×

‘एसटी’ला चांगले दिवस येण्यासाठी शासनात विलीन करा

Published On :    20 Jul 2019
साझा करें:

कामगार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे



यवतमाळ : राज्यभरातील अधिकारी, कामगारांना चांगले दिवस यावे यासाठी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा, असे साकडे कामगार संघटनांकडून मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले आहे. महामंडळ केवळ कामगारांमुळे तोट्यात नाही. याची अनेक कारणे आहेत. याचा अभ्यास करून कामगारांचे हित जोपासले जावे. कामगारांना राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन व भत्ते दिल्यास ‘एसटी’ला चांगले दिवस येतील, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.


एसटी कामगारांना देशातील इतर राज्य परिवहन महामंडळ आणि राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांच्या तुलनेत कमी वेतन आहे. यातून त्यांचा उदरनिर्वाहसुध्दा होत नाही. कौटुंबिक गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. या कामगारांना सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या वेतनात वाढ आवश्यक आहे. यासाठी महामंडळ शासनात विलीन करणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचारी म्हणून त्यांना घोषित करावे.


महामंडळाची आर्थिक स्थिती हलाखीची होण्यास कामगार जबाबदार नाही. सरकारी धोरण आणि महामंडळाची कामे बाहेरील संस्थांकडून करवून घेणे याशिवाय इतर कारणांमुळे एसटी तोट्यात आली आहे. खासगी शिवशाही किरायाने घेऊन प्रवासी वाहतूक महामंडळाच्या तोट्यातील मोठे कारण आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढत नसल्याने कर्मचार्‍यांना अपेक्षित वेतनवाढ मिळत नाही. एसटी महामंडळाला स्वतंत्र महामंडळ त्याचे स्वतंत्र अस्तीत्व न दाखविता राज्य शासनात विलिनीकरण करावे, असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने म्हटले आहे.

प्रवासी कराचा वाढता बोजा
महाराष्ट्र सरकार राज्य परिवहन महामंडळाकडून एकूण १७.५ टक्के दराने प्रवासी कर वसूल करते. इतर राज्यात हा दर सात ते दहा टक्के आहे. देशात एसटीकडून सर्वाधिक कर महाराष्ट्रात घेतला जातो. महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय असतानाही एवढ्या मोठ्या कराचा भार महामंडळाला सहन करावा लागतो. एसटी महामंडळाचे सर्व निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनेच होतात. मात्र शासनाकडून कुठलीही आर्थिक मदत मिळत नाही. शासनाला उत्पन्न मिळवून देते, सोबतच स्वत:चाही खर्च भागविते. महामंडळ बळकट होण्यासाठी शासनात विलिनीकरण करा, असे साकडे संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून घातले आहे.
संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
एनआरसीमध्ये स्थान मिळण्यासाठी मुस्लिमांपेक्षा ब्राम्
भाजपा नेत्यांचा शिरच्छेद करावासा वाटतो
मुस्लिम पोलिसाला जमावाकडून मारहाण व ठार मारण्याची धमकी
संत रविदास मंदिर पाडल्याप्रकरणी केजरीवाल सरकार सर्वोच्
मृत गायींच्या मालकांना नुकसान भरपाई न दिल्यास दगडफेक
रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था कोण वाचवेल?
डॉलरच्या तुलनेत रुपया ५८ पैशांनी घसरला
भ्रष्ट २२ वरिष्ठ कर अधिकार्‍यांना सक्तीने सेवानिवृत्ती
मनसेची ईव्हीएम हटाव हंडी पोलिसांनी केली जप्त
महिलांना घाबरवण्यासाठी त्यांनी खोटा खटला दाखल केला
मुलांना मध्यान्ह भोजनात खावी लागतेय मीठासोबत चपाती
एअर फोर्सचे हेलिकॉप्टर भारतानेच पाडले, पाच अधिकारी दोषी
आसाममधील अंतिम एनआरसीत २ लाख लोकांची नावेच नाहीत
दुष्काळाची दाहकता सहन होत नसल्याने शेतकर्‍याचा अन्नत्य
मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात
बाल शोषण आणि लैंगिक छळाची ७ हजार २७७ प्रकरणे प्रलंबित
नरेश गोयल यांचा ‘गोलमाल’; ‘ईडी’च्या हाती पुरावे
ईडी आीण सीबीआयची नोटीस बजावून दाखवा
प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर
मुस्लिमांना दफनभूमीसाठी जागा नसल्याने गावकर्‍यांनी मृ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper