×

महामानवाला अभिवादन करण्यासाठी लोकांची पावले चैत्यभूमीकडे

Published On :    5 Dec 2018
साझा करें:

महापालिकेची चोख व्यवस्था



मुंबई : विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लोकांनी चैत्यभूमीकडे कूच केली आहे. कितीही प्रसंग आले तरी लोक या महापरिनिर्वाणाला देशाच्या कानाकोपर्‍यातून हजेरी लावतात. 


जनसागरामुळे दादरची चैत्यभूमी फुलली असून जिकडे पहावे तिकडे निळे झेंडे फडकताना दिसत आहेत. ठिकठिकाणी ‘जय भीम’चा नारा घुमला असून अनेकंांनी बाबासाहेबांच्या डीव्हीडी, व्हीसीडी विक्रीला आणले आहेत. तर पुस्तकांचे स्टॉलही लक्ष वेधून घेत असून यामध्ये मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्टचा स्टॉलही लक्षवेधक असून याच ठिकाणी पुस्तके खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. 


दरम्यान हा महापरिनिर्वाण दिन सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई महापालिकेनेही कसून तयारी केली आहे. मुंबईत येणार्‍या अनुयांयाकरिता महानरपालिकेने चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉ.आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थान यासठिकाणी नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 


चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येणार्‍या अनुयायांना आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवार्‍याची सोय म्हणून शिवाजी पार्क परिसरातील महापालिकेच्या ७ शाळा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. १० हजार अनुयायांची यामध्ये व्यवस्था होऊ शकते अशी माहिती परिमंडल २ चे उपायुक्त नरेंद्र बरडे यांनी दिली.


महापालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.आंबेडकरांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. या प्रतींचे विनामूल्य वितरण करण्यात येते. माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्याहस्ते झाले. महापालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह, डॉ.आंबेडकर महाविद्यालय वडाळा, कुर्ला टर्मिनस येथे नागरी सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 


चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे शामियाना व व्हीआयपी कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था, चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृहाजवळ रूग्णवाहिकेची सोय, १ लाख चौरस फुट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा, १८ फिरती शौचालये, ३८० पिण्याच्या पाण्याच्या नळाची व्यवस्था, १६ टँकर्स, विद्युत व्यवस्था, अग्निशमन दलाची व्यवस्था, चौपाटीवर सुरक्षारक्षक तैनात, मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण, ४६९ स्टॉलची रचना, दादर रेल्वे स्थानकांजवळ नियंत्रण कक्ष, राजगृह येथे नियंत्रण व वैद्यकीय कक्ष, स्काऊट गाईड हॉल येथे भिक्खू निवासाची व्यवस्था, भ्रमणध्वनी चार्जिंगसाठी शिवाजी पार्क येथे ३०० पॉईंटची व्यवस्था, फायबरच्या २०० तात्पुरत्या स्नानगृहाची व ६० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मूल नसणार्‍या मोदींना बुलंदशहर हिंसाचाराचे दु:ख कसे कळे
रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे संरक्षण आवश्यकच. -माजी म
८ टक्के लोकांना मताधिकार नाकारून तुम्ही माफी कशी काय माग
लोकसभेपूर्वी भाजपला धक्का, उपेंद्र कुशवाह ‘एनडीए’तून ब
कारगिल युध्दाची अडवाणींना गुप्त माहिती दिली होती?
जुने माफ होईना, नवीन कर्ज देईना - विपन्नावस्थेत सापडला शे
आरबीआयच्या कामात ढवळाढवळ खपवून घेणार नाही!
आरक्षणाच्या आडून समाजांमध्ये वाद लावण्याचा खटाटोप. -शरद
मराठा, मुस्लिम हेच देशाचे खरे वॉरियर्स
विकास होत नसल्याने दुर्गम भागातील गावे ओसाड
विजय मल्यासाठी आर्थर रोड कारागृहातील तयारी पूर्ण
कवडीमोलामुळे १ हजार ५०० किलो कांद्याचे फुकटात वाटप
मराठा, मुस्लिम हेच देशाचे खरे वॉरियर्स. -शहजादे मन्सूर अल
पदव्यांच्या भेंडोळ्यांवर भलेमोठे प्रश्‍नचिन्हच!, मुंबई
राम नाईकांचा शिक्षा माफीचा आदेश रद्द, सर्वोच्च न्यायालय
मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्याने मेगाभरतीचा पुनर्व
आम्ही काय वाचायचे हे तुम्ही नाही सांगायचे, सावित्रीबाई फ
मराठा आरक्षण मृगजळ, अवलंबून राहू नका, संभाजी ब्रिगेडचे प
ब्राम्हणांचा लाळघोटेपणा करणार्‍या आठवलेंविरोधात उद्र
इंधन दरवाढीचे चटके भाजपला २०१९ मध्ये बसणार!, मोदींची चिं
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper