×

जेटकडे अडकले प्रवाशांचे ३ हजार २०० कोटी

Published On :    19 Jun 2019
साझा करें:

पैसे परत मिळणार नसल्याची भीती



मुंबई : जेट एअरवेज कंपनी दिवाळखोरीकडे जात असल्याने प्रवाशांच्या रूपातील ग्राहकांना जबर फटका बसणार आहे. या निर्णयामुळे तिकिटांच्या परताव्यासाठी प्रवाशांचा ग्राहक न्यायालयाचा मार्ग बंद झाला आहे. जेटकडून प्रवाशांना जवळपास ३ हजार २०० कोटी रुपये येणे आहे. हे पैसे आता मिळणे अशक्य असल्याची भीती निर्माण झाली आहे.


जेट एअरवेजने यावर्षी फेब्रुवारीपासून उड्डाणांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली. फेब्रुवारीत मुंबईहून उडणारी दररोजची १५२ पैकी ४० विमाने रद्द झाली. मार्चमध्ये हा आकडा ९० च्या वर गेला. १७ एप्रिलपासून सर्वच उड्डाणे बंद करण्यात आली. याचा हजारो प्रवाशांना फटका बसला. एप्रिल व मे महिना पर्यटनाचा असल्याने अनेक प्रवाशांनी जेटच्या सेवांचे आगाऊ बुकिंग केले होते. पण उड्डाणेच रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे नुकसान झाले. 


विमान रद्द झालेल्या सर्व प्रवाशांच्या परताव्यासाठी कंपनीने २७ एप्रिलपर्यंत विमानवळावरील काऊंटर सुरू ठेवले होते. तेथे प्रवाशांकडून अर्ज भरून घेतला जात होता. १५ दिवसानंतर परताव्याची प्रक्रिया सुरू होईल, असे प्रवाशांना सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र प्रवाशांना मूळ तिकिटाच्या जेमतेम ५ टक्के रक्कमेचा परतावा मिळाला आहे. आता तर उर्वरित परतावा मिळण्याचा मार्गही खडतर झाला आहे.


जेटचे आर्थिक व्यवस्थापन बघणार्‍या स्टेट बँकेने कंपनी विक्रीचा प्रयत्न केला. कंपनीचा हिस्सा खरेदी करणारी नवीन कंपनी आली की प्रवाशांना तिकिटांचा परतावा मिळू शकेल, अशी आशा होती. नवीन कंपनीनेही परतावा देण्यास टाळाटाळ केल्यास प्रवाशांना ग्राहक न्यायालयात जाण्याचा मार्ग उपलब्ध होता. पण आता कंपनी दिवाळखोरीत निघणार आहे. त्यामुळेच प्रवासी परताव्याच्या मागणीसाठी ग्राहक न्यायालयात जाऊ शकणार नाहीत. त्याऐवजी त्यांना फौजदारी प्रक्रिया करावी लागणार आहे.


‘ग्राहक न्यायालयात केवळ सेवा प्रदाता अर्थात सेवा देणार्‍याकडून फसवणूक झाल्यास दाद मागता येते. त्यासाठी संबंधित सेवा प्रदात्याची सेवा सुरू असणे अत्यावश्यक असते. तरच ते प्रकरण ग्राहक न्यायालयात येऊ शकते. जेटने सर्व सेवा बंद केल्या आहेत. कंपनीचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. 


सध्या कंपनीचे आर्थिक व्यवस्थापन बघणारी स्टेट बँक सेवा प्रदाता नाही. आता तर कंपनी दिवाळखोरीत जाणार आहे. यामुळे प्रवाशांनी ग्राहक न्यायालयाकडे तक्रार केली तरी विरुद्ध पक्ष कोणीच नसल्याने खटला भरवला जाणे अशक्य आहे. आता फक्त फौजदारी खटल्याचा मार्ग प्रवाशांसमोर उरतो.’

अनिल धुमक
माजी अध्यक्ष, भारतीय ग्राहक मार्गदर्शन केंद्र

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रपती राजवटीविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणा
...तरच पाठिंबा; कॉंग्रेसच्या शिवसेनेसमोर अटी
१४० शेतकर्‍यांची दीड कोटींची फसवणूक
वापरात नसलेल्या स्विस खात्यांतील रकमा मिळणार तेथील सरक
औद्योगिक उत्पादन सात वर्षांच्या तळात, सप्टेंबर महिन्या
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, आदेशावर रामनाथ कोव
रामदेव बाबाची ब्राम्हणांसाठी पोपटपंची, बामसेफ संघटना व
आम्ही आतंकवादी कसे सिध्द न केल्यास बाबा रामदेवला जेलमध्
फडणवीसांच्या लबाडीच्या वागण्यामुळेच दिला आमदारकीचा रा
आरएसएसच्या अजेंड्यावर केंद्रातील भाजपा सरकारचे निर्णय
अयोध्या प्रकरण: विरोधात अपील केले तर तो देशद्रोह नाही
पश्‍चिम बंगाल, बांगलादेशला चक्रीवादळाचा धोका, मुसळधार प
अमित शहा म्हणजे फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू
शाळांची होणार फेरतपासणी, केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकड
‘शिवाजी नव्हेत ते आहेत छत्रपती शिवाजी..!’
कांद्यानं शंभरी गाठल्याने सामान्यांचे हाल, महिलांचं कि
आर्थिक मंदीच्या सावटामुळे भारताला नकारात्मक दर्जा
गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न होता
चीनी बँकांनी अनिल अंबानींना खेचले लंडन कोर्टात
आता लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे, सत्ता स्थापनेचा तिढ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper