×

राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा अहवाल पुढील आठवड्यात?

Published On :    17 Jun 2019
साझा करें:

डॉ. पायल तडवी हत्या प्रकरण



मुंबई : डॉ. पायल तडवी हत्याप्रकरणी चौकशी करत असलेल्या राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा अहवाल पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा योग्यरीतीने तपास होत आहे का याचा आढावा आयोग घेत आहे.


आयोग तीन दृष्टिकोनातून या घटनेची चौकशी करत आहे. यामध्ये पायल यांचा झालेला छळ हा रॅगिंगचा भाग आहे का? वैद्यकीय प्रवेश घेतल्यापासून गेल्या आठ वर्षांत पायल यांना रॅगिगबाबत काही माहिती होती का, एमबीबीएसपासून पायल या अशा प्रकारच्या छळाला सामोर्‍या जात होत्या का आणि यामधून पायल यांची मानसिक स्थिती नेमकी काय होती हे समजून घेत आहोत. 


नायर रुग्णालयातील रॅगिग समितीचा कार्यकाल, सभासद, रॅगिंगविषयी जनजागृतीसाठी केलेले उपक्रम आणि गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या समितीच्या बैठका याचा आढावा घेतला गेला. नायरच्या स्त्रीरोग विभागामध्ये राखीव कोट्यातून पायल यांच्यासोबत अन्य किती विद्यार्थी शिकत होते. त्यांचे अनुभव काय आहेत, याची माहिती घेत आहोत. या सोबतच पोलिसांच्या तपासाबाबत जाणून घेत असल्याचे राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायाधीश थूल यांनी सांगितले.


आयोगाचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील आठवड्यात तो राज्य सरकारला दिला जाईल. या अहवालात अशाप्रकारच्या रॅगिंगच्या घटना भविष्यात घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय सुचविण्यात येणार असल्याचे आयोगाने सांगितले. या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर यांना लगेचच न्यायालयीन कोठडी देऊन न्यायालयाने याची चौकशी करण्याची संधीच दिलेली नाही. पोलिसांकडून हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे गेल्यानंतर आरोपींच्या चौकशीसाठी पुरेसा अवधी देणे गरजेचे होते, असे मत थूल यांनी व्यक्त केले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आमदार फोडण्यासाठी २ कोटी, पेट्रोलपंपाची ऑफर
इराणने अमेरिकेचे १७ हेर पकडले
‘जय श्रीराम’च्या घोषणांची सक्ती करत औरंगाबादमध्ये झोमॅ
‘धार्मिक हिंसाचारातील पीडितांचा संघर्ष मोठा’
पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलायला हवी
शाळेचे दप्तर मागितलं म्हणून बापाने आपल्या दोन मुलांना प
भारताच्या आर्थिक वृध्दीदरात आशियाई विकास बँकेने केली घ
पोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला
ऐन विधानसभेच्या तोंडावर काढलेली यात्रा काय कामाची?
मुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला आग
वाचाळ प्रज्ञा ठाकूरला भाजपाने फटकारले
हिमा दासची सोनेरी दौड
२०३० पर्यंत ४० टक्के जनतेची पाण्यासाठी मारामार; देशभरात
सत्तेत असणार्‍यांनी मोर्चा काढायचा नसतो
‘एसटी’ला चांगले दिवस येण्यासाठी शासनात विलीन करा
सहा महिन्यांत १३०० शेतकरी आत्महत्या
महिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशामध्ये आइसलँड प्रथम तर
विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात
उपासमारीमुळे ग्रामस्थांनी गाव काढले विक्रीला!
मुंबई विद्यापीठाचे ११३ परीक्षांचे निकाल रखडलेलेच
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper