×

चौथ्या टप्प्यातील ३२३ पैकी १०९ उमेदवार कोट्यधीश, ६४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे

Published On :    25 Apr 2019
साझा करें:

निवडणूक आयोगाकडे उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे विश्‍लेषण असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक्स रिफॉर्म्स या संस्थेने केले असून त्यांच्या अहवालानुसार चौथ्या टप्प्यातील १७ मतदारसंघात कोट्यधीश उमेदवारांची संख्या अधिक आहे.



मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघात येत्या २९ एप्रिल रोजी व्होटींग होत असून निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ३२३ पैकी तब्बल १०९ उमेदवार कोट्यधीश आहेत. तर ६४ उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवित असलेले वंचित बहुजन आघाडीचे संजय भोसले हे सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांची एकूण संपत्ती १२५ कोटींहून अधिक आहे.


निवडणूक आयोगाकडे उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे विश्‍लेषण असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक्स रिफॉर्म्स या संस्थेने केले असून त्यांच्या अहवालानुसार चौथ्या टप्प्यातील १७ मतदारसंघात कोट्यधीश उमेदवारांची संख्या अधिक आहे. पक्षनिहाय उमेदवारांची सरासरी मालमत्ता पाहिली असता कॉंग्रेसच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता ४०.२ कोटी असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वच्या सर्व सात उमेदवार कोट्यधीश आहेत.


३२३ पैकी ८९ उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणे दाखल असल्याचे नमूद केले असून त्यापैकी ६४ जणांविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.


राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांकडे सरासरी २१.०९ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. भाजपच्या ७ उमेदवारांकडे १७.२३ कोटी, शिवसेनेच्या १० उमेदवारांकडे २०.१४ कोटी, वंचित बहुजन आघाडीच्या १७ उमेदवारांकडे ९.८७ कोटी, तर बहुजन समाज पक्षाच्या १५ उमेदवारांची सरासरी मालमत्ता १.२२ कोटी एवढी आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे (मावळ) यांच्याकडे १०२ कोटींची संपत्ती आहे. दोन उमेदवारांकडे शुन्य संपत्ती असल्याचे घोषित केले आहे. २८ उमेदवारांनी उत्पन्नाचा स्त्रोत घोषित केलेला नाही.


चौथ्या टप्प्यातील ३२३ उमेदवारांपैकी १६२ जणांची शैक्षणिक पात्रता ५ वी ते १२, १३१ उमेदवार पदवी ते डॉक्टरेट असून तिघेजण अशिक्षित आहेत.५० उमेदवार दहावी पास आहेत. दोन उमेदवारांनी त्यांच्या विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नाशिकचे उमेदवार पवन चंद्रकांत पवार यांनी त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे घोषित केले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपने मोठा ‘गेम’ खेळलाय, शत्रुघ्न सिन्हांना संशय
भाजपचा विजय हा जनभावनेचा पराजय
या निवडणुकीत हेराफेरी झाल्याची शक्यता
मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमक
सर्वोेच्च न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण केली नाही-चेलमेश
भूषण गवईंसह चौघांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी न
ब्राम्हण- बनियांचे वृत्तपत्र, वाहिनी आणि पत्रकार !
थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग
‘भाजपाच्या ईव्हीएम सेटींगची कमाल आणि दलाल मीडियाची धमा
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्यापासून बेमुदत भारत बंद
भाजपाने निकालाची लुटमारी केल्यास रस्त्यावर रक्ताचे पाट
​युती शासनाच्या चार वर्षांत मच्छिमारांचे ३२ कोटी रखडले
‘एक्झिट पोलवर बंदी घाला’, बाबू कवळेकर यांची मागणी
लोकसभा निवडणूक निकालाची उद्या नौटंकी
फडणवीस सरकारकडून शेतकर्‍याची क्रूर थट्टा
निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब
जगभरात बॅलेट पेपर स्विकारला जात असताना भारतातच ईव्हीएम
गाजीपूर, चंदौली, मऊ, वाराणसीत ईव्हीएम बदलण्याच्या अफवेने
मुलायमसिंह- अखिलेश यादव यांना दिलासा
दिल्लीत २१ विरोधी पक्षांची ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर महत
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper