×

गौतम बुध्दांचे अहिंसा तत्वज्ञानच श्रीलंकेला सावरेल

Published On :    25 Apr 2019
साझा करें:

महत्वाचे म्हणजे श्रीलंकेत आजपर्यंत शांती असली तरी ही तर सुरुवात आहे. मुस्लीम दहशतवादी संघटनेचे जाळे पहिल्या स्थानावर असतांना त्यातून श्रीलंका सुटेल कसा? कदाचित श्रीलंकेतही असे बॉम्बस्फोट करुन जगात दहशत पसरवावी हा तर उद्देश या संघटनेचा नाही? पण श्रीलंका बौध्द तत्वज्ञानावर चालणारा देश असून गौतम बुध्दांच्या अहिंसा तत्वज्ञानाने देशातील नागरिकांना हाताळावे. संयम न सोडता घाबरुन जावू नये.



भारताच्या शेजारी असलेल्या श्रीलंकेमध्ये बॉम्बस्फोट झाला. त्यामध्ये ५०० लोक जखमी झाले. विदेशी नागरिकही त्यात सहा भारतीय मरण पावले. मुख्य म्हणजे हा हल्ला चर्चमध्ये झाला. तसेच हा हल्ला इस्टर डेच्या निमित्ताने करण्यात आला. तसेच हा हल्ला हॉटेलसह आठ वेगवेगळ्या ठिकाणी झाला.


श्रीलंकेवर हा हल्ला कोणी केला?कशासाठी केला? हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी या हल्ल्यामागे नॅशनल तौहीत जमात या कट्टर मुस्लीम संघटनेचा हात असावा असे वाटत आहे. तसे पाहिल्यास या हल्ल्याची जबाबदारी कोणीच घेतलेली नाही. फक्त अंदाज व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यामुळे श्रीलंका सरकार धास्तावले असून दिवसभर हायऍलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विमान उड्डाणालाही बंदी घातली आहे.


रविवारी सकाळी सहा वाजता लंकेत बॉम्बस्फोट झाल्यानंतर सुमारे पाच तासानंतर आणखी बॉम्बस्फोट झाले. दहशतवाद्यांनी सेंट अँटनी चर्च, सेंट सेबेस्टीयन चर्च आणि कट्टीकलोवा चर्चला लक्ष करीत पंचतारांकीत हॉटेलसह आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. या हल्ल्यामागील कारणमीमांसेपूर्वी श्रीलंकेचा मागील इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.


श्रीलंका हा खरा तर शांततावादी देश. बौध्द संस्कृती आजही तिथे अस्तित्वात आहे. याच बौध्द मंडळींना तिथे सिंहली म्हणतात. पूर्वी या श्रीलंकेला सीलोन म्हणत. त्याचीही मनोरंजक कथा आहे. सम्राट अशोकाच्या कलिंगमार्गे (आजचा ओडीसा) एक विजय नावाचा राजा या श्रीलंकेत आला. त्याने येथील अलौकिक सौंदर्य न्याहाळले व तो या लंकेत स्थायिक झाला. या राजाच्या जन्मामागे आख्यायिका होती की या राजाच्या जन्म राजकन्या व सिंह यांच्या मिलनातून झाला आहे. म्हणून तो सिंहली वंशाचा आहे. या मंडळींना सिंहली म्हटले जावे.


येथे शतप्रतिशत जनता सम्राट अशोकाच्या धर्मप्रसाराने व त्यांनी संघमित्रा व महेंद्राला श्रीलंकेत पाठवल्याने बौध्द झाली आहे. बौध्द धम्माचे प्रमाण येथे सत्तर टक्के, मुस्लीम मंडळी दहा टक्के, तामीळ बारा टक्के व साडे सात टक्के ख्रिश्‍चन मंडळी असून अर्धा टक्का इतर धर्माची मंडळी आहेत. त्यामुळे साहजिकच या देशावर बौध्द धम्माचा कब्जा आहे. 


बारा टक्के असलेल्या तामीळांवर तिथे फार अत्याचार आतापर्यंत होत आले आहेत. येथील तामीळावर होत असलेल्या अत्याचारामुळे तामीळांनी स्वतंत्र्य राज्याची मागणी केली होती. जसा भारतात काश्मीर वाद आहे.तसा श्रीलंकेत तामीळ वाद आहे. या तामीळांना तर काही वर्षापुर्वी येथील सरकारने नोकरीतून कमी तर केलेच होते. 


शिवाय त्यांनी नोकरी करण्याचा अधिकार नाही असा फतवाही काढला. यामुळे ही गोष्ट आपल्या स्वातंत्र्यावर घाला आहे असा विचार करुन प्रभाकरन लिट्टेच्या नेतृत्वात येथील जनता लढत राहिली. हे गृहयुध्द प्रभाकरनच्या मृत्युनंतर संपले. २००९च्या सत्तासंघर्षात कित्येक लोकं मरणही पावले.


श्रीलंकेची मुळ भाषा सिंहली असून हा देश ४ फेब्रुवारी १९४८ ला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला. या देशावर जुन्या काळी चोल वंशाने राज्य केले असून बरेच दिवस येथे पोर्तुगीजाचे वास्तव्य राहिले आहे. हे पोर्तुगीज दालचिनीच्या व्यापारासाठी येथे टिकून होते. पुढे दालचिनीच्या लोभाने आलेल्या डचांनी १६३० मध्ये हल्ला करुन श्रीलंकेवर आपले राज्य प्रस्थापित केले.


इस १६६० मध्ये सिलोनचा राजा कैंडी याने एका इंग्रज खलाशाला कैद केले. या खलाशाला १९ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. पुढे तो तुरुंगातून पळून आपल्या देशात गेला. त्याने एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकात श्रीलंकेचे वर्णन आहे. कालांतराने हे पुस्तक इंग्रजांनी वाचल्यानंतर ते १८०० मध्ये श्रीलंकेत आले व त्यांनी या देशाचा राजा कैंडी याच्याबरोबर युध्द पुकारले. यात १८१८ मध्ये कैंडी राजा शेवटचा याने इंग्रजांसमोर शरणागती पत्करली तेव्हापासून १९४८ पर्यंत इंग्रजांचा एकछत्री अंमल सुरु झाला.


देश स्वतंत्र झाल्यावर काही दिवस शांतता राहिली. सिलोन नाव बरे वाटत नसल्याने १९७२ मध्ये आपल्या राजाचे नाव चालावे म्हणून लंका नाव ठेवण्यात आले. कारण रावण याच देशाचा रहिवाशी होता. पुढे १९७८ मध्ये या लंका नावासमोर श्री लावण्याचा आदेश पारीत होवून या देशाचे नाव श्रीलंका पडले. 


श्रीलंकेत जवळपास पंचवीस वर्ष गृहयुध्द चालले आणि आता दहा वर्ष शांतता असली तरी आज तिथे झालेल्या बॉम्बस्फोटावरुन तिथे आजही शांतता नाही असे वाटते. काल तामीळवरुन वाद होता. जवळपास तामीळ वाढू नये म्हणून अलगाववासीय वाद. आज कदाचित ख्रिश्‍चन वाढू नये म्हणून ख्रिश्‍चन सिंहली वाद तर या हल्ल्यामागे नसावा ना अशी शक्यता नाकारता येत नाही. नॅशनल तौहीत जमातचे या कटामागे नाव घेण्याचा उद्देश एवढाच की या संघटनेने काही बौध्द स्थळावरही हल्ले केले होते.


महत्वाचे म्हणजे श्रीलंकेत आजपर्यंत शांती असली तरी ही तर सुरुवात आहे. मुस्लीम दहशतवादी संघटनेचे जाळे पहिल्या स्थानावर असतांना त्यातून श्रीलंका सुटेल कसा? कदाचित श्रीलंकेतही असे बॉम्बस्फोट करुन जगात दहशत पसरवावी हा तर उद्देश या संघटनेचा नाही? पण श्रीलंका बौध्द तत्वज्ञानावर चालणारा देश असून गौतम बुध्दांच्या अहिंसा तत्वज्ञानाने देशातील नागरिकांना हाताळावे. संयम न सोडता घाबरुन जावू नये.

        

अंकुश शिंगाडे

९९२३७४७४९२

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
महाराष्ट्रातही मॉब लिंचिंग
ब्राम्हण हा बहुजनांचा रक्त शोषणारा पॅरासाईट
मुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर? अमृता फडणवीस यांच्या
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्याला अटक
स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या भाजपा खासदाराला को
‘देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’; पोस्
ईव्हीएम विरोधामुळेच राज ठाकरेंवर चौकशीचा ससेमिरा
मनसेचा भाजपावर ‘कार्टूनवार’
सुवर्ण पदक विजेत्या मुलीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पदक
संत रविदास मंदिर तोडल्याप्रकरणी उद्या दिल्लीत आंदोलन
तुम्ही आरक्षणावर चर्चा करा आम्ही ईव्हीएम घोटाळ्यावरच च
राजकीय आरक्षण वाढवल्यास आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार
महिंद्रा अँड महिंद्राने १५०० जणांना काढून टाकले
लोकसभेच्या २०० माजी खासदारांना अजूनही हवी सरकारी बंगल्
एसआयटी आज आरोपी व अधिकार्‍यांचा जबाब नोंदवणार
चौकशीसाठी सीबीआयला आणखी दोन आठवड्यांची मुदत
ईडीच्या अशा नोटीशीला भीक घालत नाही
भारत सांस्कृतिकदृष्ट्या हिंदुराष्ट्रच
तरीही ट्रकचालकाने कारचा केला चेंदामेंदा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper