×

...तर राष्ट्रमाता जिजाऊ कशा निर्माण होतील!

Published On :    12 Jan 2019
साझा करें:

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊसारखी दूरदृष्टी आजच्या सर्व मातांनी ठेवली तर आमच्याही घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर निर्माण होतील.



छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊसारखी दूरदृष्टी आजच्या सर्व मातांनी ठेवली तर आमच्याही घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर निर्माण होतील. राष्ट्रमाता जिजाऊ ही इतिहास घडविणारी एक महान स्त्री झाली होती. स्वराज्य निर्माण करण्यासाठी गोरगरिब, शेतकर्‍यांवर विविध जाती धर्माच्या मराठी मावळ्यांवर दया दाखविणारी कारूण्यमूर्ती होती. त्यामुळेच शिवाजी महाराजाच्या कृतीतून कार्य सिध्दीस नेण्यासाठी लागणारी प्रेरणामूर्ती जिजामाता होती. हे  शंभर टक्के सत्य असले तरी मराठ्याच्या मनावर जिजामातेपेक्षा भवानीमातेचे वर्चस्व आजही कायम राहत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ कशा निर्माण होतील?


स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा जिजामातेची म्हणजे एका स्त्रीची होती. परंतु गेले अनेक शतक आम्ही राज्याच्या आणि केंद्राच्या अभ्यास क्रमातील इतिहासाच्या धड्यातून स्वराज्य निर्माण करणे ही श्रींची इच्छा आहे. हे विद्यार्थी दशेपासून बिंबविले जाते. त्यामुळे जिजामातेपेक्षा भवानी मातेचे भक्त होणेच मराठा समाजातील महिलांनी जास्त पसंत केले आहे. 


मराठा सेवा संघाच्या प्रबोधनाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. त्यामुळे एक घोषणा सर्व ठिकाणी निनादते ‘एकच वारी बारा जानेवारी’ याची खरंच अंमलबजावणी झाली तर शेगांव, शिर्डी आणि पंढरपूरच्या पायी यात्रा निश्‍चित बंद होतील. त्यामुळे मराठाच नव्हे तर लाखो बहुजन समाजात करोडो रुपयाची बचत होईल आणि आपल्या मुलामुलींना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणार्‍या राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील. म्हणून ‘एकच वारी बारा जानेवारी’ ही केवळ घोषणा नाही, क्रांतिकारी मंत्र होईल.


भारतात मुलांना घडविताना त्यांना रामायण-महाभारतातील कथा सांगून त्यांच्यावर संस्कार केले जातात. त्यांना शाळा कॉलेजमधून हे शिकविल्यावर कोण कसा छत्रपती शिवाजी राजा निर्माण होईल? स्वराज्याचे राजे असलेले मराठे आज सर्वच ब्राम्हणवादी विचारधारा असलेल्या पक्षाचे गुलाम झाले आहेत. राज्यातील २८८ आमदारात १४५ मराठा समाजाचे आमदार आहेत, हे लिहतांना मला लाज वाटते त्यांना मराठा म्हणण्याची. म्हणून त्यांना गुलामच म्हटले पाहिजे. हे बेशरमपणे मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले होते. 


बहुजन क्रांती मोर्चामुळे खरेच मराठा समाजात खूप मोठे प्रबोधन झाले ते इतिहास वाचायला लागले. आरक्षण मागायला लागले आणि शिवसेनेच्या बॅनर, पोस्टरवरून छत्रपती शिवाजी महाराज गायब झाले? का कसे माहिती नाही. मग मराठा सरदार, शिवसैनिकांवर कोणते संस्कार झाले?


रामायणातील संस्कार कोणालाही शूरवीर बनण्याची प्रेरणा देत नाही. तर दुसर्‍याकरीता कसे मरावे त्याची प्रेरणा रामायणात मिळते. तर महाभारताचे संस्कार अधर्माने कसे मारावे याचे अनेक उदाहरण देऊन त्याचे प्रशिक्षण दिले जाते. असे संस्कार शिवाजी महाराज यांच्यावर झाले असते तर त्यांनी मावळ्याची फौज उभी करून परकीय शत्रू आणि घरभेद्यांशी लढाई केली नसती. शत्रू सर्व शक्तीने बलाढ्य आहे हे माहित असूनही शिवाजी महाराज कधीच हिंमत हारले नाहीत. ती हिंमत लहानपणापासून त्यांच्यात निर्माण करणारी माता जिजाऊ त्यांच्यामागे सदैव उभी होती. 


आज कालच्या माता- मुलामुलींच्या मनात हिंमत निर्माण करण्याऐवजी प्रचंड भिती निर्माण करतात. त्याच्यापासून सावध राहण्याची सतत त्याची कान उघडणी करतात. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उध्दार करी अशी म्हण खूप प्रसिध्द आहे. जी माता स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेण्यास आपल्या मुलावर संस्कार करते. ती त्याला जगाची उगाच उठाठेव करू नको अशी सतत तंबी देते. ती जगाबाबत विचार करूच शकत नाही. त्यात एखादीच जिजामाता, सावित्रीमाता, रमाईमाता,अहिल्याबाई, ताराबाई तयार होतात. जगात आदर्श निर्माण करतात. इथे शालिनीताई, प्रतिभाताई, प्रभाताई, शोभाताई, मीनाताई, निलमताई निर्माण झाल्या. त्यांचा शिवाजी जिजाऊ कधीच आदर्श नव्हता. त्या गुलामांच्या गुलाम होत्या. त्यांच्याकडून राज्याच्या रयतेने कधीच अपेक्षा ठेवल्या नाहीत.


परकीय गुलामगिरीचे साम्राज्य पसरले असताना जवळपास पंधराशे वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राष्ट्रमाता जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने बहुजन समाजाच्या प्रेरणांना,अस्मितेला जन्म दिला आज आम्ही जरी बहुजन समाज हा शब्द वापरत असलो तरी त्यावेळी दर्‍या -खोर्‍यात राहणार्‍या सर्व जाती जमाती आदिवासीना जिजामाता व शिवबांनी मावळे म्हणून गोळा केले होते. तेव्हा या सर्व बहुजनांना ज्ञानबंदी, वर्णबंदी, जातबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, शस्त्रबंदी, समुद्रबंदी होती. 


या सर्व बंद्या प्रथम जिजामाताने आपल्या बाळ शिवाजीला तोडण्यास लावून मावळ्याची मुंग्यांसारखी फौज निर्माण केली. मुंग्या कितीही छोट्या असल्या तरी त्या एकत्र एखाद्या किड्यावर तुटून पडल्यावर त्याला जिवंत मारतात व सर्व एकत्र येऊन त्याला वाहुन नेतात. या मुंग्यांच्या एकजुटीतून शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतली. सर्व जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त असलेल्या कष्टकरी गोरगरीब पण शरीराने आडदांड असलेल्या तरुणांना मावळे म्हणून गोळा केले. सम्राट अशोकानंतर हजारो वर्षाची गुलामगिरीची व्यवस्था झुगारून छत्रपतींच्या गादीचा वारसा निर्माण केला. चंदगुप्त मौर्या, सम्राट अशोकाचा वारसा आणि रयतेच्या विचाराचे स्वराज्य निर्माण करून त्याची रीतसर स्थापना केली. 


जिजामातेमुळे केवळ एका मातेचा किंवा मातृत्वाचा गौरव झाला नाही.तर त्यापेक्षा आमच्या मातृसत्ताक संस्कृतीचा गौरव झाला. याचे भान आजच्या आरक्षण मागणार्‍या मराठा क्रांतीची भाषा करणार्‍यांना नाही. १४५ आमदारांनी मराठा आरक्षणाकरीता राजीनामा देऊन निवडणूक घेण्यासाठी राज्यपालांसमोर प्रस्ताव दाखल केला असता तर राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ मराठा समाजाचे असते. १४५ आमदार वेगवेगळ्या पक्षाचे असल्यामुळे ते सभागृहात तोंड उघडू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा सांगणारे पक्ष, संस्था, संघटना जिजामातांची जयंती साजरी करताना दिसत नाही. पण ममता दिन मात्र मोठ्या उत्सवात गटागटाने प्रमुख गल्लीबोळात साजरा करताना दिसतात. 


ममता, समता, करुणा यांचा थांगपत्ता नसलेल्या माताचा नऊ दिवस कडक उपवास आणि नऊ दिवस नऊ रंगाची उधळण केली जाते. ज्यांच्या आईवडीलांचा पत्ता नाही, कुठे जन्मले? गांव, तालुका, जिल्हा, राज्य कोणते तेच कधी कळले नाही अशा मातांना प्रिंट मीडिया, चॅनल मीडिया रात्रंदिवस दाखविते, मात्र जिजामाता,सावित्रीमाईचे जन्मापासून मृत्यू पर्यंत सर्व इतिहास माहित असूनही त्याबाबत लिहले आणि दाखविले जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जीजाऊ यांचे चरित्र हनन करून विटंबना केली गेली. तेव्हा एकदाही रस्त्यावर उतरून खळ्ळ- खट्याक आवाज केला नाही परंतु एका धातूच्या पुतळ्याला माती लागताच उभा महाराष्ट्र पेटविला होता. यालाच आईचे व दाईचे प्रेम म्हणतात. 


छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊचे चरित्र हनन करणार्‍यांना महाराष्ट्रभूषण देऊन गौरविले जाते. राज्यातील मराठ्यांना हे दिसते तरी पण स्वार्थाकरीता हे त्यांची गुलामी स्विकारतात. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊच्या चरित्रावर लिहणार्‍यांना पितासमान मानून मनसे सेवा करणारी ही औलाद मराठा समाजातील तरुण- तरुणीला कशी दिसली नाही. त्यांच्या एका इशार्‍यावर महाराष्ट्रात तोडफोड करून धुमाकूळ घालणारी ही पोरं कोणत्या मातेची आहेत?  त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांची आई संस्कार मूर्तीची आठवण होत नाही. मग कशा राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील? अशा जातीशी बेईमानी करून परकीयांची गुलामगिरी करणार्‍या मराठी बहुजन समाजाचे अज्ञान कधी दूर होणार? त्याने स्वजातीचा इतिहास वाचला पाहिजे, स्वत: जागरूक होऊन समाजाला जागृत केले पाहिजे. 


म्हणूनच एकच वारी बारा जानेवारी स्वाभिमानी मराठा बहुजन समाजाच्या घराघरात राबविली पाहिजे. हिच राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त अपेक्षा. राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम.


सागर रामभाऊ तायडे

भांडूप, मुंबई ९९२०४०३८५९.  

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त
आठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही
लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना?
नीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही
मोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार?
इंधन दरवाढ सुरूच! पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले
लोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक
बेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी
महाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक
माझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो
जवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात
वाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्
जून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक
सर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती
आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा
मराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या
‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला!
राफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी
भाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper