×

संभाजी ब्रिगेडने शिक्षण आयुक्त कार्यालयाला दिली दारुची बाटली

Published On :    12 Oct 2018
साझा करें:

सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने गुरुवारी आंदोलन केले.



पुणे : सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने गुरुवारी आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात दारुची बॉटल दिली.


सर्व शिक्षा अभियानात ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खर्‍या-खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. 


संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.


या पुस्तकावरुन संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात दारुच्या बॉटलसह धडक दिली. संतप्त कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले. मात्र, आयुक्त रजेवर असल्याने शेवटी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पीएला दारुची बॉटल देत या घटनेचा निषेध केला. 


‘संभाजी महाराज दारुच्या कैफात होते असा उल्लेख करुन त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे ठरवून ठेवलेले षडयंत्र आहे. असा भयंकर बदनामी करणारा मजकूर राज्य सरकारच्या पुस्तकात छापला जातो आणि सरकार, शिक्षण विभाग त्यास परवानगी देते हा निव्वळ करंटेपणा आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
वर्चस्व टिकवण्यासाठी विचारवंतांच्या हत्या-प्रकाश आंबे
मराठा आरक्षणामुळे नोकर्‍या मिळतील असे समजणे चुकीचे
कार्यक्रम आयोजकाच्या घरावर दगडफेक
पोलीस प्रशासनाच्या आडून आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज
उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मोदींविरोधी लाट
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्या देशभरात जेलभरो
वैद्यकीय महाविद्यालयांतील औषधांचाही साठा संपला!
राम मंदिरासाठी कायदा अशक्य-मोहन भागवत
भारतातील ९२ टक्के महिलांचे वेतन १० हजारांहून कमी
केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्या
साध्वी प्रज्ञा, पुरोहित विरुद्ध ‘यूएपीए’खाली चालणार खट
डोंबिवलीत फेरीवाल्यांचा रोजगार हक्क मोर्चा
मुसलमानांनी कॉंग्रेसला अजिबात मत देऊ नये-असदुद्दिन ओवे
बुध्दिमत्ता आहे, पण पैसा आणि यंत्रणा नाही
‘नोटा’चा वापर केल्यास तोटा होईल-मोहन भागवत
अशोका विजया दशमीचे महत्व संपवण्यासाठीच ब्राम्हणांनी आण
संविधान संपवणारेच बोलतात ‘संविधान खतरे में है’
गोंदिया जिल्ह्यात १०३८ बालेक कुपोषणाच्या श्रेणीत तर २२
निवडणूक आयोगाशी भिडणार -वामन मेश्राम
रामाणींवरील खटल्याची सुनावणी ३१ ला-एम. जे. अकबर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper