×

गेल्या १२ वर्षात प्रथमच मान्सूनची धीम्या गतीने वाटचाल!

Published On :    19 Jun 2019
साझा करें:

भारतीय हवामान खात्याच्या नोंदीनुसार माहिती समोर



नवी दिल्ली : यंदा मान्सूनचे आगमन लांबले. त्याला वायू चक्रीवादळ देखील कारणीभूत आहे. मॉन्सून अद्याप दक्षिण भारतातच आहे. त्याचा वेग मंदावला आहे. गेल्या १२ वर्षात प्रथमच मॉन्सूनची धीम्या गतीने वाटचाल राहिली आहे, असे भारतीय हवामान विभागाकडील नोंदीनुसार दिसून आले आहे.


सर्वसाधारणपणे दरवर्षी जूनच्या तिसर्‍या आठवड्यात मान्सून देशाचा दोन तृतीयांश भाग व्यापतो. मात्र, यंदा आतापर्यंत मान्सूनने केवळ देशाचा १० ते १५ टक्के भाग व्यापला आहे. मान्सूनची गती मंदावल्याने देशभरात जूनमध्ये होणार्‍या पावसात ४४ टक्के तूट नोंदविण्यात आली आहे. 


देशात २०१३ मध्ये मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने झाली होती. या वर्षी मान्सूनने १६ जून पर्यंत संपूर्ण देश व्यापला होता. मान्सूनने आतापर्यंत केरळ, कर्नाटकचा दक्षिण भाग, तामिळनाडूचा दोन तृतीयांश भाग आणि ईशान्य भारताचा बहुतांश भाग व्यापला आहे. पुढील तीन-चार दिवसांत मान्सून कोकण आणि गोव्यात पोहोचेल. तर २५ जूनपर्यंत मान्सून दक्षिण भारताचा संपूर्ण भाग, महाराष्ट्र आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


मान्सूनचे आगमन लांबल्याने महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य भारताच्या काही भागात पाण्याची टंचाई तीव्र बनली आहे. या भागातील धरणे आटत असून एकूण क्षमतेच्या केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. शेती संकटात आली आहे. यामुळे शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पहात आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रपती राजवटीविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणा
...तरच पाठिंबा; कॉंग्रेसच्या शिवसेनेसमोर अटी
१४० शेतकर्‍यांची दीड कोटींची फसवणूक
वापरात नसलेल्या स्विस खात्यांतील रकमा मिळणार तेथील सरक
औद्योगिक उत्पादन सात वर्षांच्या तळात, सप्टेंबर महिन्या
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, आदेशावर रामनाथ कोव
रामदेव बाबाची ब्राम्हणांसाठी पोपटपंची, बामसेफ संघटना व
आम्ही आतंकवादी कसे सिध्द न केल्यास बाबा रामदेवला जेलमध्
फडणवीसांच्या लबाडीच्या वागण्यामुळेच दिला आमदारकीचा रा
आरएसएसच्या अजेंड्यावर केंद्रातील भाजपा सरकारचे निर्णय
अयोध्या प्रकरण: विरोधात अपील केले तर तो देशद्रोह नाही
पश्‍चिम बंगाल, बांगलादेशला चक्रीवादळाचा धोका, मुसळधार प
अमित शहा म्हणजे फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू
शाळांची होणार फेरतपासणी, केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकड
‘शिवाजी नव्हेत ते आहेत छत्रपती शिवाजी..!’
कांद्यानं शंभरी गाठल्याने सामान्यांचे हाल, महिलांचं कि
आर्थिक मंदीच्या सावटामुळे भारताला नकारात्मक दर्जा
गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न होता
चीनी बँकांनी अनिल अंबानींना खेचले लंडन कोर्टात
आता लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे, सत्ता स्थापनेचा तिढ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper