×

१० टक्के सवर्ण आरक्षण न्यायालयीन पातळीवर टिकणार नाही

Published On :    13 Jan 2019
साझा करें:

शरद पवार यांचे मत



मुंबई : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेचा मूळ ढाचा बदलण्याचा अधिकार कोणाला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच काही निवाड्यांवेळी स्पष्ट केले आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे. सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय संसदेत बहुमताने घेतला असला तरी तो न्यायालयीन पातळीवर टिकणार नाही, असे कायदे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेचा मूळ ढाचा बदलण्याचा अधिकार कोणाला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच काही निवाड्यांवेळी स्पष्ट केले आहे. 


अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त आदींचे आरक्षण टिकेल. त्याला कोणताच धक्का लागणार नाही. पण सवर्ण आरक्षण न्यायालयात टिकेल असे मला वाटत नाही, अशी शंका पवार यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केली. माझी राहुल गांधी यांच्याशी भेट झाली असून आमची जागा वाटपा संदर्भात चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.


उसदाराबत शेट्टींशी बोलणार

ऊस दराच्या तापलेल्या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता पवार यांनी सांगितले की, एकरकमी एफआरपी देण्यांमध्ये साखर कारखान्याना आर्थिक अडचणी आहेत. कारखान्यांना उपलब्ध होणार्‍या रकमेतून एकरकमी एफआरपी कशी देता येते हे समजून घेण्यासाठी खासदार राजू शेट्टी याच्याशी मी बोलणार आहे. साखर समुद्रात ओतली पाहिजे, असे विधान करणारे नितीन गडकरी यांच्या बाबत पवार यांनी ते आमचे मित्र आहेत. त्यांचा बोलण्याबाबत कोणी हात धरत नाही. ते मुक्त चिंतन करतात, अशी मार्मिक शेरेबाजी करतानाच विदर्भातील कारखाने किती दर देतात, हे स्पष्ट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


‘ठाकरे’ चित्रपट पाहणार

चित्रपट बघून मताधिकार ठरत नाही. मात्र शिवसेनेच्यावतीने खासदार संजय राऊत यांनी मला उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रपट पाहायला मुबईत बोलावले असून मी जाणार आहे, असे म्हटले.



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपाचे सगळे ‘चौकीदार’ चोर
धार्मिक हिंसाचार घटनांच्या सदोष तपासामुळे गुन्हेगार मो
देशात भाजप- कॉंग्रेस अपयशी ठरले
शिवसेनेच्या सोशल इंजिनीयरिंगला उतरती कळा
वारणा, भीमा पाटस आणि जय महेशवर कारवाईचा बडगा
राज्यातील ३९ लाख मतदारांची नावे यादीतून गहाळ
आचारसंहिता न पाळल्यास सहा महिने शिक्षा
हा कसला चौकीदार?
मतांसाठी जवान मारण्यात आले
खासदार शेट्टींच्या दत्तक गावात पाण्यासाठी नागरिक स्त्र
राज्यात स्वाइन फ्लूचा जोर वाढला
बांदिवडेकर यांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात
भाजपच्या पहिल्या यादीत १९ टक्के गुन्हेगारी पार्श्‍वभूम
अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात अनियमतता, सार्वजन
भारताने बालाकोटमध्ये खरंच ३०० दहशतवादी मारले का?
खाजगीकरणातून विकासाची दारे बंद करण्याचा डाव
आरएसएसशिवाय पार्टी चालू शकत नाही, संघ पॉवर प्लांट तर खास
श्रीलंकेत ४ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक
संघाच्या मर्जीशिवाय भाजपा नेत्यांना मिळत नाहीत पदे
आयुष्यमान भारत योजना खाजगी रुग्णालये आणि विमा कंपन्यां
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper