×

ओवेसींचे भाषण भाजपने लिहिलेले असते

Published On :    5 Dec 2018
साझा करें:

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांचा दावा



मुंबई : ‘एमआयएम’चे ओवेसी जे बोलतात, त्याची स्क्रीप्ट भाजपने लिहून दिलेली असते. त्यातून त्यांच्या जागा वाढो वा न वाढो, पण देशातील हिंदू-मुस्लिम वातावरण दूषित करण्याचा त्यामागे उद्देश असतो. त्यामुळे ‘एमआयएम’ व भाजप यांच्यात नुरा कुस्ती सुरू आहे असा दावा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केला. 


अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आझमी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, राम मंदिरावरून ‘एमआयएम’ व भाजप यांच्यात नुरा कुस्ती सुरू आहे. मंदिर तोडून मशिद बांधणे हे इस्लामलाच मान्य नाही.


त्यामुळे राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनाच मान्य असेल. पण राम मंदिर, भारत-पाकिस्तान यासारख्या विषयांवरून जनतेत भ्रम निर्माण केला जात आहे. अन्य विषयांपेक्षा राम मंदिरासारख्या विषयावरून जातीय दंगे घडवण्याचा व त्यातून सत्ता मिळवण्याचा भाजपचा विचार आहे. 


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. मुंबईतील युपीवाल्यांच्या विचारपीठावर जाऊन त्यांच्या भागाचा विकास युपीतील नेत्यांनी केला नसल्याचे भाषण गरीब जनतेला ऐकवून काय उपयोग? युपीचा विकास न केल्याबद्दल राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्यासारख्यांना जबाबदार धरावे. 


राज ठाकरेंचे राजकारण जनतेला मूर्ख बनवण्याचे आहे. युपीतील त्यांच्या नेत्यांनी विकास केला नसल्याने त्यांना येथे पोटापाण्यासाठी यावे लागल्याचे सांगितले. पण त्या गरीब लोकांना हे सांगून काय उपयोग? एखाद्या प्रदेशाचा विकास करणे हे केंद्र सरकारचे काम आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपने मोठा ‘गेम’ खेळलाय, शत्रुघ्न सिन्हांना संशय
भाजपचा विजय हा जनभावनेचा पराजय
या निवडणुकीत हेराफेरी झाल्याची शक्यता
मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमक
सर्वोेच्च न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण केली नाही-चेलमेश
भूषण गवईंसह चौघांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी न
ब्राम्हण- बनियांचे वृत्तपत्र, वाहिनी आणि पत्रकार !
थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग
‘भाजपाच्या ईव्हीएम सेटींगची कमाल आणि दलाल मीडियाची धमा
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्यापासून बेमुदत भारत बंद
भाजपाने निकालाची लुटमारी केल्यास रस्त्यावर रक्ताचे पाट
​युती शासनाच्या चार वर्षांत मच्छिमारांचे ३२ कोटी रखडले
‘एक्झिट पोलवर बंदी घाला’, बाबू कवळेकर यांची मागणी
लोकसभा निवडणूक निकालाची उद्या नौटंकी
फडणवीस सरकारकडून शेतकर्‍याची क्रूर थट्टा
निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब
जगभरात बॅलेट पेपर स्विकारला जात असताना भारतातच ईव्हीएम
गाजीपूर, चंदौली, मऊ, वाराणसीत ईव्हीएम बदलण्याच्या अफवेने
मुलायमसिंह- अखिलेश यादव यांना दिलासा
दिल्लीत २१ विरोधी पक्षांची ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर महत
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper