×

अनु.जातीच्या हनुमानाला ब्राम्हणवादी रामाने गुलाम बनवले

Published On :    5 Dec 2018
साझा करें:

भाजप खासदार सावित्रीबाई फुले यांनी साधला निशाणा



लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी हनुमान अनु.जातीचा होता असे सांगून आणखी एका वादाला तोंड फोडले होते. आता या वादात बहराईच येथील भाजप खासदार सावित्रीबाई फुले उतरल्या असून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. अनु.जातीच्या हनुमानाला ब्राम्हणवादी रामाने गुलाम बनवले. हनुमान अनु.जातीचा असल्यामुळेच ब्राम्हणवाद्यांनी त्याला गुलाम बनवल्याचे त्या म्हणाल्या. राम शक्तीहीन होता असेही त्यांनी सांगत ब्राम्हणांना ललकारले आहे. 


हनुमान माणूस असून अनु.जातीचा होता. अनु.जातीचा असल्यानेच रामाने त्याला गुलाम बनवले. त्याला अपमानित करण्यात आले. माणूस असूनही त्याला माकडाचा चेहरा दाखवण्यात आला. फक्त अनु.जातीचा असल्यानेच ब्राम्हणवादी रामाने हनुमानाला अपमानीत केल्याचे त्यांनी सांगितले. 


अनु.जातीला आणि मागासवर्गाला माकड म्हणून हिणवले जात होते. माणूस असूनही हनुमानाला माकड दाखवण्याचे काम ब्राम्हणवादी रामाने केले आहे. त्या काळापासूनच अनु.जातींचा अपमान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ब्राम्हणवादाने अनु.जातींना कधीही माणसासारखी वागणूक दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.


राम मंदिराचा वाद सर्वोच्च न्यायालयात असूनही भाजपकडे दुसरा मुद्दा नसल्याने त्यांच्याकडून निवडणुकांच्या वेळी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो. राम मंदिराची देशाला गरज नाही. राम मंदिर बांधल्याने अनु.जातींचा आणि मागास समाजाचा विकास होणार आहे काय, अनु.जातीची बेरोजगारीची समस्या सुटणार आहे काय असा सवाल करत भाजपने राम मंदिराचे राजकारण थांबवावे असा सल्ला देत त्यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. 


राममंदिर निर्माण झाल्याने फक्त तीन टक्के असलेल्या ब्राह्मणांचाच फायदा होणार आहे. आम्हाला आमचे अधिकार द्या, नाहीतर खुर्ची खाली करा असा इशाराही त्यांनी भाजपला दिला. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपने मोठा ‘गेम’ खेळलाय, शत्रुघ्न सिन्हांना संशय
भाजपचा विजय हा जनभावनेचा पराजय
या निवडणुकीत हेराफेरी झाल्याची शक्यता
मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमक
सर्वोेच्च न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण केली नाही-चेलमेश
भूषण गवईंसह चौघांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी न
ब्राम्हण- बनियांचे वृत्तपत्र, वाहिनी आणि पत्रकार !
थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग
‘भाजपाच्या ईव्हीएम सेटींगची कमाल आणि दलाल मीडियाची धमा
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्यापासून बेमुदत भारत बंद
भाजपाने निकालाची लुटमारी केल्यास रस्त्यावर रक्ताचे पाट
​युती शासनाच्या चार वर्षांत मच्छिमारांचे ३२ कोटी रखडले
‘एक्झिट पोलवर बंदी घाला’, बाबू कवळेकर यांची मागणी
लोकसभा निवडणूक निकालाची उद्या नौटंकी
फडणवीस सरकारकडून शेतकर्‍याची क्रूर थट्टा
निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब
जगभरात बॅलेट पेपर स्विकारला जात असताना भारतातच ईव्हीएम
गाजीपूर, चंदौली, मऊ, वाराणसीत ईव्हीएम बदलण्याच्या अफवेने
मुलायमसिंह- अखिलेश यादव यांना दिलासा
दिल्लीत २१ विरोधी पक्षांची ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर महत
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper