×

पोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला

Published On :    22 Jul 2019
साझा करें:

उत्तरप्रदेशातून १८.१९ लाख तर गुजरातमधून ६.३५ स्थलांतरितांची नोंद



मुंबई : जनगणनेच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या आकडेवारीनुसार मुंबईसह उपनगर आणि ठाण्यात दक्षिणेतून येणार्‍या स्थलांतरितांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात पुन्हा सर्वाधिक लोंढे पाठवणार्‍या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि गुजरात अजूनही आघाडीवर असतानाच महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतून पोट भरण्यासाठी मुंबई गाठणार्‍यांचे प्रमाण मात्र चिंता करावी इतके वाढले आहे.


एकेकाळी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील लोंढे मुंबई परिसरात मोठ्या संख्येने येत होते. मात्र त्यांचे प्रमाण आता कमी झाले आहे. दक्षिणेकडील स्थलांतर कमी झाले असले तरी सध्या मुंबई परिसरात उत्तर प्रदेश आणि गुजरातमधून येणार्‍यांची संख्या जास्त आहे. उत्तर प्रदेशातून १८.१९ लाख, तर गुजरातमधून ६.३५ लाख स्थलांतरितांची नोंद झाली आहे.


स्थलांतरितांचा टक्का वाढत असला तरी बाहेरून येणार्‍यांचे प्रमाण मात्र घटले आहे.  २०११ ला ४६.४४ लाख लोक बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात आले. २००१  मध्ये आलेल्या स्थलांतरितांची संख्या ४१.०१ लाख होती. २०११ च्या जनगणनेची जारी झालेली ताजी आकडेवारी सांगते की, मुंबईचे दोन जिल्हे  आणि ठाणे जिल्हा मिळून एकूण लोकसंख्या २.३५ कोटी असून त्यात ४३.०२ टक्के प्रमाण स्थलांतरितांचे आहे. २००१ ला हेच प्रमाण २.०१ कोटी लोकसंख्येत ०.७१ कोटी इतके म्हणजेच ३५.५१ इतके टक्के होते. २०११ च्या जनगणनेनुसार  मुंबईत ४६.४४ लाख लोक अन्य राज्यांतून आलेले स्थलांतरित आहेत. त्यात  अन्य राज्यांचे प्रमाण ४५.९२ टक्के आहे. मात्र २००१ मध्ये हेच प्रमाण ५७.४३ टक्के इतके होते.


मुंबईसह परिसरात होणार्‍या स्थलांतरात राज्यांतर्गतचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. २००१ नुसार २८.१६ लाख असलेले प्रमाण वाढून २०११ मध्ये ते ४३.०२ लाखांवर पोहोचले आहे. दक्षिणेतील राज्यांची बरी प्रगती झाल्याने तेथून येणारे लोंढे कमी झाले तरी मुंबईसह महाराष्ट्रात सर्वाधिक लोेंढे पाठवण्यात आजही उत्तर प्रदेश आणि गुजरात आघाडीवर आहेत. (बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर गुजरातमधून स्थलांतरित होण्याची गती आणखी वाढेल.) मुंबईत आलेल्या ४६.४४ लाख स्थलांतरितांपैकी उत्तर प्रदेशचे १८.८९ लाख तर गुजरातचे ६.३५ लाख आहेत.


महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून पोट भरण्यासाठी मुंबई गाठणार्‍या स्थलांतरितांचे प्रमाण प्रचंड गतीने वाढत असून, राज्यातील प्रादेशिक असमतोलाचा हा परिणाम चिंताजनक समजला जातो. महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांतून मुंबई गाठणार्‍यांचे प्रमाण २००१ च्या जनगणनेत २८.१६ लाख होते ते २०११ मध्ये थेट ४३.०२ लाखांवर पोहोचले आहे. मुंबईकडे राज्यातून झालेल्या स्थालांतरितांची ही वाढ ५२.७८ टक्के आहे. ग्रामीण भागाची झालेली विपन्न अवस्था, रोजगाराचा अभाव आणि विकासात असलेला प्रादेशिक असमतोल यामुळे महाराष्ट्र मुंबई गाठतो आहे. 



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
एनआरसीमध्ये स्थान मिळण्यासाठी मुस्लिमांपेक्षा ब्राम्
भाजपा नेत्यांचा शिरच्छेद करावासा वाटतो
मुस्लिम पोलिसाला जमावाकडून मारहाण व ठार मारण्याची धमकी
संत रविदास मंदिर पाडल्याप्रकरणी केजरीवाल सरकार सर्वोच्
मृत गायींच्या मालकांना नुकसान भरपाई न दिल्यास दगडफेक
रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था कोण वाचवेल?
डॉलरच्या तुलनेत रुपया ५८ पैशांनी घसरला
भ्रष्ट २२ वरिष्ठ कर अधिकार्‍यांना सक्तीने सेवानिवृत्ती
विरोधकांनी वाईट शक्तींचा वापर केल्याने भाजपच्या नेत्या
मनसेची ईव्हीएम हटाव हंडी पोलिसांनी केली जप्त
महिलांना घाबरवण्यासाठी त्यांनी खोटा खटला दाखल केला
मुलांना मध्यान्ह भोजनात खावी लागतेय मीठासोबत चपाती
एअर फोर्सचे हेलिकॉप्टर भारतानेच पाडले, पाच अधिकारी दोषी
आसाममधील अंतिम एनआरसीत २ लाख लोकांची नावेच नाहीत
दुष्काळाची दाहकता सहन होत नसल्याने शेतकर्‍याचा अन्नत्य
मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात
बाल शोषण आणि लैंगिक छळाची ७ हजार २७७ प्रकरणे प्रलंबित
नरेश गोयल यांचा ‘गोलमाल’; ‘ईडी’च्या हाती पुरावे
ईडी आीण सीबीआयची नोटीस बजावून दाखवा
प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper