×

कर्नाटकात तृतीयपंथीयाला मिळाली सरकारी नोकरी, या घटनेने अन्य राज्यांपुढे आदर्श

Published On :    6 Dec 2018
साझा करें:

एका तृतीयपंथीयाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी देऊन कर्नाटक विधान परिषदेने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. लैंगिक अल्पसंख्याक समुदायाला दिलासा देणार्‍या या घटनेने देशातील अन्य राज्यांपुढे आदर्श ठेवला आहे.



बेळगाव: एका तृतीयपंथीयाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी देऊन कर्नाटक विधान परिषदेने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. लैंगिक अल्पसंख्याक समुदायाला दिलासा देणार्‍या या घटनेने देशातील अन्य राज्यांपुढे आदर्श ठेवला आहे.


मोनिषा असे या तृतीयपंथीय कर्मचार्‍याचे नाव आहे. विधान परिषद सचिवालयात मोनिषा आतापर्यंत हंगामी तत्त्वावर काम करत होती. परंतु, सचिवालयाने आता तिला ‘ड’ गट कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी नोकरीत घेतले आहे. येथील सुवर्णसौंधमध्ये होणार्‍या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी बुधवारी ही माहिती दिली.


कर्नाटक सरकारने ‘ड’ गट कर्मचार्‍यांच्या भरतीसाठी २०१६ मध्ये अर्ज मागवले होते. त्यावेळी मोनिषा विधान परिषद सचिवालयात कंत्राटी पध्दतीने काम करत होती. तिने कायमस्वरूपी नोकरीसाठी अर्ज केला. परंतु, अनेक कारणांवरून तिचा अर्ज फेटाळण्यात आला. यावर मोनिषाने लैंगिक अल्पसंख्याकांबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. 


न्यायालयानेही सरकारला तिच्या अर्जावर विचार करण्यास सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्याऐवजी काही अटींवर तिची सेवा नियमित करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती विधान परिषदेच्या प्रभारी सचिव के. आर. महालक्ष्मी यांनी दिली.


तरतूद नसताना नेमणूक...

कर्नाटकच्या कायद्यानुसार लैंगिक अल्पसंख्याकांना नोकरीत आरक्षणाची तरतूद नाही, तरीही मोनिषाला सेवेत कायम करण्याचा निर्णय सभापती होरट्टी यांनी घेतला. उमेदवाराने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे आणि नावातील चुका दुरुस्त कराव्यात, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. त्यांचे पालन केल्यावर मोनिषा कायमस्वरूपी सरकारी नोकर झालेली पहिली तृतीयपंथीय ठरली आहे

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपने मोठा ‘गेम’ खेळलाय, शत्रुघ्न सिन्हांना संशय
भाजपचा विजय हा जनभावनेचा पराजय
या निवडणुकीत हेराफेरी झाल्याची शक्यता
मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमक
सर्वोेच्च न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण केली नाही-चेलमेश
भूषण गवईंसह चौघांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी न
ब्राम्हण- बनियांचे वृत्तपत्र, वाहिनी आणि पत्रकार !
थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग
‘भाजपाच्या ईव्हीएम सेटींगची कमाल आणि दलाल मीडियाची धमा
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्यापासून बेमुदत भारत बंद
भाजपाने निकालाची लुटमारी केल्यास रस्त्यावर रक्ताचे पाट
​युती शासनाच्या चार वर्षांत मच्छिमारांचे ३२ कोटी रखडले
‘एक्झिट पोलवर बंदी घाला’, बाबू कवळेकर यांची मागणी
लोकसभा निवडणूक निकालाची उद्या नौटंकी
फडणवीस सरकारकडून शेतकर्‍याची क्रूर थट्टा
निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब
जगभरात बॅलेट पेपर स्विकारला जात असताना भारतातच ईव्हीएम
गाजीपूर, चंदौली, मऊ, वाराणसीत ईव्हीएम बदलण्याच्या अफवेने
मुलायमसिंह- अखिलेश यादव यांना दिलासा
दिल्लीत २१ विरोधी पक्षांची ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर महत
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper