×

पेशव्यांची पगडी गुलामीचे प्रतिक

Published On :    12 Jan 2019
साझा करें:

राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंची पगडी आणि पेशव्यांची पगडी यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे.



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळ्यात काळा घोळदार गाऊन आणि टोपी या ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ची जागा नवीन पोशाखाने घेतली. शुक्रवारी विद्यापीठात पदवीदान समारंभ पार पडला. याप्रसंगी कुडता, पायजमा,उपरणे आणि पगडी असा पोशाख होता. 


या समारंभाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी खेचराला पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणले. पेशव्यांची पगडी नको फुले पगडी हवी, अशी मागणी त्यांनी केली. मुद्दामहून पेशव्यांची पगडी घालून पेशवाईचे राज चालेल असे त्यांना दाखवायचे आहे. तर ही पेशव्यांची पगडी म्हणजे गुलामीचे प्रतिक आहे.


मध्यंतरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे आपल्या कार्यक्रमात पेशव्यांची पगडी न वापरता राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांची पगडी वापरण्याचा निर्णय घेतला होता. तसा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेशच दिला होता. यावरून ब्राम्हण-बनियांच्या टॉयलेट मीडियाकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. 


त्यावेळी हिंदुत्वाचा टेंभा मिरवणार्‍या ‘सा(बा)मना’ सारख्या दैनिकाने एक ‘पगडी’ राजकारण असा टुकार आणि भिकार असा अग्रलेख नव्हे भटीलेख लिहून भडाभडा ओकारी केली होती. तर त्याच जातकुळीचा असलेल्या ‘लोकसत्ता’ नव्हे ‘फेकसत्ता’ ने फेकामफेक करत मानसिक विकृतीचे व्यंग असल्याचे दाखवत व्यंगचित्राची पिचकारी मारण्याचा प्रयत्न केला होता. 


 राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंची पगडी आणि पेशव्यांची पगडी यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. राष्ट्रपिता फुलेंची पगडी ही न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाचे प्रतिक मानली जाते, तर पेशव्यांची पगडी ही जातिव्यवस्था, अस्पृश्यता, अन्याय-अत्याचाराचा कळस म्हणून संबंध महाराष्ट्रात ओळखली जाते. राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंच्या पगडीने सर्वांना न्याय दिला तर पेशव्यांच्या पगडीने अन्यायच केला आहे. त्यामुळे न्याय देणारी फुलेंची पगडी चांगली की अन्याय करणारी पेशव्यांची पगडी चांगली याचा विचार निदान विद्यापीठाने करायला हवा होता. 


 ज्या सावित्रीबाईंच्या नावाने पुणे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठातील कुलगुरूंना राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुरोगामी विचार माहित नाहीत का? जर माहित असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पेशव्यांची पगडी घालण्याचा अट्टहास का केला? विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पेशवा ब्राम्हणांची पगडी घालून विद्यार्थी ब्राम्हण होणार नाहीत. तर या पगडीचा अर्थ असा आहे की, विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ३.५ टक्के विदेशी ब्राम्हणचांचेच राज्य असेल. केवळ विद्यार्थीच नव्हे गेल्या एका सभारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावरही पेशव्यांची पगडी घालण्यात आली होती. 


याचा अर्थ तुम्ही प्रधानमंत्री असलात तरी ब्राम्हणी व्यवस्थेचे गुलाम आहात हे त्यांना दाखवायचे आहे. शिक्षणासारख्या क्षेत्रात गुलामी लादली जात आहे तर या व्यवस्थेने काय धुमाकूळ घातला आहे हे लक्षात आल्यावाचून राहणार नाही. याचा अर्थ तुम्हांला गुलामच बनवून ठेवायचे आहे. 


ब्राम्हणांनी फुले दाम्त्यांना त्यांच्या हयातीतच इतका त्रास दिला आणि आताही अशाप्रकारे ते त्यांचा अपमान करीत आहेत. ज्या राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंनी शेठजी,भटजी,लाटजी असे बहुजन समाजाचे शत्रू आहेत असे सांगितले. त्यांनी शेतकर्‍यांचा आसूड, गुलामगिरी, ब्राम्हणांचे कसब असे ग्रंथ लिहून बहुजन समाजाची जागृती केली. 


सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा उघडल्या, त्या क्रांतीसूर्य फुले दाम्पत्यावर थुंकण्याचा प्रयत्न पुणे विद्यापीठाने केला आहे. यावरून पुणे विद्यापीठाची ब्राम्हणी मानसिकता दिसून येते. त्यामुळे असा निर्णय घेणार्‍या कुलगुरूंवर कारवाई करण्याची गरज आहे. कारण सुंभ जळला तरी त्याचा पीळ काही जात नाही. म्हणून तो पेशवाईचा पीळ ब्राम्हणी अवलाद दाखवताना दिसत आहे. परिणामी मूलनिवासी बहुजनांच्या मुळावर आलेल्या या पिलावळीला मुळासकट उखडून काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 


दिलीप बाईत

९२७०९६२६९८

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त
आठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही
लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना?
नीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही
मोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार?
इंधन दरवाढ सुरूच! पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले
लोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक
बेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी
महाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक
माझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो
जवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात
वाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्
जून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक
सर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती
आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा
मराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या
‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला!
राफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी
भाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper