×

धनदांडग्यांना हाताशी धरून मोदी देश लुटायला निघालेत

Published On :    11 Jan 2019
साझा करें:

छगन भुजबळ यांची फटकेबाजी



महाड : ज्या अनिल अंबानींनी साधे खेळण्यातले विमान कधी बनवले नाही त्या अंबानींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संरक्षणासाठी वापरले जाणारे लढाऊ राफेल विमान बनवण्याचे कंत्राट बहाल केले. हे अत्यंत गंभीर आहे. नोटाबंदी, महागाई, बेरोजगारी आणि शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचे मोदींनी आत्मविश्‍वासाने दिलेले आश्वासन तर फेल गेलेच, पण त्यांचे शेवटचे राफेलही फेल गेले अशी जबरदस्त फटकेबाजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली.


राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादीची राज्यव्यापी निर्धार यात्रा सुरू झाली. ‘एक चाय बेचनेवाला प्रधानमंत्री देश बेचने निकला है’, असा टोला मोदींना हाणत भुजबळ म्हणाले, नाशिकसारख्या ठिकाणी विमाने बनवण्याचा कारखाना असताना राफेल विमान बनवण्याचे काम त्या कारखान्याला दिले गेले नाही. 


या कारखान्याने आजवर अनेक लढाऊ व खासगी प्रवासी विमाने बनवली आहेत. या अनुभवी कारखान्याला डावलले. ही शोकांतिका आहे आणि हा निर्णय देशाला आणखीनच देशोधडीला लावणारे आहे. यावरूनच मोदी धनदांडग्यांना हाताशी धरून देश लुटायला निघाले आहेत हे सिध्द झाले, असा आरोपच भुजबळ यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, नवाब मलिक, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड यांसह अन्य नेते उपस्थित होते.


दिल्लीतील हुकूमशहा विरोधात आमचा लढा

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिल्लीतील बादशहाविरोधात लढा दिला होता. आताही भाजपच्या सरकारचा कारभार हुकूमशहासारखाच असून याविरोधात आम्ही परिवर्तनाची लढाई सुरू केली आहे. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी सन्मान योजना सुरू केली. 


मात्र ही योजना तळागाळापर्यंत पोहोचलीच नाही. हा महाराजांचा अपमान आहे. इतकेच काय तर या तुघलकी कारभारामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटनाही धोक्यात आली आहे. त्यामुळे या सरकारला खड्यासारखा बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपाचे सगळे ‘चौकीदार’ चोर
धार्मिक हिंसाचार घटनांच्या सदोष तपासामुळे गुन्हेगार मो
देशात भाजप- कॉंग्रेस अपयशी ठरले
शिवसेनेच्या सोशल इंजिनीयरिंगला उतरती कळा
वारणा, भीमा पाटस आणि जय महेशवर कारवाईचा बडगा
राज्यातील ३९ लाख मतदारांची नावे यादीतून गहाळ
आचारसंहिता न पाळल्यास सहा महिने शिक्षा
हा कसला चौकीदार?
मतांसाठी जवान मारण्यात आले
खासदार शेट्टींच्या दत्तक गावात पाण्यासाठी नागरिक स्त्र
राज्यात स्वाइन फ्लूचा जोर वाढला
बांदिवडेकर यांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात
भाजपच्या पहिल्या यादीत १९ टक्के गुन्हेगारी पार्श्‍वभूम
अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात अनियमतता, सार्वजन
भारताने बालाकोटमध्ये खरंच ३०० दहशतवादी मारले का?
खाजगीकरणातून विकासाची दारे बंद करण्याचा डाव
आरएसएसशिवाय पार्टी चालू शकत नाही, संघ पॉवर प्लांट तर खास
श्रीलंकेत ४ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक
संघाच्या मर्जीशिवाय भाजपा नेत्यांना मिळत नाहीत पदे
आयुष्यमान भारत योजना खाजगी रुग्णालये आणि विमा कंपन्यां
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper