×

नाव ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ मात्र ‘आरएसएसच्या हातातील बाहुले’

Published On :    9 Nov 2018
साझा करें:

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखेर ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे.महाराष्ट्र: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखेर ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यासाठी ‘एक मराठा ..लाख मराठा’ अशा घोषणा देत लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. 


मराठा समाजाचे प्रश्‍न धसास लावण्यासाठी अशा राजकीय पक्षाची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. यानुसार राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा या नावाने पक्ष स्थापनेस मराठा समाजातील काही लोकांचा विरोध होता. म्हणून महाराष्ट्र क्रांती सेना या नावाने पक्ष स्थापन करण्यात आला आहे. परंतु सुरेश पाटील यांचा प्रवास बघितला तर पक्षाचे नाव महाराष्ट्र क्रांती सेना असले तरी हा पक्ष आरएसएस व भाजपाच्या हातातील बाहुले असण्याची जास्त शक्यता आहे.


महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास काही अपवाद सोडल्यास मराठाच मुख्यमंत्री झाल्याचे लक्षात येते. परंतु त्यांनाही मराठ्यांचे प्रश्‍न सोडवता आले नाहीत. आरक्षणासारखा महत्वाचा मुद्दा असूनही त्यावेळच्या नेतृत्वाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली. मोहीते-पाटील, पवार, घोरपडे, निंबाळकर, थोरात, विखे-पाटील, वळसे-पाटील, चव्हाण, राणे ही काही घराणे सोडली तर मराठ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. 


हीच घराणी श्रीमंत झाली. सर्वच मराठे आघाडीवर आहेत असे नाही. त्यांच्यासमोर जीवन मरणाचा प्रश्‍न आहे. ज्या मराठा समुदायातील नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले त्यांनाही आरक्षणाचा प्रश्‍न का सोडवता आला नाही. त्याला कारण मुख्यमंत्रीपदाचे पोझीशन दिले होते. म्हणजे बंगला, गाडी, नोकर-चाकर, दरवाजा ओढण्यासाठी शिपाई, सॅल्युट मारायला अधिकारी दिमतीला देण्यात आला होता. 


हे काय होते तर पोझीशन. मात्र ‘पॉवर’ नव्हती. ‘पॉवर’ म्हणजे स्वत:च्या समाजासाठी निर्णय घेण्याचा अधिकार. जर स्वत:च्या समाजासाठी निर्णय घेण्याचा अधिकार असता तर आरक्षणाचा विषय मार्गी लागला असता. म्हणजेच खचितच तो अधिकार ब्राम्हणांकडे होता. म्हणजे कॉंग्रेसची स्थापना मराठ्यांनी केली नव्हती तर ब्राम्हणांनी केली होती. 


परंतु याच पक्षात मराठ्यांचा जास्त भरणा आहे. तीच गत भाजपाची आहे. भाजपाचीही स्थापना मराठ्यांनी केलेली नाही तर ब्राम्हणांनीच केली आहे. परंतु भाजपामध्येही मराठेच जास्त आहेत. तुम्ही विधानसभेच्या २८८ आमदारांच्या यादीवर लक्ष टाकल्यास कॉंग्रेस व भाजपामध्ये बहुतांश मराठाच आमदार आहेत. हर्षवर्धन जाधव व अन्य एक-दोन आमदार सोडले तर मराठा आरक्षणावर कुणीच राजीनामा दिलेला नाही. 


मराठ्यांना आरक्षण लागू न केल्यास आम्ही आमदारकीचा राजीनामा देतो किंवा सरकारमध्ये आम्हांला रहायचेच नाही असे सर्वपक्षीय मराठा आमदारांनी धमकावले असते तर ब्राम्हणांची पाचावर धारण बसली असती. कारण सरकारच गडगडले असते. भाजपाच्या १२२ पैकी ब्राम्हणांचे ६ आमदार सोडले तर सर्वच बहुजन समाजातील मराठा व तत्सम जातीतील आहेत. परंतु त्यांच्या डोक्यातच ब्राम्हणवाद घुसल्याने काहीच चालत नाही. एवढ्या बहुजनांना डावलून पेशवा असलेल्या ब्राम्हणाला मुख्यमंत्री केला. 


तरीही लोकांच्या लक्षात येत नाही. आता तर आरएसएस संघचालक मोहन भागवत यांनी सांगितले आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्याचबरोबर केतन तिरोडकर नावाचा ब्राम्हण कोर्टात गेला आहे. म्हणजे ३.५ टक्के असलेला विदेशी ब्राम्हण येथील मूलनिवासी लोकांचे भवितव्य ठरवत आहे. 


महाराष्ट्र क्रांती सेनेसारखा अण्णासाहेब जावळे व शालिनीताई पाटील यांनी २००७ मध्ये क्रांती सेना नावाचा पक्ष स्थापन केला होता. तर पुरूषोत्तम खेडेकर यांनीही संभाजी ब्रिगेड नावाचा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षांना म्हणावा तसा प्रभाव पाडता आलेला नाही.


मराठ्यांना आरक्षण मिळू शकते. त्यासाठी आज जे समुदाय आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांचा एक गट तयार करायला हवा. महाराष्ट्रात मराठा, धनगर, गुजरातमध्ये पटेल, हरियाणात जाट, राजस्थानमध्ये गुर्जर यांचा एबीसी म्हणजे ऍडीशनल बॅकवर्ड क्लास अशी तरतूद करून घटना दुरूस्ती करावी लागेल. 


परंतु शासक असलेला ब्राम्हण या घटकांना आरक्षण देईल असे वाटत नाही. कारण एकमेकांत भांडणे लावायची मात्र कामे केली जातील. त्या माध्यमातून स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रयत्न होईल. महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाची स्थापना करणारे सुरेश पाटील हे नितीन गडकरी व चंद्रकांत पाटील यांच्या हातातील बाहुले आहेत अशी विश्‍वसनीय माहिती हाती आली आहे. 


तर इचलकरंजीत सुरेश पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेशही केला होता. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे नामक विकृत व्यक्तीचाही ते समर्थक आहेत. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपानेच पाटील यांना कामाला लावले नसेल कशावरून? असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे ज्यांचे विचारच स्वतंत्र नाहीत, ज्यांच्या मेंदूवर आरएसएसच्या लोकांच्या कब्जा असेल तर या पक्षाला भवितव्य नाही व महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाची भर पडली एवढेच म्हणावे लागेल.

दिलीप बाईत

९२७०९६२६९८

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
माजी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाईची परवानगी देण्यास राज्
प्रकाश आंबेडकर यांचा इतिहास कच्चा
१२ महिन्यांत ७१ शेतकर्‍यांनी संपविली जीवनयात्रा
चवदार तळे समता संगर मानवी मूल्ये प्रस्थापित करण्यासाठी!
बहुजन मुक्ती पार्टी उत्तर अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी ज
गुजरात मॉडेल राज्य नाही, राज्यात ५५ लाख तरुण बेरोजगार
भाजपाविरोधात एकजूट झाल्या ७० संघटना
सोन्याचे बिस्किट घेऊन नीरव मोदींना अटक करणे टाळले
‘होळी’ : फुगे, पाण्याच्या पिशव्या फेकणार्‍याना थेट तुरुं
भाजपचे खासदार साक्षी महाराजविरुद्ध उच्च न्यायालयात याच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा
मोदी सरकार भारताला एक असफल देश बनवू इच्छितात
केंब्रिज ऍनालिटिकाद्वारे डेटा चोरीची फेसबुकला होती माह
मनोहर पर्रिकर म्हणजे राफेल प्रकरणाचा पहिला बळी
फक्त २ हजारांची मदत मिळालेल्या शेतकर्‍याने मागीतले इच्
‘मोटा भाई’ने अनिल अंबानींना तुरुंगात जाण्यापासून वाचवल
प्राध्यापक भरती थंडावल्याने उमेदवारांमध्ये चिंतेचे वा
खासदार की मालदार? खासदारांच्या संपत्तीत १४२ टक्क्यांची
‘भविष्यात काही लोकच सर्वांवर नियंत्रण ठेवतील’
सत्ताधार्‍यांनी लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने रामदेव
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper