×

भाजपचे २० नेते बलात्कारी घटनांशी संबंधित

Published On :    17 Apr 2018
साझा करें:

भाजप म्हणजे बलात्कार जनता पार्टी कॉंग्रेस नेते कमलनाथ यांचे खळबळजनक वक्तव्य



नवी दिल्ली : भाजपचे २० नेते बलात्कार घटनांशी संबंधित आहेत. त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी नसून बलात्कार जनता पार्टी आहे, असे खळबळजनक वक्तव्य मध्य प्रदेशमधील छिंदवाडाचे कॉंग्रेस खासदार कमलनाथ यांनी केले आहे. 


त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कटुआ आणि उन्नाव या बलात्कार प्रकरणाचे कॉंग्रेसकडून राजकारण सुरु आहे, असा आरोप भाजपने केला आहे. या आरोपाला उत्तर देताना कॉंग्रेसचे खासदार कमलनाथ यांनी चांगलाच पलटवार केला आहे. 


मी काही ठिकाणी वाचले आहे की, भाजपचे २० नेते बलात्कारी घटनांशी संबंधित आहेत. त्यामुळे या पक्षाचे नाव भाजप नसून बलात्कार जनता पार्टी आहे, याचा विचार जनतेने करायला हवा. कमलनाथ यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, आम्ही कमलनाथ यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्ये येईल याची कल्पना केली नव्हती. 


कारण ते कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. परंतु त्यांनी त्यांची पातळी ओलांडली आहे. आपल्या शब्दांची मर्यादा त्यांनी ओळखायला हवी होती. तर या अगोदर भाजपचे खासदार मनोहर उंटवाल यांनीही खळबळजनक वक्तव्य केले आहे. 


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या विरोधात कोणी बोलेल त्यांचा अपमान करेल तर त्यांना जोड्याचा मार खावे लागेल. त्याचबरोबर प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांना अपमानीत करणार्‍यांना या जगातून नाहीसे केले जाईल, असा इशारा दिला आहे. 


याआधी उंलटवाल यांनी कॉंग्रेसचे नेते दिग्वीजय सिंह यांच्यावरही खळबळजनक वक्तव्य करुन रोष ओढवून घेतला होता.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शेम..! शेम..! विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार
मोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले
आपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो
भीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय
धक्कादायक ! गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा
मराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे! शिक्षण विभ
सहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा
मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व
गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी
उद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले
पोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर
लोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग
यापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही
सच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल
जन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला!
सनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष
नाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित
सीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा
महाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली
अनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper