×

राज्यातील तब्बल ८५ लाख शेतकरी दुष्काळाच्या फेर्‍यात

Published On :    8 Nov 2018
साझा करें:

पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ८५ लाखांहून अधिक शेतकर्‍यांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे.



पुणे : पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ८५ लाखांहून अधिक शेतकर्‍यांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे. या शेतकर्‍यांचे साडेसात हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली आहे.


प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्रतेची पाहणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. हाती आलेल्या माहितीनुसार सोयाबीन, कापूस, तूर, भात या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर, मराठवाड्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ऊस वगळून १४० आणि ऊसासह क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र आहेत. 


त्या पैकी ऊस पिक वगळून १३९.३८ व ऊस पिकासह १४१.२९ लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवड झाली आहे. त्यातील ऊस वगळून ८० ते ८५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात कापूस, उशीरा पेरलेला सोयाबीन, तूर, ज्वारी आणि भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 


कापसाचे ४२.५८ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातील अंदाजे २० लाख हेक्टरला फटका बसला आहे. तर तूरीचा १२ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. तूरीच्या उत्पादनात निम्म्याने घट होईल असा अंदाज आहे.


२ हेक्टर खालील क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांचे तब्बल ५ हजार ३०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे. तर, २ हेक्टरवरील क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांना २ हजार २०० कोटींचा फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे. यात फळबागांचे १८३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.


मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी वगळून इतर भागाला मोठा फटका बसला आहे.


चार्‍याच्याही दुष्काळाची शक्यता-

राज्यात डिसेंबरनंतर चार्‍याची तीव्र टंचाई होण्याची भीती कृषी अधिकार्‍यांनी वर्तवली. त्यामुळे पशुधन जगविण्यासाठी सरकारला मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून चारा आणावा लागेल. मराठवाड्यात चार्‍याचा प्रश्‍न अधिक तीव्र असेल. विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये चारा छावण्यांचे नियोजन करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा! शरद पवार यां
कर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे
गडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे
पुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्
शिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का ? राजू शेट्टी
वर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष
नोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे? पृथ्वी
राष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’
सुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा
फेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली
‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख
राज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि
‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह
६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड
जिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब
यूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू!
मोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर
शिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.
सव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper