×

पाच वर्षात १४ हजार शेतकर्‍यांनी संपवली जीवनयात्रा

Published On :    11 Feb 2019
साझा करें:

उपाययोजना फक्त कागदावरच



पुणे : केंद्र व राज्य शासनाकडून शेतकर्‍यांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्याचे वारंवार सांगितले जाते. मात्र,शासनाच्या योजना कागदावरच राहत असल्याने दिवसेंदिवस शेतक-यांच्या आत्महत्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या पाच वर्षात राज्यातील १४ हजाराहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


लहरी हवामान आणि शेतीमालाला मिळणारा मातीमोल भाव आणि शासनाने कृषी क्षेत्रासाठी स्वीकारलेले धोरण यामुळे गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍याची आर्थिक पिळवणूक होत आहे. शेतीसाठी आणि मुलांच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी काबाडकष्ट करून शेतक-यांकडून विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते. परंतु, कांदा, टोमॅटो सारख्या पिकांना एक रुपयापासून पाच रुपये प्रतिकिलो भाव मिळतो.


पिकासाठी घातलेले भांडवलही मिळत नसल्याने अनेक शेतकरी निराश होतात आणि आपली जीवनयात्रा संपविण्याचा चूकीचा मार्ग स्वीकारतात. त्यावर शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्याबाबतच्या घोषणा केल्या जातात. परंतु,या योजनांचा लाभ शेतक-यांपर्यंत पोहचत नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.


माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीवरून राज्यात २००१ पासून २०१८ पर्यंत २९ हजार ६९८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या.राज्यात २०१४ या वर्षी आत्महत्या करणार्‍या शेतक-यांची संख्या २ हजार ३९ होती. त्यानंतर सलग पाच वर्षे म्हणजेच २०१८ पर्यंत ३ हजार २०० ते २ हजार ७०० च्या दरम्यान शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे राज्य शासनाने कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सारखा योजना राबवल्या.मात्र,त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्येमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत नाही.


प्रामुख्याने मुलींच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेले शेतकरी आत्महत्या करत आल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.त्यामुळे शासनाने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने शुभमंगल सामुहिक-नोंदणीकृत विवाह योजना तसेच निराधार,परित्यक्ता व विधवांच्या मुलींच्या विवाहासाठी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. 


मात्र,त्यानंतर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात या योजनेसाठी मोठ्याप्रमाणावर निधी खर्च करण्यात आला नाही. उलट वषार्नुवर्षे हा खर्च कमीच होत गेला आहे. चंद्रपूर, अलिबाग, धुळे,नंदूरबार,गडचिरोली या जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाकडून शुभमंगल विवाह योजनेसाठी खर्चच करण्यात आला नाही. तर सिधूदूर्ग,सांगली जिल्ह्यात नगन्य खर्च करण्यात आला. त्याचप्रमाणे कोल्हापूर,अमरावती,जळगाव, वर्धा जिल्ह्यात या योजनेसाठीचा खर्च कमी कमी होत गेला आहे.त्यामुळे शासनाच्या योजना कागदावरच राहत असल्याचे स्पष्ट होत आहे.


शेतकरी आत्महत्येची आकडेवारी

वर्ष              संख्या 

२०१४           २०३९

२०१५           ३२६५

२०१६           ३०५२

२०१७           २९१७

२०१८           २७६१

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
महाराष्ट्रातही मॉब लिंचिंग
ब्राम्हण हा बहुजनांचा रक्त शोषणारा पॅरासाईट
मुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर? अमृता फडणवीस यांच्या
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्याला अटक
स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या भाजपा खासदाराला को
‘देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’; पोस्
ईव्हीएम विरोधामुळेच राज ठाकरेंवर चौकशीचा ससेमिरा
मनसेचा भाजपावर ‘कार्टूनवार’
सुवर्ण पदक विजेत्या मुलीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पदक
संत रविदास मंदिर तोडल्याप्रकरणी उद्या दिल्लीत आंदोलन
तुम्ही आरक्षणावर चर्चा करा आम्ही ईव्हीएम घोटाळ्यावरच च
राजकीय आरक्षण वाढवल्यास आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार
महिंद्रा अँड महिंद्राने १५०० जणांना काढून टाकले
लोकसभेच्या २०० माजी खासदारांना अजूनही हवी सरकारी बंगल्
एसआयटी आज आरोपी व अधिकार्‍यांचा जबाब नोंदवणार
चौकशीसाठी सीबीआयला आणखी दोन आठवड्यांची मुदत
ईडीच्या अशा नोटीशीला भीक घालत नाही
भारत सांस्कृतिकदृष्ट्या हिंदुराष्ट्रच
तरीही ट्रकचालकाने कारचा केला चेंदामेंदा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper