×

गुज्जरांच्या आंदोलनाने रस्ते, रेल्वे बंद; जमावबंदी लागू

Published On :    12 Feb 2019
साझा करें:

राष्ट्रीय महामार्ग रोखला, अनेक ठिकाणी जाळपोळ



जयपूर : लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच राजस्थानातील गुज्जर समाजाने सरकारी नोकर्‍या आणि शिक्षणात पाच टक्के राखीव जागांच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन पेटले आहे. सोमवारी सलग चौथ्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवला. हा महामार्ग जयपूरला आग्य्राशी आणि राजस्थानच्या दौसा जिल्ह्याशी जोडणारा आहे. आंदोलनकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू केली आहे.


दौसात सिकंदरा येथे राष्ट्रीय महामार्ग ११ आंदोलकांनी बंद पाडला. बुंदी जिल्ह्यात नैनवा येथे रविवारी राज्य महामार्ग अडवून ठेवण्यात आला, तसेच सवाई माधोपूरमधील मलारना रस्ता आणि करौलीतील बुदला खेड्यात करौली-हिंदौन रस्ताही अडवून ठेवण्यात आला असल्याचे पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) एम. एल. माथूर यांनी सांगितले.


दौसाचे पोलीस अधीक्षक प्रल्हाद सिंह म्हणाले की, अडवून ठेवण्यात आलेल्या रस्त्याकडे जाणारी वाहने पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली. वाहतूक वळविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. रस्ता अडवून ठेवण्याचे हे आंदोलन शांततेत आहे, असे सिंह म्हणाले. रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 


या क्षणी राजस्थानात एक राष्ट्रीय महामार्ग, एक राज्य महामार्ग, दोन प्रमुख रस्ते आणि दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग आंदोलकांनी बंद पाडले आहेत. त्यामुळे अनेक रेल्वे रद्द कराव्या लागल्या किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले. 


२५० गाड्यांवर परिणाम

या आंदोलनाला ढोलपूर जिल्ह्यात रविवारी गोळीबार होऊन पोलिसांची वाहने पेटविली गेल्यावर हिंसक वळण लागले. त्यानंतर, अधिकार्‍यांनी ढोलपूर आणि करौली जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १४४ वे कलम (जमावबंदी) लागू केले. ते सध्याही लागू आहे. शुक्रवारी आंदोलन सुरू झाल्यापासून २५० पेक्षा जास्त रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
महाराष्ट्रातही मॉब लिंचिंग
ब्राम्हण हा बहुजनांचा रक्त शोषणारा पॅरासाईट
मुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर? अमृता फडणवीस यांच्या
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्याला अटक
स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या भाजपा खासदाराला को
‘देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’; पोस्
ईव्हीएम विरोधामुळेच राज ठाकरेंवर चौकशीचा ससेमिरा
मनसेचा भाजपावर ‘कार्टूनवार’
सुवर्ण पदक विजेत्या मुलीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पदक
संत रविदास मंदिर तोडल्याप्रकरणी उद्या दिल्लीत आंदोलन
तुम्ही आरक्षणावर चर्चा करा आम्ही ईव्हीएम घोटाळ्यावरच च
राजकीय आरक्षण वाढवल्यास आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार
महिंद्रा अँड महिंद्राने १५०० जणांना काढून टाकले
लोकसभेच्या २०० माजी खासदारांना अजूनही हवी सरकारी बंगल्
एसआयटी आज आरोपी व अधिकार्‍यांचा जबाब नोंदवणार
चौकशीसाठी सीबीआयला आणखी दोन आठवड्यांची मुदत
ईडीच्या अशा नोटीशीला भीक घालत नाही
भारत सांस्कृतिकदृष्ट्या हिंदुराष्ट्रच
तरीही ट्रकचालकाने कारचा केला चेंदामेंदा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper