×

ब्राम्हण हा बहुजनांचा रक्त शोषणारा पॅरासाईट

Published On :    20 Aug 2019
साझा करें:

अंबरनाथ येथील ईव्हीएम भंडाफोड परिवर्तन यात्रेत वामन मेश्राम यांचे शरसंधान



अंबरनाथ : इंग्रजांच्या अगोदर २.५ हजार वर्षापूर्वी भारतावर ब्राम्हणांनी आक्रमण केले. इंग्रजांनी येथील समाजाला हिंदू-मुस्लिम अशा दोन गटात विभागले. परंतु ब्राम्हणांनी ६ हजार जातीत विभागले. याचा अर्थ ब्राम्हण इंग्रजांपेक्षा तीनहजार पटीने जास्त खतरनाक आहे. आपल्याला ब्राम्हणांनी विभाजित केले. ब्राम्हण हा बहुजनांचा रक्त शोषणारा पॅरासाईट आहे अशा शब्दात बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी शरसंधान साधले. महाराष्ट्रातील अंबरनाथ येथे ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी यात्रेत ते बोलत होते.


ते म्हणाले, ब्राम्हणांनी येथील बहुजन समाजाला जातीत विभागले. ब्राम्हण महान आहेच परंतु त्यांच्यापेक्षा आपणही थोडेसे महान आहोत. कारण त्यांनी जनावरांची लादलेली व्यवस्था निमूटपणे स्विकारली. प्रत्येकजण आपापल्या जातीचा गर्व करू लागला आहे. यामुळे ब्राम्हणवाद अधिक मजबूत होतो हे लक्षात घ्यायला हवे. पहिल्यांदा लोकांना मानसिक गुलामीतून मुक्त करायला हवे. एकदा मानसिक गुलामीतून मुक्त झालो तर राजनीतीक मुक्ती मिळायला वेळ लागणार नाही. म्हणून जातीत विभागलेल्या लोकांना जागवावे लागेल. जागवलेल्या लोकांना जोडावे लागेल. जोडलेल्या लोकांची शक्ती निर्माण करावी लागेल आणि या शक्तीचा आपल्या मुक्तीसाठी वापर करायला पाहिजे. शक्तीशिवाय मुक्ती संभव नाही.


यावेळी त्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा कसा होतो याची पोलखोल केली. ८ ऑक्टोबर २०१३ ला सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमविरोधात निकाल देऊनही त्याची साधी एक ओळही नॅशनल मीडिया म्हणून मिरवणार्‍या प्रचार व प्रसार माध्यमांनी छापली नाही. त्यामुळे हा मीडिया नॅशनल नसून देशद्रोही आहे असा आरोप मेश्राम यांनी केला. निवडणूक कशी पारदर्शी आहे की नाही याची माहिती निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदार यांना माहित असायला हवी. परंतु केवळ निवडणूक आयोगालाच माहित आहे. बाकीच्या लोकांना काहीच माहित नाही. 


जर्मनीत ईव्हीएमवर लोकांनी साधी शंका उपस्थित केली तेथील सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ बंदी आणली. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएम पारदर्शी नसल्याचा निर्वाळा दिला आह. याचा अर्थच ते असंविधानिक आहे. ईव्हीएम मशीन केवळ मतदारांची नव्हे तर उमेदवाराचेही मत चोरते. याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. बदमाशी करणार्‍या निवडणूक आयोगाला मजबूत पकडायला हवे. तरच ते वठणीवर येतात. सर्वोच्च न्यायालयाने मशीन असंविधानिक आहे असे सांगितल्यानंतर एखाद्या चौकी इन्चार्जने सांगण्याची गरज आहे का? असा सवाल त्यांनी केला. निवडणूक आयोग केवळ नौटंकी करत आहे की, ईव्हीएम हॅक करून दाखवा. निवडणूक आयोग वनवे प्रोपोगंडा करत आहे असा हल्लाबोल मेश्राम यांनी केला.


१६ मे २०१४ रोजी निवडणुकीचा निकाल लागला. त्यावेळी भाजपाने २८३ जागा मिळवल्या. ३१ टक्क्यांच्या आधारे भाजपाला मते मिळाली होती. भारताच्या इतिहासात एवढ्या मतांच्या आधारे कुठल्याही पक्षाला सिंगल मेजॉरीटी मिळाली नव्हती. मी दादरला भाषण करत होतो. त्यावेळी एका माणसाने इकॉनॉमिक टाइम्स माझ्या पुढ्यात आणून ठेवला आणि म्हणाला, तुमचे भाषण झाल्यानंतर बातमी वाचा. बातमी वाचल्यानंतर लक्षात आले की, ८ लाख ईव्हीएम भंगारात विकण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. ज्या ईव्हीएम मशीनच्या आधारे एक महिन्यापूर्वी निवडणुका घेतल्या त्या अचानक भंगारात कशा काय निघाल्या? त्यामुळे माहिती अधिकाराखाली निवडणूक आयोगाला प्रश्‍न विचारला. 


प्रशासनिक अधिकारी हा तांत्रिक नसतो. त्याला कसे काय कळाले की ते भंगार झाले आहे म्हणून याची माहिती द्यावी. भंगारात विकण्याअगोदर कमिटी बनवण्यात आली का? त्यांची नावे, पत्ता, टेलिफोन त्याचबरोबर मशीनच्या वॉरंटी, गॅरंटी कार्ड देण्यात यावेत अशी मागणी केली असता निवडणूक आयोगाचे कान खडे झाले. आपली चोरी कोणीतरी पकडत आहे याची जाणीव झाल्याने निवडणूक आयोग घाबरले व त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.


 ईव्हीएमला व्हीव्हीपॅट लावावेत असा सर्वेच्च न्यायालयाने आदेश देऊनही केंद्रातील भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने त्यासाठी पैसे दिले नाहीत. देशातील लोकांच्या करांच्या माध्यमातून पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होतो. हा पैसा लोकांसाठीच वापरायचा असतो. अदानी, अंबानी, टाटा हे मालक आहेत. प्रधानमंत्री मालक नाही तर लोकांचा विश्‍वस्त असतो. प्रधानमंत्री मोदी व्हीव्हीपॅट खरेदीसाठी पैसा कसा देत नाही ते बघतो. आपली नोटीस जाताच आकडू असलेले मोदी यांनी व्हीव्हीपॅटसाठी ३ हजार ५६७ कोटी रूपये दिले. 


मोदी ईव्हीएममध्ये घोटाळा करून प्रधानमंत्री झाले आहेत असे अनेकदा मी आरोप केला. परंतु माझ्याविरोधात त्यांनी एकदाही एफआयआर दाखल केला नाही. उलट मीच निवडणूक आयोगाला कोर्टात खेचले. २४ एप्रिल २०१७ ला आपल्या बाजूने निकाल दिला गेला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमला ज्या व्हीव्हीपॅट मशीन लावण्यात आल्या होत्या, त्या आपण लढाई जिंकल्यामुळे लागल्या होत्या याची आठवण मेश्राम यांनी करून दिली.


ईव्हीएममध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड व व्हीव्हीपॅटमध्ये कागदी रेकॉर्ड असा तो विषय आहे. पॅरा नंबर २८ मध्ये इन केस ऑफ डिस्फुट मॅन्युअली काऊंटींग व्हायला हवे असा आदेश आहे. परंतु मॅन्युअली काऊंटींग रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने कॉंग्रेसकडे प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव फेब्रुवारी २०१४ मध्ये पारित करण्यात आला. त्यामध्ये ५६ (सी) असा नवीन रूल घुसवण्यात आला. केवळ दुसर्‍या नंबरच्या उमेदवारालाच पुर्नमोजणीची मागणी करता येऊ शकेल असा नियम करण्यात आला. परंतु एक नंबरला कॉंग्रेस तर कधी भाजपा व दोन नंबरला भाजपा किंवा कॉंग्रेस असतो. म्हणजे आतापर्यंत दोन्ही पक्षांनी पुर्नमोजणीची मागणी केलेली नाही. ‘तेरी भी  चूप, मेरी भी चूप दोघेही ‘चिडीचूप’ अशा शब्दात मेश्राम यांनी टीका केली. 


कॉंग्रेस ईव्हीएम घोटाळ्यात २०० टक्के सहभागी आहे. आपण दाखल केलेल्या खटल्यात ५६ (सी) शाल कन्टुन्यू असा १८ जानेवारी २०१९ ला निकल दिला. भाजपाला मदत करण्यासाठीच कॉंग्रेसने ५० टक्के व्हीव्हीपॅटची मागणी केली होती. त्यामुळे दोन्हीही पक्ष एकसारखेच आहेत असे मेश्राम यांनी सांगितले.


यावेळी राष्ट्रीय मागासवर्गाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास चौधरी पटेल म्हणाले, देशात सर्वांवर अन्याय होत आहे. आपण वेगवेगळे लढत आहोत, म्हणून आपली पिटाई होत आहे. १९२० मध्ये माणगाव परिषदेत राजर्षी शाहू महाराज म्हणाले होते की, आपल्याला राष्ट्रीय नेता मिळाला आहे. बाबासाहेब हे देशातील बहुजनांचे नेते असतील असे सांगितले होते. संविधान सभेत मुस्लिम बांधवांनी बाबासाहेबांना पाठवले होते. आज एकजूट होऊन लढायला हवे. ३.५ विदेशी युरेशियन ब्राम्हण सर्वांचेच हक्क व अधिकार हिरावून घेत आहेत. त्यासाठी भारतात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय निर्माण होण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा लढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्याम गायकवाड, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, शोभना यशवंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला’
महाराज कधीच दिल्लीकरांचे आधीन झाले नाहीत
राज्यसभा खासदार मालामाल!
बलात्कार खटल्यांसाठी १०२३ न्यायालये, केंद्र सरकारचा प्
मॉब लिंचिंग या सुनियोजित राजकीय हत्या
मला चिन्मयानंदच्या रुममध्ये नेण्यात आलं, हे सगळ्या कॉले
८२ माजी खासदारांना अजूनही सोडवेना सरकारी बंगल्याची उब
फडणवीसांच्या ‘महाजनादेश’ला गर्दी जमवण्यासाठी महिलांन
फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेवर ‘कडकनाथ’चा मारा
गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण
शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा
मुलीला त्रास देणार्‍या आरएसएस कार्यकर्त्याची पित्याकड
बोट अपघातात १५ वर्षात तब्बल १० हजार ५८० जणांचा मृत्यू
ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली तरच न्याय
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या डोक्यावर ३ हजार ५८० कोटी
पाणबुडी निर्मितीसाठी निविदा भरल्याने समुद्री सुरक्षाह
‘महाजनादेश ही जनतेवर लादलेली यात्रा’
पैठणगेट येथे‘ईव्हीएम’विरोधात निदर्शने
ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आलेल्यांनी उदयनराजेंना मुख्
बारामतीत राडा, फडणवीसांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper