×

‘तितली’ चक्रीवादळाचे आंध्रात थैमान, ८ नागरिकांचा मृत्यू,

Published On :    12 Oct 2018
साझा करें:

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘तितली’ या प्रलयंकारी चक्रीवादळाने आज पहाटेच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला.



विशाखापट्टणम : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘तितली’ या प्रलयंकारी चक्रीवादळाने आज पहाटेच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. त्यानंतर ओडिशाच्या पूर्व सागरी किनार्‍याला धडकलेल्या या वादळामुळे या भागातील ३ लक्ष नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 


आंध्रच्या श्रीकाकुलाम आणि व्हिझियानगरम जिल्ह्यात ताशी १२० ते १५० किमी इतक्या प्रचंड वेगाने वाहणार्‍या वादळी वार्‍यांनी मोठा उत्पात माजवला. झाडे पडून आणि सुमारे २ हजार वीजखांब कोसळून झालेल्या दुर्घटनांत ८ जणांचे जीव गेले असून या दोन जिल्ह्यांतील रस्ते वाहतूक पार ठप्प झाली आहे. मृतांत ६ मच्छीमारांचाही समावेश आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ६७ मच्छीमारी नौकांपैकी ६५ सुरक्षित किनार्‍यावर परतल्या असून २ बेपत्ता नौकांचा शोध सुरू आहे.


‘तितली’ चक्रीवादळाने आज पहाटे उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टी ताशी १४० ते १५० किमी या तुफानी वेगाने पार केली. त्यामुळे आंध्रचे दोन जिल्हे आणि ओडिशाच्या ८ जिल्ह्यांत वादळी पावसाने थैमान घातले. ओडिशाच्या गंजम, खुर्धा, पुरी, जगतसिंगपूर, गजपती, केंद्रापारा, भद्रक आणि बालासोर या जिल्ह्यांना ‘तितली’ वादळाने गुरुवारी पहाटे जोरदार दणका दिला. 


त्यामुळे हजारो घरांचे पत्रे वार्‍याने उडाले, रस्त्यांवरील विजेचे हजारो खांब आणि झाडे उन्मळून पडली. चक्रीवादळग्रस्त जिल्ह्यांत मदतकार्यासाठी राज्य आपत्ती निवारण दले कार्यरत झाली आहेत. शिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण बलानेही (एनडीआरएफ) आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर बचावकार्य सुरू केले आहे.


ओडिशातील किनारपट्टीवरील नागरिकांना तितलीपासून संरक्षण मिळावे म्हणून ओडिशा सरकारने ३ लाख नागरिकांसाठी १११२ आश्रय शिबिरे उघडली आहेत. गंजममधील १०५ तर जगतसिंगपूरमधील १८ गर्भवती महिलांना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वादळाच्या प्रभावामुळे ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीवरील शाळा आणि महाविद्यालये पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.


‘तितली’च्या प्रकोपाने आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलाम आणि व्हिझियानगरम जिल्ह्यांत हजारो घरांचे पत्रे उडाले. शिवाय वीजपुरवठा करणारे २ हजार खांब वादळी वार्‍याने कोसळले. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ४३१९ गावांचा वीजपुरवठा खंडित होऊन ती अंधारात गेली आहेत. 


खांब कोसळल्याने किनारपट्टीवरील जिल्ह्यांना वीजपुरवठा करणार्‍या ईस्टर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीचे वीजपुरवठा नेटवर्क पार कोलमडले आहे. या वादळाच्या थैमानामुळे ईस्ट कोस्ट रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. वादळाने श्रीकाकुलाम आणि व्हिझियानगरम जिल्ह्यातील भातशेती, केळी, आंबा आणि नारळांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोदी सरकारने फसवले, ‘स्वच्छ भारत’ कर बंद केल्यानंतरही ह
‘होय मी लाभार्थी’वर सरकारची १३ कोटींची उधळण, मराठीतल्या
कंत्राटी महाभरती बेरोजगारांची थट्टाच
आरक्षणासाठी मातंग समाजातर्फे मंत्रालयावर मोर्चा, सरका
शीख दंगलप्रकरणी कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठे
राज्याकडून धनगर आरक्षणाची केंद्राकडे शिफारसच नाही
राज्य निवडणूक आयोगाचे सचिवही कंत्राटी निवृत्त, आयएएस अध
राम मंदिरासाठी अध्यादेश आणल्यास न्यायालयात जाऊ
जिकडे सत्ता तिकडे कोणीही पाणी भरण्यास तयार
नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत घसरण, रघुराम राजन या
बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनाची संघ परिवाराला भरली धडक
‘रामाच्या दासा’चे फिरले डोके, आठवलेंची चापलूसगिरी सुरू
महाराष्ट्रात अंगणवाडी घोटाळा; विद्यार्थी ६१ लाख, बोगस ८
‘मनुस्मृती’ जाळणे समानतेसाठी महत्त्वाचे, माजी उपमुख्य
ब्राम्हणवाद्यांकडून लव्ह जिहादला फोडणी, अलवरमध्ये हिंस
ब्राम्हणवाद्यांचे लाड पुरवण्यासाठी कुंभमेळ्याला ८०० व
राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयालाही मोदी सरकारने गंडव
गोवारींचे अन्नत्याग आंदोलन सुरू, आरक्षण देण्याची मागणी
मध्यप्रदेशमध्ये ३९ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, असोसि
मोदी सरकारला अखेरची घरघर, धनंजय मुंडे यांची टीका
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper