×

तिसर्‍या टप्प्यातही ईव्हीएममध्ये बिघाडसत्र सुरुच

Published On :    23 Apr 2019
साझा करें:

मताधिकार न बजावताच अनेक जण परतले माघारी



मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या १४ मतदारसंघांमध्ये तिसर्‍या टप्प्यातील व्होटींगला सुरुवात झाली आहे. उन्हाचा ताप टाळण्यासाठी सकाळी-सकाळी व्होटींग बुथवर गेलेल्या मतदारांना अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने ताटकळत रांगेत उभे रहावे लागले. यामुळे अनेकजण मताधिकार न बजावताच माघारी परतल्याचे चित्र दिसत आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात ईव्हीएममध्ये बिघाडीच्या तक्रारी आल्यानंतरही निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे.यामुळे तिसर्‍या टप्प्यातही अनेक पोलिंग बुथवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी येत आहेत. ईव्हीएम बिघाडामुळे अनेक मतदारांनी आपला मताधिकार न बजावताच माघारी परतल्याचे चिन्हे असून मतदारांनी ईव्हीएमवर संताप व्यक्त केला आहे. 


जालन्यातील टाकळी अंबड येथे गेल्या दीड तासापासून ईव्हीएम मशीन बंद आहे. औरंगाबाद येथील बुथ क्रमांक २११, २१० आणि १६१ वर ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर अमळनेर येथे जी एस हायस्कूल पोलिंग बुथवर २० मिनिटे उशिराने व्होटींग सुरू झाले. 


माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा येथील पोलिंग बुथ क्रमांक १५८, १६० वरील ईव्हीएम मशीन बंद होते. याच मतदारसंघातील सांगोला येथील भोपळे रोडवरील मराठी शाळा नंबर १ येथील पोलिंग बुथ क्रमांक १४० मधील ईव्हीएम मशीन एक तास झाले बंद पडले होते. यामुळे मतदार खोळंबून निघून गेले. तसेच न्यू इंग्लिश स्कूल पोलिंग बुथवरील १५५ मशीन बंद असल्यामुळे व्होटींग प्रक्रिया खोळंबली होती. तर भीमनगर येथे मत केल्यानंतर मशीनचे बटन दाबले जात नव्हते त्यामुळे व्होटींग थांबले होते.


औरंगाबादमधील पोलिंग बुथ क्रं.२२२, २१९ वरील मशीन तासभर सुरू न झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. डोकेवाडी (ता.श्रीगोंदा) पोलिंग बुथवर ईव्हीएम बंद पडल्याने अर्धा तास उशीरा व्होटींग सुरू झाले. तर कोल्हापूरमध्ये सात ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरूच झालेल्या नसल्याने मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सातारातील जवळवाडी ( मेढा) येथे ईव्हीएम मशीन नादुरूस्तीमुळे ४५ मिनिटे उशिराने व्होटींगला सुरूवात झाली. चोपडा तालुक्यात दोन केंद्रांवर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडामुळे उशिराने मतदान सुरू झाले. 


अलिबाग विधानसभा मतदार संघात थळ चाळमळा साई मंदिर पोलिंग बुथ मशीन बिघडल्यामुळे सकाळी ९ वाजता मतदान सुरु झाले आहे. तर सांगलीत गुजराती हायस्कुलमध्ये मशिन बंद पडल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. तासभर वाट पाहून पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेकजण मताधिकार  न बजावता माघारी परतले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपने मोठा ‘गेम’ खेळलाय, शत्रुघ्न सिन्हांना संशय
भाजपचा विजय हा जनभावनेचा पराजय
या निवडणुकीत हेराफेरी झाल्याची शक्यता
मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमक
सर्वोेच्च न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण केली नाही-चेलमेश
भूषण गवईंसह चौघांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी न
ब्राम्हण- बनियांचे वृत्तपत्र, वाहिनी आणि पत्रकार !
थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग
‘भाजपाच्या ईव्हीएम सेटींगची कमाल आणि दलाल मीडियाची धमा
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्यापासून बेमुदत भारत बंद
भाजपाने निकालाची लुटमारी केल्यास रस्त्यावर रक्ताचे पाट
​युती शासनाच्या चार वर्षांत मच्छिमारांचे ३२ कोटी रखडले
‘एक्झिट पोलवर बंदी घाला’, बाबू कवळेकर यांची मागणी
लोकसभा निवडणूक निकालाची उद्या नौटंकी
फडणवीस सरकारकडून शेतकर्‍याची क्रूर थट्टा
निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब
जगभरात बॅलेट पेपर स्विकारला जात असताना भारतातच ईव्हीएम
गाजीपूर, चंदौली, मऊ, वाराणसीत ईव्हीएम बदलण्याच्या अफवेने
मुलायमसिंह- अखिलेश यादव यांना दिलासा
दिल्लीत २१ विरोधी पक्षांची ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर महत
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper