×

पाणबुडी निर्मितीसाठी निविदा भरल्याने समुद्री सुरक्षाही अदानींच्या हातात?

Published On :    15 Sep 2019
साझा करें:

केंद्रातील भाजपा सरकारने पायघड्या अंथरल्याने तीव्र संताप



मुंबई : अदानी समुहाने बंदरापासून सुरू केलेला व्यवसाय पायाभूत सुविधा, विशेष आर्थिक क्षेत्र, वीज, विमानतळ उभारणी अशा सर्वच क्षेत्रात विस्तारला. त्यानंतर आता देशाची समुद्री सुरक्षादेखील गौतम अदानींच्या हातात जाण्याची शक्यता आहे. ४५ हजार कोटी रुपयांच्या पाणबुडीनिर्मितीसाठी समुहाने ऐनवेळी निविदा भरल्याने सारेच आश्‍चर्यचकित झाले आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या मुंबईस्थित माझगाव डॉक लिमिटेडसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पाणबुडी निर्मितीसाठी अदानी यांच्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारने पायघड्या अंथरल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून मोदी आणि अदानी यांच्या दोस्तीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.


अर्ध्याहून अधिक पाणबुड्या मोठ्या दुरुस्तीसाठी ताफ्यातून बाद होत असल्याने भारतीय नौदलाला येत्या काळात पाणबुड्यांची नितांत आवश्यकता आहे. यामुळेच सध्या माझगाव डॉकमध्ये तयार होणार्‍या पाणबुड्यांसारख्या आणखी सहा अत्याधुनिक पाणबुड्यांची योजना आखण्यात आली आहे. हे कंत्राट आधी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला (एमडीएल) थेट मिळणार होते. पण केंद्र सरकारने त्यासाठी निविदा काढली. त्यासाठी आधीच चार कंपन्या शर्यतीत असताना अदानी समुहाने ऐनवेळी उडी घेतली.


 शुक्रवारी ही निवीदा भरण्याची अंतिम तारीख असताना अदानी समुहाने ऐनवेळी निविदा भरली. मुख्य म्हणजे, अदानी समुहाकडे नौका निर्मितीचा कुठलाही अनुभव नाही. त्यांच्याकडे नौका तयार करण्याचा स्वत:चा कारखानादेखील नाही. तसे असतानाही त्यांनी चक्क पाणबुड्यांसारख्या नौदलाच्या अत्यंत महत्त्वाच्या नौकेच्या निर्मितीसाठी निविदा भरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

स्कॉर्पिअन श्रेणीतील सहा पाणबुड्या सध्या माझगाव डॉकमध्ये तयार होत आहे. ४५ हजार कोटी रुपयांचे हे कंत्राट त्याच प्रकारच्या पाणबुड्यांची पुढील आवृत्ती असेल. यामुळेच ते कंत्राट थेट मिळावे, असा एमडीएलचा प्रयत्न होता. पण या कंत्राटासाठी आता एमडीएलला अदानींसह एल ऍण्ड, रिलायन्स नेव्हल ऍण्ड इंजिनीअरिंग तसेच केंद्र सरकारच्याच विशाखापट्टणम येथील हिंदुस्थान शिपयार्डशी स्पर्धा करावी लागणार आहे.


हिंदुस्थान शिपबिल्डर्सशी संयुक्त करार

अदानी समुहाला नौका निर्मितीचा कुठलाही अनुभव नाही, त्यांच्याकडे तसा कारखानादेखील नाही. त्यामुळेच अदानी समूह या कंत्राटासाठी केंद्र सरकारच्या हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड (एचसीएल) यांच्याशी संयुक्त करार करतील, असे सांगितले जात आहे. पण एचसीएलनेदेखील या कंत्राटासाठी स्वतंत्र निविदा भरली आहे, हे विशेष.



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ पुसण्य
विश्‍व हिंदू परिषदेची दादागिरी
पीएमसी बँक घोटाळा, सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
ब्राम्हणवादी भाजपा सरकारने भारताला लोटले भूकेच्या खाईत
भाजपाच्या संकल्पपत्रात नुसतीच रंगरंगोटी
पेशवा फडणवीसांच्या मंत्र्यांना अच्छे दिन, पाच वर्षात १४
दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद, आरबीआयची कबुली
व्यापारयुध्दामुळे जगापुढे भीषण संकट, आंतरराष्ट्रीय नाण
गायींची गणना झाली ओबीसींची कधी होणार?
धक्कादायक: संयुक्त राष्ट्रांवरच आलीय दिवाळखोरीत जाण्या
देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रुळावर येणार नाही
संविधान न मानणारे सावरकर भारतरत्न कसे होऊ शकतात?
सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यूनंतर रुग्णाच्या डोळ्याला ल
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांवर शाईफेक
बाबरी मशीदच्या जागेवरील सुन्नी वक्फ बोर्डाने दावा सोडल
४ हजार ५०० कुटुंबीयांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा
शिवसेनेच्या स्वस्त वीज योजनेसाठी तिजोरीवर ४ हजार ८०० को
उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी शाळेच्या संरक्षक भिंतीची तोडफ
योगी सरकारच्या निर्णयामुळे २५ हजार होमगार्डवर बेरोजगार
‘भारतीय अर्थव्यवस्थेची खराब कामगिरी’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper