×

‘आर्थिक आरक्षणाने जातीय तेढ कमी होईल’

Published On :    11 Jan 2019
साझा करें:

रामाचा दास आठवलेंनी ब्राम्हणांची उचलून धरली तळी, गुलामगिरीचा आणखी एक इरसाल नमुना सादर



मुंबई : केंद्र सरकारने आर्थिक निकषांवर १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे जातीय आरक्षणामुळे अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय आणि सवर्ण वर्गात होणारा संघर्ष कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. समाजात एक प्रकारे ऐक्य निर्माण करणारा हा निर्णय असल्याचे सांगतानाच गुलामगिरीचा आणखी एक इरसाल नमुना पेश करत रामदास आठवलेंनी ब्राम्हणांची तळी उचलून धरली आहे. 


मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात आठवले म्हणाले, एससी आणि मराठा या जातींमध्ये वाद वाढण्यास आरक्षण हेही कारण होते. आरक्षण मिळते म्हणून सरकारी जावई असे हिणवले जायचे. अत्याचार व्हायचे. त्यामुळे या दोन समाजांत ऐक्य व्हावे, या उद्देशाने मी सवर्ण समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भूमिका मांडली. 


सर्वच सवर्ण श्रीमंत नसतात या विचारातून मराठा समाजातील गरिबांना आरक्षणाची मागणी केली. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी केली होती. घटनादुरुस्ती करत केंद्र सरकारने हे आरक्षण दिले. या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारे संविधानविरोधी कृती घडली नाही अशी मखलाशी आठवले यांनी केली. 


गरिबांच्या आरक्षणाला विरोध करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विरोध करण्यासारखे असल्याचा आरोपही आठवले यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा - शिवसेना यांची युती अंतिम टप्प्यात होईल. युती झाली तर दोन आणि न झाल्यास भाजपाने आरपीआयला चार जागा सोडाव्यात. 


युतीच्या राजकारणात आरपीआयला कमी जागा सोडल्या जातात. त्यामुळे इच्छा असूनही अन्य समाज घटकांना उमेदवारी देता येत नाही. मात्र यापुढील काळात भटक्या विमुक्त, इतर मागास वर्गीय समाजाच्या प्रतिनिधींना उमेदवारी देण्याचा प्रयत्न राहील, असे आठवले म्हणाले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपाचे सगळे ‘चौकीदार’ चोर
धार्मिक हिंसाचार घटनांच्या सदोष तपासामुळे गुन्हेगार मो
देशात भाजप- कॉंग्रेस अपयशी ठरले
शिवसेनेच्या सोशल इंजिनीयरिंगला उतरती कळा
वारणा, भीमा पाटस आणि जय महेशवर कारवाईचा बडगा
राज्यातील ३९ लाख मतदारांची नावे यादीतून गहाळ
आचारसंहिता न पाळल्यास सहा महिने शिक्षा
हा कसला चौकीदार?
मतांसाठी जवान मारण्यात आले
खासदार शेट्टींच्या दत्तक गावात पाण्यासाठी नागरिक स्त्र
राज्यात स्वाइन फ्लूचा जोर वाढला
बांदिवडेकर यांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात
भाजपच्या पहिल्या यादीत १९ टक्के गुन्हेगारी पार्श्‍वभूम
अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात अनियमतता, सार्वजन
भारताने बालाकोटमध्ये खरंच ३०० दहशतवादी मारले का?
खाजगीकरणातून विकासाची दारे बंद करण्याचा डाव
आरएसएसशिवाय पार्टी चालू शकत नाही, संघ पॉवर प्लांट तर खास
श्रीलंकेत ४ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक
संघाच्या मर्जीशिवाय भाजपा नेत्यांना मिळत नाहीत पदे
आयुष्यमान भारत योजना खाजगी रुग्णालये आणि विमा कंपन्यां
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper