×

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही

Published On :    20 Aug 2019
साझा करें:

संभाजीराजे विनोद तावडेंवर संतापले, पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही



कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी अनेकजण मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. यामध्ये राजकारणीही मागे राहिलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रस्त्यावर लोकांकडे पैसे मागत मदत गोळा केली होती. यासंबंधी व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. मात्र यावरुन राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी विनोद तावडेंच्या या कृत्याचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे.


फेसबुकच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. यासोबत त्यांनी विनोद तावडेंचा व्हिडीओही शेअर केला आहे. व्हिडीओत विनोद तावडे कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्त बंधू भगिनींसाठी मदत करा असे माईकवर बोलत असल्याचे ऐकू येत आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी यांनी टीका करताना लिहिले आहे की, स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारले आहे.


कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी भाजपाच्या वतीने बोरिवलीत ११ ऑगस्टला मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होते. विनोद तावडे यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी मदत फेरीमध्ये सहभागी झाले होते. पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करण्यासाठी ११० डबे तयार करण्यात आले होते. प्रत्येक डब्यात जमा होणारा संकलित निधी मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांपर्यंत पोहचवण्यात येत आहे.



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला’
महाराज कधीच दिल्लीकरांचे आधीन झाले नाहीत
राज्यसभा खासदार मालामाल!
बलात्कार खटल्यांसाठी १०२३ न्यायालये, केंद्र सरकारचा प्
मॉब लिंचिंग या सुनियोजित राजकीय हत्या
मला चिन्मयानंदच्या रुममध्ये नेण्यात आलं, हे सगळ्या कॉले
८२ माजी खासदारांना अजूनही सोडवेना सरकारी बंगल्याची उब
फडणवीसांच्या ‘महाजनादेश’ला गर्दी जमवण्यासाठी महिलांन
फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेवर ‘कडकनाथ’चा मारा
गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण
शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा
मुलीला त्रास देणार्‍या आरएसएस कार्यकर्त्याची पित्याकड
बोट अपघातात १५ वर्षात तब्बल १० हजार ५८० जणांचा मृत्यू
ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली तरच न्याय
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या डोक्यावर ३ हजार ५८० कोटी
पाणबुडी निर्मितीसाठी निविदा भरल्याने समुद्री सुरक्षाह
‘महाजनादेश ही जनतेवर लादलेली यात्रा’
पैठणगेट येथे‘ईव्हीएम’विरोधात निदर्शने
ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आलेल्यांनी उदयनराजेंना मुख्
बारामतीत राडा, फडणवीसांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper