×

कणाहीनतेपेक्षा औचित्यभंगाचा ठपका घेऊन जगेन

Published On :    12 Feb 2019
साझा करें:

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे सुहास बहुलकरांना प्रत्युत्तर



मुंबई : कणाहीन जगण्यापेक्षा तथाकथित औचित्यभंगाचा ठपका ठेऊन जगणे मी उचित मानतो अशा शब्दांत प्रसिध्द चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी एनजीएमए संबंधित प्रश्नांबाबत बोलणे हा औचित्यभंग असल्याची टीका बहुलकर यांनी केली होती. त्यांनी नोंदवलेल्या आक्षेपांना पालेकर यांनी निवेदनाद्वारे उत्तर दिले आहे. 


मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये (एनजीएमए) दिवंगत चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे भाषण रोखण्याच्या प्रकार घडला. त्यानंतर बहुलकर यांनी पालेकर यांच्यावर औचित्यभंगाचा आरोप केला होता. 


लग्नाला जाऊन मर्तकाविषयी तर मी बोलत नव्हतो ना, असे सांगत या लग्नात मुलीची फसवणूक होते आहे, हे जर कुणी दाखवून देत असेल तर तो औचित्यभंग ठरत नाही, एका सुसंस्कृत, सजग नागरिकांनी किंवा हितचिंतकांनी त्या मुलीची राखलेली ती बूज ठरते, ती त्याची जबाबदारी असते, अशा स्पष्ट शब्दांत पालेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. हा प्रसंग घडला तेव्हा मी पु. ल. देशपांडे यांच्यावरील चित्रपटाचा भाग २ सिनेमा पाहिला, मात्र तिथे हजर असलेल्या एकाही मराठी कलाकाराने किंवा प्रेक्षकांनी मला याबाबत विचारले नाही. तेथील वातावरण पाहता जणू सर्वकाही आलबेल आहे असेच वाटल्याचे पालेकर म्हणाले. 


पुलंनी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार स्वीकारताना लोकशाही मार्गाने निवडून येणारे ठोकशाहीची भाषा करीत आहेत याच्या मला किती यातना होत असतील असे म्हटल्याचे सांगत, असा प्रश्न विचारायला पुलं कचरले नाहीत, त्यांनी पुरस्कार स्वीकारला, पण त्या अनुषंगाने अपेक्षित असणारा मिंधेपणा स्वीकारला नाही याकडे पालेकर यांनी लक्ष वेधले आहे. 


‘... तर मला बोलावे लागले नसते’

‘मी त्या विचारपीठावर उत्सवी प्रसंगी असे मुद्दे उपस्थित केले असे बहुलकर वारंवार सांगत आहेत, मात्र बहुलकर यांनी हे मुद्दे गेले तीन महिने लावून धरून, संपूर्ण कलाजगतासमोर आणले असते तर मला हे बोलावेच लागले नसते’, असे स्पष्टीकरण पालेकर यांनी दिले आहे. मी मांडलेल्या मुद्यांबाबतचे तपशील खुद्द बहुलकर यांनी आपल्याला सांगितले होते. 


या वर्षात ठरलेली प्रदर्शने रद्द करण्यात आली, त्याविषयीही त्यांनी आपल्याकडे नाराजी व्यक्त केली होती असे नमूद करत, बहुलकर यांनी परिस्थितीपुढे नमते घेतल्याचे मला स्पष्ट दिसत असल्याची टीकाही पालेकर यांनी केली आहे. बर्वे याना माझे आवाज उठवणे पटले नसते, तर मी त्यांच्याशी अत्यंत आदराने आणि प्रेमाने वाद घातला असता, त्यांनी तो ऐकला असता असे म्हणत त्यांनी तुमच्यासारखी मुस्कटदाबी केली नसती असा टोलाही पालेकर यांनी लागावला आहे. निषेध करण्याची संधी मागून मिळत नसते ती हक्कानेच मिळवावी लागते हेही आपण ठामपणे मांडले असते, असेही पालेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. 



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘स्मार्ट सिटी’ योजना ठरतेय गाजर, ५८ टक्के कामांना सुरु ह
जवानांच्या हत्येच्या बदल्यासाठी भाजपाला मते द्या म्हणण
बुलेट विरोधात महापालिका कोर्टात, ठराव विखंडित कराल तर खब
ब्राम्हणवादी संघटनांकडून पुलावामा घटनेचा वापर मुस्लिम
सत्तेसाठी सरकार दंगली घडवेल, अजित पवारांंचा भाजपावर हल्
आरक्षणासाठी धनगर समाजाचे खासदारांच्या निवासस्थानी ठिय
जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीला मुस्ल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शेतकर्‍यांनी आ
राज्यात बालकामगारांची स्थिती ‘जैसे थे’
विमा योजनेचा सोसायटीत रुपांतर करण्यास विरोध
पाकिस्तानविरोधी भावना भडकावून निवडणुकीत भाजपा फायदा उठ
देश शोकसागरात बुडाला असताना मोदी सभा कसे घेतात
‘बेरोजगारीने युवक अस्वस्थ’, माजी प्रधानमंत्री मनमोहन स
जम्मू-काश्मीरमध्ये बॉम्बस्फोटात ५७ टक्के वाढ
शरद करळसकरने खुनासाठी वापरलेली हत्यारे वसईच्या खाडीत फ
जवानांच्या कुटुंबीयांसाठी वर्षाकाठी मिळतेय अवघ्या ‘सव
घटनात्मक मार्गाने समाजात बदल घडवा
नीतीश कुमारांविरोधात फास आवळला
पाचशे कोटी खर्च करूनही गोदावरी प्रदूषितच
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७ शेतकर्‍यांनी संपविली जीवनय
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper