत. म्हणून हा ‘इशारा मोर्चा’ काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोदी सरकारने फसवले, ‘स्वच्छ भारत’ कर बंद केल्यानंतरही ह
‘होय मी लाभार्थी’वर सरकारची १३ कोटींची उधळण, मराठीतल्या
कंत्राटी महाभरती बेरोजगारांची थट्टाच
आरक्षणासाठी मातंग समाजातर्फे मंत्रालयावर मोर्चा, सरका
शीख दंगलप्रकरणी कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठे
राज्याकडून धनगर आरक्षणाची केंद्राकडे शिफारसच नाही
राज्य निवडणूक आयोगाचे सचिवही कंत्राटी निवृत्त, आयएएस अध
राम मंदिरासाठी अध्यादेश आणल्यास न्यायालयात जाऊ
जिकडे सत्ता तिकडे कोणीही पाणी भरण्यास तयार
नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत घसरण, रघुराम राजन या
बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनाची संघ परिवाराला भरली धडक
‘रामाच्या दासा’चे फिरले डोके, आठवलेंची चापलूसगिरी सुरू
महाराष्ट्रात अंगणवाडी घोटाळा; विद्यार्थी ६१ लाख, बोगस ८
‘मनुस्मृती’ जाळणे समानतेसाठी महत्त्वाचे, माजी उपमुख्य
ब्राम्हणवाद्यांकडून लव्ह जिहादला फोडणी, अलवरमध्ये हिंस
ब्राम्हणवाद्यांचे लाड पुरवण्यासाठी कुंभमेळ्याला ८०० व
राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयालाही मोदी सरकारने गंडव
गोवारींचे अन्नत्याग आंदोलन सुरू, आरक्षण देण्याची मागणी
मध्यप्रदेशमध्ये ३९ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, असोसि
मोदी सरकारला अखेरची घरघर, धनंजय मुंडे यांची टीका
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper