×

बाबासाहेबांचे क्रांती विज्ञान समाजात पेरा, ताराचंद खांडेकर यांचे आवाहन

Published On :    4 Dec 2018
साझा करें:

विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावाद जागतिक पातळीवर पोहोचविला. महाडचा सत्याग्रह, संविधान निर्मिती आणि धम्मदीक्षेचे क्रांतिशास्त्र हे सर्व मानव कल्याणासाठी होते.



नागपूर : विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावाद जागतिक पातळीवर पोहोचविला. महाडचा सत्याग्रह, संविधान निर्मिती आणि धम्मदीक्षेचे क्रांतिशास्त्र हे सर्व मानव कल्याणासाठी होते. 


त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांचे क्रांतिविज्ञान समाजात पेरा, असे आवाहन प्रसिध्द विचारवंत ताराचंद खांडेकर यांनी केले. रिपब्लिकन मुव्हमेंट या साप्ताहिकाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित दिवसभराच्या वैचारिक मंथन कार्यक्रमाचे समारोप करताना ते बोलत होते. उर्वेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


यावेळी प्रसिध्द आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी ‘गेल्या साठ वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीला आम्ही कोणत्या स्तरावर घेऊन आलो आहोत आणि आमची जबाबदारी काय याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी खंत व्यक्त केली. 


पहिल्या सत्रात पुण्याचे धर्मराज निमसरकार, का. रा. वालदेकर, बुलडाण्याचे सुरेश साबळे, उस्मानाबादच्या अस्मिता मेश्राम, डॉ. सविता कांबळे, धम्मचारी पद्मबोधी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. धम्मचारी पद्मबोधी यांनी ‘आंबेडकरी चळवळ म्हणजे नेमके काय, आंबेडकरी चळवळीचे ध्येय काय, आणि ते गाठण्यासाठी साधने कोणती, असे प्रश्न उभे करीत ध्येय स्पष्ट नसेल तर आंदोलन भरकटत जाते, आंदोलन दिशाहीन होते, याकडे लक्ष वेधले. 


यावेळी ज्येष्ठ चित्रकार अरुण मोटघरे, प्राचार्य भाऊ वासनिक, डॉ. राजाभाऊ टाकसाळे, अशोक सरस्वती, संजय शेंडे, प्रा. रमेश राठोड, पल्लवी जीवनतारे, अनिकेत कुत्तरमारे, सिध्दांत पाटील, शितल गडलिंग, आणि प्रशांत बेले यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संपादक नरेश वाहणे यांनी केले. संचालन कवी संजय गोडघाटे व शीतल गडलिंग यांनी केले. विलास भोंगाडे यांनी आभार मानले.


लोकशाही वाचवणे ही काळाची गरज

देशात अराजकतेचे वातावरण आहे. धर्मसत्तेचा सरकारवर अंकुश आल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. तेव्हा लोकशाही वाचवणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कवी इ.मो.नारनवरे यांनी यावेळी दुसर्‍या सत्रातील मुक्तचर्चेत व्यक्त केले. आर्किटेक्ट नरेंद्र शेलार यांनी प्राक्कथन केले. अस्मिता मेश्राम, सुरेश साबळे, विजय बौध्द, पल्लवी जिवनतारे, मयूर रंगारी, प्रशांत बेले, अशोक सरस्वती, अशोक मस्के, सुधीर भगत, हरीश नागदेवे, सिध्दांत पाटील, भीमराव गणवीर आदींनी भाग घेतला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मूल नसणार्‍या मोदींना बुलंदशहर हिंसाचाराचे दु:ख कसे कळे
रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे संरक्षण आवश्यकच. -माजी म
८ टक्के लोकांना मताधिकार नाकारून तुम्ही माफी कशी काय माग
लोकसभेपूर्वी भाजपला धक्का, उपेंद्र कुशवाह ‘एनडीए’तून ब
कारगिल युध्दाची अडवाणींना गुप्त माहिती दिली होती?
जुने माफ होईना, नवीन कर्ज देईना - विपन्नावस्थेत सापडला शे
आरबीआयच्या कामात ढवळाढवळ खपवून घेणार नाही!
आरक्षणाच्या आडून समाजांमध्ये वाद लावण्याचा खटाटोप. -शरद
मराठा, मुस्लिम हेच देशाचे खरे वॉरियर्स
विकास होत नसल्याने दुर्गम भागातील गावे ओसाड
विजय मल्यासाठी आर्थर रोड कारागृहातील तयारी पूर्ण
कवडीमोलामुळे १ हजार ५०० किलो कांद्याचे फुकटात वाटप
मराठा, मुस्लिम हेच देशाचे खरे वॉरियर्स. -शहजादे मन्सूर अल
पदव्यांच्या भेंडोळ्यांवर भलेमोठे प्रश्‍नचिन्हच!, मुंबई
राम नाईकांचा शिक्षा माफीचा आदेश रद्द, सर्वोच्च न्यायालय
मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्याने मेगाभरतीचा पुनर्व
आम्ही काय वाचायचे हे तुम्ही नाही सांगायचे, सावित्रीबाई फ
मराठा आरक्षण मृगजळ, अवलंबून राहू नका, संभाजी ब्रिगेडचे प
ब्राम्हणांचा लाळघोटेपणा करणार्‍या आठवलेंविरोधात उद्र
इंधन दरवाढीचे चटके भाजपला २०१९ मध्ये बसणार!, मोदींची चिं
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper