×

एमपीएससीत ‘व्यापम’सारखा घोटाळा

Published On :    12 Feb 2019
साझा करें:

सत्यजित तांबे यांचा पत्रकार परिषदेत आरोप



मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत मध्य प्रदेशातील ‘व्यापम’सारखा घोटाळा झाला असल्याचा सनसनाटी आरोप महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ही परीक्षा तातडीने रद्द करण्यात यावी अशी मागणीही तांबे यांनी केली. आपली मागणी मान्य न झाल्यास आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावू असा इशाराही तांबे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 


राज्य सरकार एमपीएससीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीला उत्तेजन देत असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा गंभीर आरोप करत, याची चौकशी झाल्यास हा व्यापमपेक्षाही मोठा घोटाळा असल्याचे सिध्द होईल, असेही तांबे म्हणाले. एमपीएससीची परीक्षा देणार्‍या परीक्षार्थींना परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी आपली प्रोफाइल तयार करावी लागते. याबरोबरच उमेदवाराला आपला मोबाइल क्रमांकही भरावा लागतो. २०१७-१८ पासून परिक्षार्थींच्या मोबाइल क्रमांकाचे शेवटचे डिजिट ग्राह्य धरून परीक्षार्थीला आसन क्रमांक दिला जातो. 


मात्र, अनेक उमेदवारांनी आपल्या मोबाइलचा शेवटचा सिरीयल क्रमांक आपल्याला सोयीच्या असलेल्या उमेदवाराशी मिळता जुळता करून प्रोफाइलमध्ये अपडेट करण्याचे काम केले असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे परीक्षेत एकमेकांना मदत करू शकणार्‍या परीक्षार्थींचा आसन क्रमांक एकमेकांच्या मागे पुढे आला आहे. अशा जोड्या बहुसंख्येने उत्तीर्ण झाल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालात स्पष्ट झाल्याचेही तांबे यांनी दाखवून दिले आहे. 


या घोटाळ्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थी, आदिवासी आणि ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले असल्याचेही तांबे म्हणाले. या प्रकरणी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, तसेच आगामी परीक्षा रद्द करावी अशी मागणीही तांबे यांनी केली आहे. 



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘स्मार्ट सिटी’ योजना ठरतेय गाजर, ५८ टक्के कामांना सुरु ह
जवानांच्या हत्येच्या बदल्यासाठी भाजपाला मते द्या म्हणण
बुलेट विरोधात महापालिका कोर्टात, ठराव विखंडित कराल तर खब
ब्राम्हणवादी संघटनांकडून पुलावामा घटनेचा वापर मुस्लिम
सत्तेसाठी सरकार दंगली घडवेल, अजित पवारांंचा भाजपावर हल्
आरक्षणासाठी धनगर समाजाचे खासदारांच्या निवासस्थानी ठिय
जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीला मुस्ल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शेतकर्‍यांनी आ
राज्यात बालकामगारांची स्थिती ‘जैसे थे’
विमा योजनेचा सोसायटीत रुपांतर करण्यास विरोध
पाकिस्तानविरोधी भावना भडकावून निवडणुकीत भाजपा फायदा उठ
देश शोकसागरात बुडाला असताना मोदी सभा कसे घेतात
‘बेरोजगारीने युवक अस्वस्थ’, माजी प्रधानमंत्री मनमोहन स
जम्मू-काश्मीरमध्ये बॉम्बस्फोटात ५७ टक्के वाढ
शरद करळसकरने खुनासाठी वापरलेली हत्यारे वसईच्या खाडीत फ
जवानांच्या कुटुंबीयांसाठी वर्षाकाठी मिळतेय अवघ्या ‘सव
घटनात्मक मार्गाने समाजात बदल घडवा
नीतीश कुमारांविरोधात फास आवळला
पाचशे कोटी खर्च करूनही गोदावरी प्रदूषितच
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७ शेतकर्‍यांनी संपविली जीवनय
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper