×

भारत सरकारजवळ शास्त्रींच्या मृत्यूचा पोस्ट मॉर्टमचा अहवालच नाही

Published On :    12 Jan 2019
साझा करें:

आरटीआयच्या माध्यमातून धक्कादायक बाब उघड



नवी दिल्ली : भारत सरकारजवळ माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचा पोस्ट मॉर्टमचा अहवालच नसल्याची धक्कादायक बाब आरटीआयच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. उत्तरप्रदेशमधील चंदौली जिल्ह्यातील रहिवाशी संतोष पाठक या आरटीआय कार्यकर्त्याने शास्त्रींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची खातरजमा करण्यासाठी पोस्ट मॉर्टम अहवाल मागितला होता. यावर प्रधानमंत्री कार्यालयाने अहवाल नसल्याचे सांगितले आहे.


शास्त्री यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यावर प्रकाश पडावा म्हणून पाठक यांनी पोस्ट मॉर्टमचा अहवाल मागितला होता. पाठक यांनी दाखल केलेल्या मुद्यावर प्रधानमंत्री कार्यालयाने समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लालबहादूर शास्त्री यांना त्या रात्री रशियातील भारताचे राजदूत व नेहरू परिवारानजिक असलेले टी.एन.कौल यांनी जेवण दिले होते असे शिकवण्यात आल्याचे पुस्तकाचा हवाला पाठक यांनी दिला होता. त्यावेळी शास्त्री यांच्याबरोबर घरगुती नोकर व खानसामा बनवणारे कामगारही होते.


शास्त्री यांच्या मृत्यूनंतर त्यांचे खानसामा जान मुहम्मद यांना रशियाची तपास यंत्रणा केजीबीने विष दिल्याच्या संशयावरून अटक केली होती. परंतु काही कालावधीनंतर चौकशी अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे मला शास्त्री यांच्या हत्येमागे राजकीय षड्यंत्र वाटत आहे. कारण भारत सरकारजवळ शास्त्री यांच्या पोस्ट मॉर्टमचा अहवालच नाही असे पाठक यांनी आरोप केला आहे. 


रशियाच्या ताश्कंदमध्ये दोन देशाचे प्रधानमंत्री समझोत्यासाठी पोहचले. त्यावेळी समझोत्यानंतर ११ जानेवारीच्या रात्री १.३० वाजता ताश्कंदमध्ये शास्त्री यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी हार्ट ऍटॅकने त्यांचा मृत्यू झाला असे सांगितले गेले. त्यांचे पार्थिव भारतात आणले गेले, तेव्हा ते निळा पडले होते. ज्यादिवशी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी ते एकदम ठिक होते असे सांगितले जाते. त्यावेळी त्यांना विष देऊन मारण्यात आले अशी शंकाही उपस्थित करण्यात आली. 


भारत आणि रशिया या दोन्ही देशामार्फत त्यांच्या पोस्ट मॉर्टम करण्यात आला नाही असे सांगितले जाते. याबाबत एक आरटीआय दाखल करण्यात आला आहे. शास्त्री यांच्या मृत्यूबाबत एक दस्तावेज उपलब्ध आहे, त्याला सार्वजनिक केले जाऊ शकत नाही असे सरकारचे म्हणणे आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपाचे सगळे ‘चौकीदार’ चोर
धार्मिक हिंसाचार घटनांच्या सदोष तपासामुळे गुन्हेगार मो
देशात भाजप- कॉंग्रेस अपयशी ठरले
शिवसेनेच्या सोशल इंजिनीयरिंगला उतरती कळा
वारणा, भीमा पाटस आणि जय महेशवर कारवाईचा बडगा
राज्यातील ३९ लाख मतदारांची नावे यादीतून गहाळ
आचारसंहिता न पाळल्यास सहा महिने शिक्षा
हा कसला चौकीदार?
मतांसाठी जवान मारण्यात आले
खासदार शेट्टींच्या दत्तक गावात पाण्यासाठी नागरिक स्त्र
राज्यात स्वाइन फ्लूचा जोर वाढला
बांदिवडेकर यांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात
भाजपच्या पहिल्या यादीत १९ टक्के गुन्हेगारी पार्श्‍वभूम
अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात अनियमतता, सार्वजन
भारताने बालाकोटमध्ये खरंच ३०० दहशतवादी मारले का?
खाजगीकरणातून विकासाची दारे बंद करण्याचा डाव
आरएसएसशिवाय पार्टी चालू शकत नाही, संघ पॉवर प्लांट तर खास
श्रीलंकेत ४ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक
संघाच्या मर्जीशिवाय भाजपा नेत्यांना मिळत नाहीत पदे
आयुष्यमान भारत योजना खाजगी रुग्णालये आणि विमा कंपन्यां
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper