×

दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलच्या आगीत १७ जणांचा मृत्यू

Published On :    12 Feb 2019
साझा करें:

आग नियंत्रणात, गाढ झोपेत असताना घडली घटना



नवी दिल्ली : दिल्लीत करोलबागमधील अर्पित  पॅलेस हॉटेलमध्ये पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळच्यावेळी सर्वजण गाढ झोपेत असताना ही घटना घडली.


आता ही आग विझविण्यात आली आहे. चार तास चाललेल्या बचाव मोहिमे दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी ५० जणांची सुटका केली. दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नऊ जणांना रुग्णालयात आणले त्यावेळी मृत घोषित करण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २६ गाड्या लगेच घटनास्थळी रवाना झाल्या. सकाळी ७.३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आठ वाजल्यापासून कुलिंग ऑपरेशन सुरु झाले.


अर्पित पॅलेस या तीन मजली हॉटेलमधील सर्वच्या सर्व ३५ रुम बुक होत्या. नेमकी आग कशामुळे लागली ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहाटेच्यासमयी सर्वजण गाढ झोपेत असताना ही घटना घडली. त्यामुळे अनेकांना प्राण वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत बहुतांश मृत्यू गुदमरल्यामळे झाले आहेत. 


घाबरल्यामुळे दोघांनी इमारतीवरुन उडया मारल्या असे मुख्य अग्निशमन अधिकार्‍यांनी सांगितले. आग लागल्याचे समजताच हॉटेलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तात्काळ उपाय म्हणून हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्या जेणेकरुन धूर बाहेर जाईल.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘स्मार्ट सिटी’ योजना ठरतेय गाजर, ५८ टक्के कामांना सुरु ह
जवानांच्या हत्येच्या बदल्यासाठी भाजपाला मते द्या म्हणण
बुलेट विरोधात महापालिका कोर्टात, ठराव विखंडित कराल तर खब
ब्राम्हणवादी संघटनांकडून पुलावामा घटनेचा वापर मुस्लिम
सत्तेसाठी सरकार दंगली घडवेल, अजित पवारांंचा भाजपावर हल्
आरक्षणासाठी धनगर समाजाचे खासदारांच्या निवासस्थानी ठिय
जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीला मुस्ल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शेतकर्‍यांनी आ
राज्यात बालकामगारांची स्थिती ‘जैसे थे’
विमा योजनेचा सोसायटीत रुपांतर करण्यास विरोध
पाकिस्तानविरोधी भावना भडकावून निवडणुकीत भाजपा फायदा उठ
देश शोकसागरात बुडाला असताना मोदी सभा कसे घेतात
‘बेरोजगारीने युवक अस्वस्थ’, माजी प्रधानमंत्री मनमोहन स
जम्मू-काश्मीरमध्ये बॉम्बस्फोटात ५७ टक्के वाढ
शरद करळसकरने खुनासाठी वापरलेली हत्यारे वसईच्या खाडीत फ
जवानांच्या कुटुंबीयांसाठी वर्षाकाठी मिळतेय अवघ्या ‘सव
घटनात्मक मार्गाने समाजात बदल घडवा
नीतीश कुमारांविरोधात फास आवळला
पाचशे कोटी खर्च करूनही गोदावरी प्रदूषितच
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७ शेतकर्‍यांनी संपविली जीवनय
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper