×

‘शिवसेनालाही मत देऊ नका’, मुंबईच्या सभेत राज ठाकरे यांचा हल्लाबोल

Published On :    24 Apr 2019
साझा करें:

मोदींची सत्ता न येण्यासाठी भाजपाला मत देऊ नका तसेच भाजपाच्य सोबत असलेल्या शिवसेनेला मत देऊ नका. कारण त्यांना मत देणे म्हणजे या दोघांना मत देण आहे, असे म्हणत राज यांनी मुंबईतील पहिल्याच सभेत शिवसेनेवर निशाना साधला.



मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भाषणातून शिवसेनेचे नाव घेऊन हल्लाबोल केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन माणसं या देशासमोरील सर्वात मोठ संकट आहेत. त्यामुळे या दोन माणसांना निवडणूक देऊ नका, भाजपाला निवडून देऊ नका असे आवाहन राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या सभेत केले. मात्र, गेल्या ६ सभांमध्ये कुठेही उल्लेख न केलेल्या शिवसेनेचा उल्लेख करत शिवसेनेलाही मत न देण्याचे आवाहन राज यांनी प्रथमच केले. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आश्‍वासनांची पोलखोल करणार्‍या सभांचा धडाका लावला आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात राज ठाकरे यांनी सभा घेतली. काळाचौकी येथील सभेतही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले.


या सभेत प्रथमच राज ठाकरेंनी शिवसेनेचे नाव घेत शिवसेनला मत न देण्याचे आवाहन केले. राज यांची सभा झालेला काळा चौक परिसर हा विधानसभेसाठी शिवडी आणि लोकसभेसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून शिवसेनेच अरविंद सावंत उमेदवार आहेत, तर कॉंग्रेसकडून मिलिंद देवरा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, पहिल्यांदाच शिवसेनेचे नाव घेऊन राज यांनी सेनेला मत म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहांना मत, असे म्हटले आहे. 


नरेंद्र मोदी आणि अमित शहांना मला सांगायचंय, आज तुम्ही ईडी आणि सीबीआयच्या धमक्या देताय, धाडी घालताय. पण, उद्या तुम्हीही विरोधी पक्षात जाणार, त्यामुळे उद्या जेव्हा तुमच्यावरही धाडी पडतील ना, तेव्हा समजेल की नोटाबंदी हा या देशातील सर्वात मोठा घोटाळा असेल, असे म्हणत राज यांनी भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. 


तसेच, मोदींची सत्ता न येण्यासाठी भाजपाला मत देऊ नका तसेच भाजपाच्य सोबत असलेल्या शिवसेनेला मत देऊ नका. कारण त्यांना मत देणे म्हणजे या दोघांना मत देण आहे, असे म्हणत राज यांनी मुंबईतील पहिल्याच सभेत शिवसेनेवर निशाना साधला.


दरम्यान, काही लोक या लोकसभा निवडणुकीत सभा घेऊन युतीला मत देऊ नका, असे आवाहन करत फिरत आहेत. युतीला मत द्यायचे नाही तर मग कोणाला मत द्यायचे, ते तरी सांगा, असे विचारल्यावर त्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. जे लोक आपला पक्ष चालवू शकले नाही, त्यांच्या पक्षाची दिशा हरपली आणि दुर्दशा झाली, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
महाराष्ट्रातही मॉब लिंचिंग
ब्राम्हण हा बहुजनांचा रक्त शोषणारा पॅरासाईट
मुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर? अमृता फडणवीस यांच्या
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्याला अटक
स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या भाजपा खासदाराला को
‘देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’; पोस्
ईव्हीएम विरोधामुळेच राज ठाकरेंवर चौकशीचा ससेमिरा
मनसेचा भाजपावर ‘कार्टूनवार’
सुवर्ण पदक विजेत्या मुलीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पदक
संत रविदास मंदिर तोडल्याप्रकरणी उद्या दिल्लीत आंदोलन
तुम्ही आरक्षणावर चर्चा करा आम्ही ईव्हीएम घोटाळ्यावरच च
राजकीय आरक्षण वाढवल्यास आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार
महिंद्रा अँड महिंद्राने १५०० जणांना काढून टाकले
लोकसभेच्या २०० माजी खासदारांना अजूनही हवी सरकारी बंगल्
एसआयटी आज आरोपी व अधिकार्‍यांचा जबाब नोंदवणार
चौकशीसाठी सीबीआयला आणखी दोन आठवड्यांची मुदत
ईडीच्या अशा नोटीशीला भीक घालत नाही
भारत सांस्कृतिकदृष्ट्या हिंदुराष्ट्रच
तरीही ट्रकचालकाने कारचा केला चेंदामेंदा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper