×

पाच वर्षात कुपोषणाने महाराष्ट्रात सर्वात जास्त बालकांचा मृत्यू

Published On :    19 Jun 2019
साझा करें:

एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर



मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधानसभेत सरकारला घरचा आहेर दिला. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात कुपोषणाने सर्वात जास्त बालके मृत्यू पावली, आता तरी सरकारला जाग येणार की नाही? असा खडा सवाल त्यांनी केला.


प्रश्नोत्तराच्या तासात आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळेच्या शिक्षकांच्या विविध मागण्यांचा संदर्भात योगेश घोलप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सभागृहात विरोधीपक्षाचे सदस्य आक्रमक झाले होते. त्या प्रश्नांना नव्याने पदभार स्वीकारलेले आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे उत्तरे देत होते. 


उईके यांनी नव्याने पदभार स्वीकारल्यामुळे आणि सभागृहात उत्तर देण्याची पहिलीच वेळ असल्याने ते धोरणात्मक आश्वासन द्यायला थोडे कचरले. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे खडसे यांनी विरोधी सदस्यांच्या सुरात सूर मिसळत मंत्री महोदयाना त्यांच्या शैलीत धारेवर धरले.


निर्णय घेण्यात आला आहे फक्त अंमलबजावणी होत नाही, ते किती दिवसात करणार तेवढेच सांगा असे ते म्हणाले. त्यावर उईके यांनी तांत्रिक माहितीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यावर खडसे संतापले आणि आदिवासींच्या प्रश्नावर सरकार गंभीर होऊन निर्णय घेतले पाहिजेत असे सांगताना कुपोषणाच्या मुद्याला हात घातला. त्यामुळे खडसे विरोधीपक्ष नेते असताना जो पवित्रा घ्यायचे त्याची आठवण पुन्हा एकदा सभागृहाला झाली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आमदार फोडण्यासाठी २ कोटी, पेट्रोलपंपाची ऑफर
इराणने अमेरिकेचे १७ हेर पकडले
‘जय श्रीराम’च्या घोषणांची सक्ती करत औरंगाबादमध्ये झोमॅ
‘धार्मिक हिंसाचारातील पीडितांचा संघर्ष मोठा’
पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलायला हवी
शाळेचे दप्तर मागितलं म्हणून बापाने आपल्या दोन मुलांना प
भारताच्या आर्थिक वृध्दीदरात आशियाई विकास बँकेने केली घ
पोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला
ऐन विधानसभेच्या तोंडावर काढलेली यात्रा काय कामाची?
मुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला आग
वाचाळ प्रज्ञा ठाकूरला भाजपाने फटकारले
हिमा दासची सोनेरी दौड
२०३० पर्यंत ४० टक्के जनतेची पाण्यासाठी मारामार; देशभरात
सत्तेत असणार्‍यांनी मोर्चा काढायचा नसतो
‘एसटी’ला चांगले दिवस येण्यासाठी शासनात विलीन करा
सहा महिन्यांत १३०० शेतकरी आत्महत्या
महिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशामध्ये आइसलँड प्रथम तर
विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात
उपासमारीमुळे ग्रामस्थांनी गाव काढले विक्रीला!
मुंबई विद्यापीठाचे ११३ परीक्षांचे निकाल रखडलेलेच
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper