×

गँगरेप प्रकरणावरून माजी अधिकार्‍यांनी मोदींना धरले जबाबदार

Published On :    16 Apr 2018
साझा करें:

पत्र लिहून सांगितले स्वातंत्र्यानंतरची सर्वात अंधकारमय वेळ



नवी दिल्ली : उन्नाव व कठुआ गँगरेप प्रकरणावरून सरकारची लक्तरे वेशीला टांगली जात आहे. यावरून संपूर्ण देशभरात नाराजीचा सूर उमटत आहे. अशा स्थितीत माजी अधिकार्‍यांनी प्रधानमंत्री मोदींना पत्र लिहून देशात आतंक निर्माण करणार्‍या स्थितीसाठी सरकारला जबाबदार ठरविले आहे. 


हा आमचा सर्वात अंधकारमय वेळ असून सरकार आणि राजकीय पार्ट्या अशी स्थिती निपटण्यापासून विफल झाल्या आहेत, अशा कठोर शब्दात टीका करण्यात आली आहे. 


नागरी सेवांशी संबंधित तरूण लोकांना वाटते की, ते आपली जबाबदारी पूर्ण करण्यात अपयशी सिद्ध झाले आहेत. त्यंानी पीडित कुटुंबाची माफी मागावी. जलदगती न्यायालय स्थापन करून या प्रकरणात सर्व पक्षांची एक बैठक बोलवावी, असे आव्हान माजी अधिकार्‍यांनी मोदींना दिले आहे.


देशात झालेल्या दोन गँगरेप प्रकरणाने देशाला हादरून सोडले आहे. उत्तरप्रदेशात जवळपास एका आठवड्यापूर्वी एका महिलेने मुख्यमंत्री योगींच्या घराबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 


महिलेचा आरोप होता की, कुलदिप सिंह सेंगर यांनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणावरून मोठा विरोध झाल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर आरोपी आमदाराला अटक करण्यात आली. 


कठुआ प्रकरणात तर अत्याचार करणार्‍यांनी कहरच केला. मुस्लिमांना त्या क्षेत्रातून पळवून लावण्यासाठी आठ वर्षाच्या मुलीची अपहरण करून तिला जंगलात घेऊन गेले व तिच्यावर बलात्कार केला व नंतर तिची हत्याही केली. उन्नाव व कठुआ या दोन्ही प्रकरणात सरकारने प्रथम आरोपींचे समर्थनही केले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बुलेट ट्रेनला गुजरातच्या शेतकर्‍यांचाही विरोध
अमित शहांचे मनसुबे उधळवून लावणारे मंत्री शिवकुमार ‘ईडी
हिंदु धर्मातील अनिष्ट प्रथांवर सोशल मीडियातून टीका हा ग
तुझा पाय तोडेन
ओएनजीसीसाठी दिल्लीतील कृषी भवनात बनावट मुलाखती
राज्यावर भारनियमनाचे सावट
महागाईचा पुन्हा भडका
मोहनदास गांधीना नेता मानल्याने ओबीसींची वाताहात
स्वत:च्या वर्चस्वासाठी ब्राम्हणांनी ११ वेळा केले भारता
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार?
सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निल
२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द
परराज्यातील ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण द्या
साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची ४०० कोटींची फसवणूक?
नरेंद्र मोदी ठरले ‘प्रसिध्दी विनायक’
बँकांचे १ हजार २२४ कोटींचे कर्ज थकवले
राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात
करार कमी दरात असेल तर १२६ ऐवजी ३६ राफेल का खरेदी केले
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी
निवडणूक आयोगच ईव्हीएम घोटाळा करण्यात सहभागी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper