×

..तर चैत्यभूमीवर मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाही, भीम आर्मीचा इशारा

Published On :    5 Dec 2018
साझा करें:

विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थान आणि समाधीस्थळ असलेल्या दादर येथील रेल्वेस्थानकाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ असे नाव देण्याची घोषणा सरकारने ६ डिसेंबरपूर्वी करावी, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे.मुंबई : विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थान आणि समाधीस्थळ असलेल्या दादर येथील रेल्वेस्थानकाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ असे नाव देण्याची घोषणा सरकारने ६ डिसेंबरपूर्वी करावी, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. नामांतर न झाल्यास महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही या संघटनेने दिला आहे. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वांत विद्वान व्यक्ती म्हणून उल्लेख करत कोलंबिया विद्यापीठाने त्यांचा पुतळा उभारला आहे. केंद्र सरकारनेही दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिलची जागा डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी देऊ केली आहे. परंतु, या कामाची अद्याप एक वीटही रचली गेली नाही याची खंत वाटते, असे भीम आर्मीचे महाराष्ट्रप्रमुख अशोक कांबळे यांनी म्हटले आहे.


महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला देश-विदेशातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे याच दिवशी दादर रेल्वेस्थानकाच्या नामांतराची घोषणा सरकारने करावी, अशी मागणी या संघटनेचे महासचिव सुनील थोरात यांनी केली. 


या संघटनेने ६ डिसेंबर २०१७ आणि १४ एप्रिल २०१८ रोजी दादर स्थानकाचे प्रतीकात्मक नामांतर करून या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्री, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे (सीएसएमटी) मुख्य व्यवस्थापक आणि रेल्वे मंत्रालयाला निवेदने दिली आहेत. त्यामुळे सरकारने या नामांतरासाठी आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनाची वाट पाहू नये, असा इशाराही भीम आर्मीने दिला आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मूल नसणार्‍या मोदींना बुलंदशहर हिंसाचाराचे दु:ख कसे कळे
रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे संरक्षण आवश्यकच. -माजी म
८ टक्के लोकांना मताधिकार नाकारून तुम्ही माफी कशी काय माग
लोकसभेपूर्वी भाजपला धक्का, उपेंद्र कुशवाह ‘एनडीए’तून ब
कारगिल युध्दाची अडवाणींना गुप्त माहिती दिली होती?
जुने माफ होईना, नवीन कर्ज देईना - विपन्नावस्थेत सापडला शे
आरबीआयच्या कामात ढवळाढवळ खपवून घेणार नाही!
आरक्षणाच्या आडून समाजांमध्ये वाद लावण्याचा खटाटोप. -शरद
मराठा, मुस्लिम हेच देशाचे खरे वॉरियर्स
विकास होत नसल्याने दुर्गम भागातील गावे ओसाड
विजय मल्यासाठी आर्थर रोड कारागृहातील तयारी पूर्ण
कवडीमोलामुळे १ हजार ५०० किलो कांद्याचे फुकटात वाटप
मराठा, मुस्लिम हेच देशाचे खरे वॉरियर्स. -शहजादे मन्सूर अल
पदव्यांच्या भेंडोळ्यांवर भलेमोठे प्रश्‍नचिन्हच!, मुंबई
राम नाईकांचा शिक्षा माफीचा आदेश रद्द, सर्वोच्च न्यायालय
मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्याने मेगाभरतीचा पुनर्व
आम्ही काय वाचायचे हे तुम्ही नाही सांगायचे, सावित्रीबाई फ
मराठा आरक्षण मृगजळ, अवलंबून राहू नका, संभाजी ब्रिगेडचे प
ब्राम्हणांचा लाळघोटेपणा करणार्‍या आठवलेंविरोधात उद्र
इंधन दरवाढीचे चटके भाजपला २०१९ मध्ये बसणार!, मोदींची चिं
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper