×

ओबीसी, अनुसूचित जाती, जमातींना औटघटकेचे मंत्रिपद देत विधानसभा निवडणुकीत मते खेचण्याचा ब्राम्हणी कावा

Published On :    17 Jun 2019
साझा करें:

राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. परंतु या मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसी, अनुसूचित जाती, जमातींना औटघटकेच्या मंत्रिपदाचे स्थान देत आगामी विधानसभा निवडणुकीत मते खेचण्याचा हा ब्राम्हणी कावा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.



मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. परंतु या मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसी, अनुसूचित जाती, जमातींना औटघटकेच्या मंत्रिपदाचे स्थान देत आगामी विधानसभा निवडणुकीत मते खेचण्याचा हा ब्राम्हणी कावा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.


गेली साडेचार वर्षे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडवण्यात आला. आता दोन-तीन महिन्यांवर म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागतील. म्हणजे या मंत्र्यांना जेमतेम दोन महिने काम करण्याची संधी आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आधी का करण्यात आला नाही? असा सवालही केला जात आहे. 


या विस्तारात कुणबी, माळी, तेली या ओबीसींच्या जातींना चुचकारण्याचा प्रयत्न झाला आहे. तर आदिवासींनाही मंत्रिपद देऊन त्यांची मते मिळवण्याचा हा खटाटोप आहे. विदर्भातील कुणबी समाजाच्या तीन नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यातील दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्री आहे. बुलढाणा जळगाव जामोद मतदारसंघातील डॉ.संजय कुटे, वरूड मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे या दोघांना कॅबिनेट तर भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले डॉ.परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.


भाजपाचे नेते पांडुरंग फुंडकर हे कुणबी समाजाचे. त्यांचे कृषीमंत्री असताना निधन झाले. परंतु आता तीन कुणबी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन कुणबी मते मिळवण्याचा हा डाव आहे.  माळी समाजालाही गोंजारण्याचा प्रयत्न झाला आहे. औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तेली समाजाचे दोन कॅबिनेट मंत्री झाले आहेत. 


ऊर्जा व उत्पादन शुल्कमंत्री भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे व बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपदी आले आहेत. हे दोघेजणही तेली समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, तानाजी सावंत, बाळा भेगडे हे मराठा समाजाचे आहेत. सुरेश खाडे व अविनाश महातेकर हे अनुसूचित जातींचे प्रतिनिधीत्व करतात. 


अनुसूचित जातीला मंत्रिमंडळात स्थान देऊन चळवळीचा रोखण्याचा प्रयत्न आहे. त्यांना अनुक्रमे कॅबिनेट व राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. राळेगावचे आमदार डॉ.अशोक उईके यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन आदिवासींना गोंजारण्याचा प्रयत्न झाला आहे. एकंदरीत मंत्रिमंडळाचा विस्तार पाहता एखादे बाळ रडत असेल तर त्याच्या हातात जसा खुळखुळा देऊन गप्प बसवले जाते तसेच कुणबी, माळी, तेली, अनुसूचित जाती, आदिवासी लोकांच्या हाती मंत्रिपदाचे खुळखुळे देऊन त्यांना गप्प बसवले गेले आहे. 


म्हणजे हे औटघटकेचे मंत्रिपद आहे. ही औटघटकेची मंत्रिपदे देऊन या जातीसूमहांची मते खेचण्याचा ब्राम्हणी कावा आहे हे लक्षात आल्यावाचून राहत नाही अशा प्रतिक्रिया सामाजिक विश्‍लेषक व मतदार व्यक्त करताना दिसत आहेत.  

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आमदार फोडण्यासाठी २ कोटी, पेट्रोलपंपाची ऑफर
इराणने अमेरिकेचे १७ हेर पकडले
‘जय श्रीराम’च्या घोषणांची सक्ती करत औरंगाबादमध्ये झोमॅ
‘धार्मिक हिंसाचारातील पीडितांचा संघर्ष मोठा’
पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलायला हवी
शाळेचे दप्तर मागितलं म्हणून बापाने आपल्या दोन मुलांना प
भारताच्या आर्थिक वृध्दीदरात आशियाई विकास बँकेने केली घ
पोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला
ऐन विधानसभेच्या तोंडावर काढलेली यात्रा काय कामाची?
मुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला आग
वाचाळ प्रज्ञा ठाकूरला भाजपाने फटकारले
हिमा दासची सोनेरी दौड
२०३० पर्यंत ४० टक्के जनतेची पाण्यासाठी मारामार; देशभरात
सत्तेत असणार्‍यांनी मोर्चा काढायचा नसतो
‘एसटी’ला चांगले दिवस येण्यासाठी शासनात विलीन करा
सहा महिन्यांत १३०० शेतकरी आत्महत्या
महिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशामध्ये आइसलँड प्रथम तर
विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात
उपासमारीमुळे ग्रामस्थांनी गाव काढले विक्रीला!
मुंबई विद्यापीठाचे ११३ परीक्षांचे निकाल रखडलेलेच
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper