×

भाजपा सरकारने अर्थव्यवस्था नेली रसातळाला

Published On :    9 Oct 2019  By : MN Staff
शेयर करा:


कॉम्पिटिटिव्ह इकॉनॉमीच्या क्रमवारीत दहा स्थानांनी घसरण





नवी दिल्ली : एकीकडे देशातील अर्थव्यवस्था गंभीर मंदीचा सामना करत असतानाच आर्थिक आघाडीवरून भारताची चिंता वाढवणारी अजून एक बातमी आली आहे. जगातील कॉम्पिटिटिव्ह इकॉनॉमी अर्थात स्पर्धात्मक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत भारताची १० स्थानांनी घसरण झाली आहे. आता या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था ६८ व्या स्थानावर आहे. यावरून केंद्रातील भाजपा सरकारने अर्थव्यवस्था कशी रसातळाला नेली आहे दिसून येते.


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिध्द केलेल्या या नव्या क्रमवारीपूर्वी ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह इंडेक्समध्ये (जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक) भारत ५८ व्या स्थानावर होता. मात्र यावर्षी भारत हा ब्राझीलसह ब्रिक्स देशांमध्ये सर्वात खराब कामगिरी करणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक देश ठरला. या क्रमवारीत ब्राझीलला ७१ वे स्थान देण्यात आले आहे.  


दरम्यान, या क्रमवारीतील अव्वलस्थान अमेरिकेने गमावले असून, सिंगापूरने अव्वलस्थानी झेप घेतली आहे. चीनसोबत सुरू असलेल्या व्यापारी युध्दाचा फटका अमेरिकी अर्थव्यवस्थेला बसला आहे.  


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ही क्रमवारी प्रसिध्द करताना सांगितले की, आर्थिक स्थिरतेच्या बाबतीत भारत अजून उत्तम स्थितीत आहे. तसेच या देशाचे आर्थिक क्षेत्र खूप विस्तृत आहे. मात्र बॅड लोनशी झुंजत असलेले बँकिंग क्षेत्र ही अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे.


कॉम्पिटिटिव इकॉनॉमीच्या क्रमवारीत घसरण झाली असतील तरी कॉर्पोरेट गव्हर्नंसच्या बाबत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने भारताला १५ वे स्थान दिले आहे. शेअरहोल्डर गव्हर्नंसच्या बाबतीत भारताला दुसरे स्थान देण्यात आले आहे. तसेच मार्केट साइजच्या क्रमवारीत भारताला तिसरे स्थान देण्यात आले आहे. अक्षय उर्जेच्या बाबतीतही भारताला तिसरे स्थान देण्यात आले आहे. तसेच बाजारातील नाविन्याच्या बाबतीतही भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांपेक्षा वरचे स्थान देण्यात आले आहे.



आयुर्मानाच्या क्रमवारीत १०९ व्या स्थानावर

मात्र देशातील आयुर्मानाच्या क्रमवारीत भारत असूनही तळाच्या देशांमध्ये आहे. एकूण १४१ देशांचा समावेश असलेल्या क्रमवारीत भारताला १०९ वे स्थान देण्यात आले आहे. आफ्रिका खंडाबाहेरच्या देशांचा विचार केल्यास ही स्थिती फार चांगली म्हणता येणार नाही. तसेच दक्षिण आशियाई देशांशी तुलना केल्यास भारताचे स्थान खूप खाली आहे.  



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ब्राम्हणवादी भाजपा सरकारने भारताला लोटले भूकेच्या खाईत
भाजपाच्या संकल्पपत्रात नुसतीच रंगरंगोटी
पेशवा फडणवीसांच्या मंत्र्यांना अच्छे दिन, पाच वर्षात १४
दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद, आरबीआयची कबुली
व्यापारयुध्दामुळे जगापुढे भीषण संकट, आंतरराष्ट्रीय नाण
गायींची गणना झाली ओबीसींची कधी होणार?
धक्कादायक: संयुक्त राष्ट्रांवरच आलीय दिवाळखोरीत जाण्या
देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रुळावर येणार नाही
संविधान न मानणारे सावरकर भारतरत्न कसे होऊ शकतात?
सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यूनंतर रुग्णाच्या डोळ्याला ल
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांवर शाईफेक
बाबरी मशीदच्या जागेवरील सुन्नी वक्फ बोर्डाने दावा सोडल
४ हजार ५०० कुटुंबीयांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा
शिवसेनेच्या स्वस्त वीज योजनेसाठी तिजोरीवर ४ हजार ८०० को
उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी शाळेच्या संरक्षक भिंतीची तोडफ
योगी सरकारच्या निर्णयामुळे २५ हजार होमगार्डवर बेरोजगार
‘भारतीय अर्थव्यवस्थेची खराब कामगिरी’
भाजपच्या संकल्पपत्रात एक कोटी नोकर्‍यांचे आमिष
आधी ‘जेट’मधली नोकरी गेली, मग पीएमसीमध्ये ९० लाख अडकले
देशाचे विभाजन केलेल्या आरएसएसवर बंदी घाला
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper