×

...तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, पीएमसी बँक घोटाळ्यात नेत्यांना घरांची भेट

Published On :    8 Oct 2019  By : MN Staff
शेयर करा:


पंजाब आणि महाराष्ट्र बँक घोटाळाप्रकरणी दररोज नवं नवे खुलासे होत आहेत. ४ हजार ३५५ कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप होत असून या प्रकरणी एचडीआयएलचे संचालक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग यांच्या विरुध्द मनिलॉड्रींगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता ईडीने वाधवान यांच्या जवळच्या लोकांवर सोमवारी छापे टाकले. त्या छाप्यांमध्ये अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर आल्या आहेत. या छाप्यांमध्ये ईडीच्या हातात अनेक धक्कादायक गोष्टी हाती लागल्या आहेत.





नवी दिल्ली: पंजाब आणि महाराष्ट्र बँक घोटाळाप्रकरणी दररोज नवं नवे खुलासे होत आहेत.  ४ हजार ३५५ कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप होत असून या प्रकरणी एचडीआयएलचे संचालक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग यांच्या विरुध्द मनिलॉड्रींगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता ईडीने वाधवान यांच्या जवळच्या लोकांवर सोमवारी छापे टाकले. त्या छाप्यांमध्ये अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर आल्या आहेत. या छाप्यांमध्ये ईडीच्या हातात अनेक धक्कादायक गोष्टी हाती लागल्या आहेत.


एचडीआयएलच्या मालकांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना अतिशय पॉश भागांमध्ये महागडे फ्लॅट्स भेट म्हणून दिल्याचं ईडीला आढळून आले आहे. राज्यातल्या विविध शहरांमध्ये ही घरं असल्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. ईडीकडे या नेत्यांची नावं असून त्याबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात येत आहेत. ही नावं बाहेर आलीत तर  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय. महाराष्ट्रात सध्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळे एऊ अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचा तपास करत असून अतिशय गुप्तता पाळण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.


या छाप्यामध्ये ईडीला अलिबागमध्ये एक २२ खोल्यांचं अलिशान घरही मिळालं असून तेही जप्त करण्यात येणार आहे अशी माहिती ईडीच्या अधिकार्‍यांनी दिली. एचडीआयएलच्या संचालकांच्या नावावर एक विमानही आढळून आलंय. या संचालकांची मालदीवमध्ये संपत्ती असून काही यॉट्स असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ईडी मालदीवमधल्या अधिकार्‍यांशीही संपर्कात आहे. शनिवारी वाधवान यांचं खासगी विमान आणि दागिने असा ६० कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय. ईडीने एचडीआयएलशी संबंधित संचालकांच्या मुंबईतल्या ६ ठिकाणांवर छापे घातले असून अनेक तास ही शोध मोहिम सुरू होती.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ब्राम्हणवादी भाजपा सरकारने भारताला लोटले भूकेच्या खाईत
भाजपाच्या संकल्पपत्रात नुसतीच रंगरंगोटी
पेशवा फडणवीसांच्या मंत्र्यांना अच्छे दिन, पाच वर्षात १४
दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद, आरबीआयची कबुली
व्यापारयुध्दामुळे जगापुढे भीषण संकट, आंतरराष्ट्रीय नाण
गायींची गणना झाली ओबीसींची कधी होणार?
धक्कादायक: संयुक्त राष्ट्रांवरच आलीय दिवाळखोरीत जाण्या
देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रुळावर येणार नाही
संविधान न मानणारे सावरकर भारतरत्न कसे होऊ शकतात?
सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यूनंतर रुग्णाच्या डोळ्याला ल
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांवर शाईफेक
बाबरी मशीदच्या जागेवरील सुन्नी वक्फ बोर्डाने दावा सोडल
४ हजार ५०० कुटुंबीयांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा
शिवसेनेच्या स्वस्त वीज योजनेसाठी तिजोरीवर ४ हजार ८०० को
उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी शाळेच्या संरक्षक भिंतीची तोडफ
योगी सरकारच्या निर्णयामुळे २५ हजार होमगार्डवर बेरोजगार
‘भारतीय अर्थव्यवस्थेची खराब कामगिरी’
भाजपच्या संकल्पपत्रात एक कोटी नोकर्‍यांचे आमिष
आधी ‘जेट’मधली नोकरी गेली, मग पीएमसीमध्ये ९० लाख अडकले
देशाचे विभाजन केलेल्या आरएसएसवर बंदी घाला
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper